No pun intended.....

Submitted by अतरंगी on 19 December, 2016 - 06:21

माबोवरील चित्र विचित्र धागे आणि चित्र विचित्र आयडी यांचा साधर्म्यानुसार जोड्या लावा कार्यक्रम....

( खालील सर्व धागे माबोवर खरेच अस्तित्वात आहेत. आयडी आता आहेत कि नाही ते मात्र माहित नाही.)

कृत्रिम शीतपेये- सावधान :- 'मिरिंडा'

मायबोली गणेशोत्सव 2016 साठी स्वयंसेवक हवेत :- गजानन

पानिपत एक सल:- पेशवा

गुरुजींचे भावं विश्व:- दक्षिणा

१. अजून आहे लहान मी २. लहानपणीचे खेळ ३. बालपणीचा खेळ सुखाचा:- लिंबुटीम्बु

मायबोलीवर सर्वात हुशार कोण आहे ? :- सिंथेटिक जिनियस

नेहमी पडणारी स्वप्ने :- मुंगेरीलाल

१. स्वच्छता पाळा २.घराची स्वच्छता ३.सुंदर माझं घर; कल्पना आणि सूचना ४.रोबोटीक व्हॅक्युम क्लिनर विषयी माहिती हवी आहे ५.घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी:- झाडू

वाचणाऱ्याची रोजनिशी:- दै'नंदिनी'

छाया-आकृती (silhouette):- सावली

शनी महादशा दशा कि दुर्दशा महाशंका आणि कुशंका:- साडे'साती'

गणित सोडवू या:- भास्कराचार्य

जातिवंत भटके:- जिप्सी

१. अन हॅप्पीनेस इंडेक्स, २. कसं हसायचं:- _'आनंदी'_

१. तिरंदाजी २. तुझ्याच भात्यातले बाण मी झेलायला तयार आहे ३. ...एम चा गेम' :- धनुर्धर

तिखट पदार्थ, झणझणीत:-मिरची

कुठला पत्ता देतो मित्रा:- चौकट राजा

नसे चिंता विश्वाची:- बेफिकीर

आयुर्वेद म्हणजे काय:- वैद्यबुवा

१. शिकार कथा:- ए ए वाघमारे

नको वेड लावू:- वेडा कल्पेश

उधळीत गेलो मी गंध भोवताली:- फूल

तुम्हाला वाटली भिती मला भेटून???:- बागुलबुवा

सूर आता लागले :- नीधप

१. लहान मुलांची मासिके २.बालसाहित्य:- चंपक

उसगावात देणगी देण्याबद्दल माहिती हवी आहे? :- 'सु'निधी'

प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? :-आरती

१. वजन कमी कसे केले एक स्वानुभव २.वजन नियंत्रणाच्या सोप्या टिप्स:-उपास

गरिबी एक शाप:- रॉबिनहूड

दगडास देव मीही म्हणणार आज आहे :- श्रद्धा

भारतीय शास्त्रीय संगीत :-वाजवू का

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचं आम्ही बघू - आत्मबंध

नशेची धुंदी -धुंद रवी

का रे इतका लळा लावूनी...-अपरिचित

नकळत घडली चूक-अनाहुत

बाबा तू चुकला रे - उद्दाम

भलत्या वेळी - वाट्टेल ते

कांगावा करावा तर असा.-सन्नाटा

मी एक ओरीजिनल आयडी-सुज्ञ माणुस

घाल लाथ पेकाटात!-ब्रह्मांड आठवले

आपण यांना पाहिलंत का? -जुनाच कुणीतरी

स्वत:चा शोध कधी घेतला आहे का? - मी बावरी

मला गुरू भेटला... -खटासि खट

एक गोंधळ- पप्पी कोणाला? कशी द्यावी? वा देऊ नये? हे कसे ओळखावे ?-नतद्रष्ट

एक झोका...चुके काळजाचा ठोका - गामा_पैलवान

शिक्षण आणि मूल्य - माझे मनोगत :- महागुरू

लैंगिक शिक्षण कसं व केव्हा द्यावं:- सनी लेओन

अब की बार 'मी' सरकार:- अर्चना सरकार

घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
क्षितीज दिसते दूर मला... - फारेण्ड>>>>>>>अरे बास करा रे!:हहगलो: हे मनीमाऊचे आधी लक्षात आलेच नव्हते.:हाहा:

घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे? - मनिमाऊ
अम्रुतसरी छोले :- पवनपरी11
लैंगिक शिक्षण कसं व केव्हा द्यावं:- सनी लेओन >>> Rofl

सनी लेओन असा आयडी आहे? <>>> +१

एक होता रोमेल, माझा 'जर्मनी'वास :- हिटलर

बिनधास्त ड्रिंक अँड ड्राइव्ह.....जादूगार है ना.....!!!!!! :- सलमान ११२२

भारतीय विद्यापीठे आणि जागतिक दर्जा:- सडकछाप

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष
मांसाहार: एक विरोधाभास :- जागु
पहिला धडा :- मास्तुरे
प्रगति चा प्रवास :- आशुचँप / हर्पेन

@ सपना हरिनामे, कोणत्याही ग्रुपवर जा. सभासद संख्येवर टिचकी मारा. आपल्याला त्या ग्रुपमधील आयडींची लिस्ट दिसू लागेल.

गुलमोहर ललीतलेखन ग्रुपमधील आयडींची नावे
http://www.maayboli.com/og/users/36846/faces

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष Uhoh

सनी लिओन मायबोलीवर Lol
ती देखील बिचारी ईथे मूकवाचक बनून राहते. मायबोलीवरच्या पुरुषांनो जरा सभ्य बनून राहा रे, सनी लिओन सुद्धा तुमच्यासमोर यायला घाबरते Proud

बाकी मी सकाळी ट्रेनमध्ये बसल्याबसल्या (हो मला बसायला मिळते) १०-१५ मिनिटे विचार केला, म्हटलं धाग्यात काहीतरी भर आपणही टाकू, पण एक ढंगसे सुचेल तर शप्पथ.. आणि ईथे लोकांना कसे धनादण सुचतेय.
तुम्हा लोकांच्या या प्रतिभेला __/\__ Happy

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद -: ॠन्मेष
मांसाहार: एक विरोधाभास :- जागु
>> ये कुछ जम्या नहीं.

बाकी धागा भारीच.

Pages