होममेड सोलर कुकर

Submitted by पारु on 16 December, 2016 - 13:52

माझ्या वडिलांनी जुन्या छत्री पासून सोलर केला त्याची ही कृती.
छत्री, स्टीलचे भांडे, सिल्वर पेपर आणि सूर्य असेल तर तुम्ही घरीच हा सोलर कुकर तयार करू शकता. इट वर्कस अमेझिंगली !

१. जुनी छत्री

1.jpg

२. जुनी वायर बास्केट. इथे जुनी स्वयंपाकघरातील कांदे-बटाटे ठेवायची बास्केट घेतली आहे.

2.jpg

३. झाकणासहीत स्टीलचे भांडे. याला बाहेरून काळा रंग दिला आहे.

3.jpg

४. छत्रीला आतून सिल्वर पेपर डिंकाने चिकटवून घेतला. छत्रीच्या दांड्याला बास्केट दोर्‍याने बांधून घेतली आणि त्यात डब्बा ठेवला. एक जुना लाकडी स्टँड छत्रीला सरळ ठेवण्यासाठी वापरला आहे.

6.jpg

झाला सोलर कुकर तयार ! याच्यात भात करायला दोन तास आणि तुरीच्या डाळीसाठी ४ तास लागले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जबरी आहे. अर्धगोलाकृती आकाराच्या आतल्या भागावर पडणारे किरण सगळे मध्यावर रिफ्लेक्ट होतात तसेच येथे उष्णतेचे होत असावे काय? आणि काळा रंग उष्णता टिकवायला ना?

ते मधले गॅजेट बघून मला वाटले काहीतरी कॉम्प्लेक्स तंत्रज्ञान असेल तेथे पण तसे दिसत नाही Happy

मस्त कल्पना!

सोलर कुकर मध्ये बाकी प्रयोगही करून पाहा. बेसन भाजणे, शेंगदाणे भाजणे, रवा भाजणे, चिवड्याकरता पोहे भाजणे इ. अजिबात लक्ष ठेवावे लागत नाही आणि मस्त भाजल्या जातात.

फा, हो ! सूर्याची किरणे अधिक परावर्तित करण्यासाठी पॅराबोलिक शेप आणि फॉइल/सिल्वर पेपर (मिरर सारखा इफेक्ट करण्यासाठी) वापरला आहे. भांडे छत्रीच्या फोकस पॉइंट वर ठेवली की जास्त उर्जा मिळते. https://en.wikipedia.org/wiki/Parabolic_reflector

थॅन्क्स पारू. मला फोटो पाहताना एक शंका आली - ती जी फॉइल आहे ती अत्यंत ताणलेल्या अवस्थेत लागली पाहिजे ना छत्री ला तो इफेक्ट यायला? जर त्यात घड्या पडल्या तर डिस्टॉर्शन होईल बहुधा.

पारू, मस्त!

फारेण्ड ची शंका रास्त वाटते. घरच्या घरी रिंकल-फ्री कव्हर करता आलं सिल्व्हर पेपर चं तर एफिशियन्सी वाढेल ना? सिल्व्हर पेपर ऐवजी अल्युमिन्यम फॉइल ही जास्त योग्य ठरेल का? फक्त एव्हढी सलग फॉइल कुठून मिळवायची आणि ती छत्रीवर कशी काय बसवता येईल ते कळत नाही.

Chhaanach aahe kalpanaa ! bhaanDe Aluminium che asel tar chaangale hoeel na ?

अफलातून मस्त कल्पक उपयोग!
तुमच्या तिर्थरुपांचे मनःपुर्वक अभिनंदन!

Pages