सिर्फ नामही काफी है!

Submitted by ॲमी on 21 December, 2016 - 03:06

गेल्या अडीच वर्षात मराठी आंजावर स्वतःचे एक खास स्थान किंवा ब्रँडनेम बनवणार्या आयडी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा.

* मोदीभक्त किंवा मोदीद्वेष्टे 'एवढीच' ओळख असलेल्यांना यातून वगळले आहे.

* फार जुनी, सध्या फारशी अॅक्टीव नसलेली नावं नकोत. कारण आताच्या नवीन लोकांना ती माहीत नसणार.

* गेल्या अडीच वर्षात मआंजावर खळबळ माजवणारे आयडी हवेत. You can love them, you can hate them, but you can't ignore them. वाचकांच्या किंवा त्यांच्याशी संवाद साधणार्यांच्या भावना को हिलाके रख देनेवाले आयडी!
बर्याचजणांना ते इरीटेट करतात. पण त्यांचा स्वतःचा फ्यान फॉलोवींग/कल्टदेखील असतो. आपापले शांतपणे येऊन, अभ्यासू धागे/प्रतिसाद टाकून गपचूप राहणारे आयडी हे नाहीत...

* माबो, मिपा, ऐसी या तीन साइट्सच्या माझ्या अल्प अभ्यासावरुन मी काही नावं खाली प्रतिसादात दिली आहेत.

* तुम्हाला ज्यांना मत द्यायचंय त्याला +1 करा.

* एकाच व्यक्तीला मत द्या.

* त्याखेरीज इतर नावंदेखील सुचवू शकता.

तर मग करा चालू नॉमिनेशन्स, प्रचार आणि मतदानची रणधुमाळी!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, त्यापेक्षा तुम्ही पद्म यांना भेटा. तुमची नावेही जुळतात. पद्मश्री Happy

पुण्याची पार्टी ..... म्हणजे मिसळ, वडा की बाकरवडी. नॉट अगेन ..

ऋन्म्या आणी पद्म एक नाहीत. फॉर शूअर...

ऋन्मेष कोणाचा अपमान करून त्यांना छळणार नाही कद्धीच.. कोणत्याच आयडी रुपात..

आणि ऋन्मेष काहीही झालं तरी माझा आयडी उडवा म्हणून रडणार नाही.

ऋन्मेष कोणाचा अपमान करून त्यांना छळणार नाही कद्धीच.. कोणत्याच आयडी रुपात..आणि ऋन्मेष काहीही झालं तरी माझा आयडी उडवा म्हणून रडणार नाही.>>>>>>>> अनुमोदन रीया....

.

खूप जास्त लिहिणे आणि गुणात्मकदृष्ट्या चांगले लिहीणे ह्यात खूप फरक आहे. असहमत. पोल शी पूर्ण असहमत >> ऑ :O हा पोल 'गुणात्मकदृष्ट्या चांगले लिहणारे कोण' यासाठी काढलाच नाहीय. हा 'खळबळ माजवणारे कोण' यासाठीचा पोल आहे.

तुम्ही जी यादी दिलीय ती आणि माझी यादी म्हणजे शारुक आणि नासिरची तुलना केल्यासारखे होइल.

जव्हेरगंज!

हे पण एक नवे आणि चांगले लिहितात.

मला आवडतंही त्यांनी लिहिलेलं वाचायला.
पण फार फॉलो नाही करत.
त्यात हल्ली ते इथे कमी आणि तिथे जास्त दिसतात.

तुम्ही जी यादी दिलीय ती आणि माझी यादी म्हणजे शारुक आणि नासिरची तुलना केल्यासारखे होइल.
>> अरेच्चा क्षमस्व. संपादित करते माझी पोस्ट.

ऋ, टीना तर आहेतच, पण इथे अजून न आलेले,पण छान लेखन करणारे अजून एक नाव म्हणजे, विद्या भुतकर.. त्या देखील छान लिहीतात..

ऋन्मेश चं नाव पहिले आहे, लोक पुर्ण यादी न बघताच मतदान करताहेत.
ही partiality आहे.
+
धागा वाचता वाचताच फक्त एकच नाव डोक्यात क्लिअर होत गेलं.. त्याच्यासाठीच धागा काढला असावा असं वाटलं. स्मित
You can love them, you can hate them, but you can't ignore them हे वाचल्यावर तर खात्रीच पटली आणि पुढे पहिलं नाव त्याचच. मग काय त्यालाच मत दिलं. स्मित

>>> दोन्ही आरोप/निरीक्षणं अमान्य. माबो, मिपा, ऐसी या तिन्ही साइट्सवर मी पर्यायांचा क्रम मुद्दामच वेगवेगळा ठेवला आहे. इथे ऋन्मेष पहिला आहे तर मिपावर डांगे आणि ऐसीवर अनु राव.

===
अमा, क्षमस्व कशाला? एवढं चालतंच Happy पोस्ट संपादित करायचीही गरज नव्हती.

===
समीर गायकवाड, टिना, जव्हेरगंज, विद्या भुतकर वगैरे चांगले लेखक आहेत. पण 'खळबळ माजवणारे' आहेत का याबद्दल शंका आहे.

तर लोकहो पोल काढुन आता जवळपास ४८ तास होत आले आहेत. यापुढे नवीन नामांकन/मतदान फारसे होइल असे वाटत नाही. विजेता घोषित करुन टाकुयात.

द वन अँड ओन्ली!
तरुण तडफदार युवा सदस्य!!
माबोकरीणींचा लाडोबा!!!
माबोकरांचा शारुक!!!!
ऋन्मेऽऽष याने पाशवी बहुमताने 'सिर्फ नामही काफी है' हा कौल जिंकला आहे होऽऽ

छानसं सर्टिफिकेट बनवा रे त्याच्यासाठी कोणीतरी...

दोन्ही आरोप/निरीक्षणं अमान्य. >> मी कोणताही आरोप निरिक्षण लिहिलेलं नाही. मला जे वाटलं ते मी लिहिलं.

मिपावर पण मी ऋ लाच मत दिलं आहे.

आता ऐसीवर जाऊन तिथेही त्यालाच मत देऊन येते. Wink कारण या पोलचा विजेता फक्त तोच असू शकतो असं "माझं मत" आहे. Happy

वीणा सुरू
यांनी जितक्या लोकांना हलवलं तितकं आणखी दहा लोकांनी मिळूनही हलवलं नसेल. भल्याभल्यांचा आयडीवरचा, फोटोवरचा आणि माणुसकीवरचा विश्वास उडाला. माझा पुनर्जन्मावर विश्वास बसला. तो आता अधिकच बळकट झाला.

एक विनंती - सर्टिफिकेट देणारच असाल तर ढिनचॅक न देता सोफेस्टीकेटेड द्या. म्हणजे मला माझ्या बायोडाटा मध्ये जोडता येईल. नोकरीला तसेच लग्नाला कामी येईल. Happy

मुंबई बेटाची पाणीपुरी म्हटली की समुद्राचा थोडा खारटपणा तर उतरणारच, पण हे भाग्य न लाभलेल्या पुणेकरांना त्यातली गंमत नाही कळणार

कशासाठी आहे हा पोल? त्याचा उपयोग काय? असा पोल घेउन काय साध्य होणार आहे?>>दक्षिणा +१११११
>

धागा विरंगुळा आहे ना Happy

Pages