होममेड सोलर कुकर

Submitted by पारु on 16 December, 2016 - 13:52

माझ्या वडिलांनी जुन्या छत्री पासून सोलर केला त्याची ही कृती.
छत्री, स्टीलचे भांडे, सिल्वर पेपर आणि सूर्य असेल तर तुम्ही घरीच हा सोलर कुकर तयार करू शकता. इट वर्कस अमेझिंगली !

१. जुनी छत्री

1.jpg

२. जुनी वायर बास्केट. इथे जुनी स्वयंपाकघरातील कांदे-बटाटे ठेवायची बास्केट घेतली आहे.

2.jpg

३. झाकणासहीत स्टीलचे भांडे. याला बाहेरून काळा रंग दिला आहे.

3.jpg

४. छत्रीला आतून सिल्वर पेपर डिंकाने चिकटवून घेतला. छत्रीच्या दांड्याला बास्केट दोर्‍याने बांधून घेतली आणि त्यात डब्बा ठेवला. एक जुना लाकडी स्टँड छत्रीला सरळ ठेवण्यासाठी वापरला आहे.

6.jpg

झाला सोलर कुकर तयार ! याच्यात भात करायला दोन तास आणि तुरीच्या डाळीसाठी ४ तास लागले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट.... हे करुन बघणारच,,
इथे फोटोसहित दिल्याबद्दल धन्यवाद

छान.

मस्तच !

सर्वांचे प्रतिसादासाठी धन्यवाद !!

अ‍ॅल्युमिनिअम फॉईल पण चालेल. या आधी सोलर कुकर केला होता त्यावेळेस अ‍ॅल्युमिनिअम फॉईल वापरली होती. तो सेटअप एक काका त्यांच्या बरोबर घेऊन गेले Happy घरात गिफ्ट पॅकिंगचा सिल्वर पेपर बराच उरला होता म्हणून तो वापरला आहे.

पारू, काही शंका.
हा प्रयोग प्रखर उन्हातच शक्य होईल ना?
भात तयार झाला हे डबा न उघडता कसा कळेल? कारण झाकण उघडले की वाफ जाणार.
वाफेने झाकण निघू शकेल ना?
पाणी नेहमीप्रमाणेच घालायचे ना?

उत्तम आयडिया!
मुख्य म्हणजे ती प्रत्यक्षात त्यांनीच उतरवली आहे. तुमच्या वडिलांना आमच्याकडून शुभेच्छा!

अशा हळुहळु शिजलेल्या भात वरणाची चवही खासच! शिवाय त्याच्याबरोबर 'feel good' factor! वाह!

सुनिधी, हे स्लो कुकिंग प्रोसेस असल्याने झाकण लगेच निघते. भात नसेल झाला तर परत ठेवायचे. एकदा अंदाज आला की मग वेळ नक्की कळतो. वर जो वेळ दिला आहे तो प्रखर उन्हात ठेवल्यावरचा दिला आहे. पाणी नेहमीप्रमाणेच घातले आहे. अंगणात झाडांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही म्हणून गच्चीवर छत्री ठेवली आहे.

स्वीट टॉकर, चवी साठी अनुमोदन ! मी वडिलांना सांगणार आहे मायबोलीवर लिहायला ते अशा बर्‍याच गोष्टी करत असतात. His friends call him Phunsukh Wangdu Happy

>> Phunsukh Wangdu

Happy

बाबांनां इथे लिहीण्याबद्दल नक्की आग्रह कर. आगाऊ धन्यवाद आणि शुभेच्छा!

Phunsukh Wangdu Happy

स्मित

बाबांनां इथे लिहीण्याबद्दल नक्की आग्रह कर. आगाऊ धन्यवाद आणि शुभेच्छा!

Pages