माझे भरतकाम (सेंटर पीसेस)

Submitted by सायु on 12 December, 2016 - 04:12

मी केलेले काही भरत कामाचे नमुने सादर करते आहे..
यात दांडी, साखळी,गहु,भरिव, गाठी टाका आणि हो काही ठिकाणी धावदोरा पण वापरला आहे..

१. सायकल आणि फुलांची बास्केट..

२. कॉकट्स पॉट...

३. फुलं- पानं आणि गुलछड्या घालुन एक काचेची बरणी..

४ जिराफ... (लेकाच्या आग्रहा खातर केलेला)
)

५) फुलदान का पर्णदान ?....:)

६) द्राक्षाचे घोस आणि सरबत.... (ह्यात साखळी टाका आणी द्राक्षांची रंगसंगती दिनेश दा यांनी सुचवली होती)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुंदर. !!. आणि हे सगळे नेहमीचे सगळे व्याप संभाळून करते हि. द्राक्षं तर बहुदा एका दिवसातच पुर्ण केली.

९६क ,शोभा,दिनेश दा, जयु, जाई हेमा ताई सगळ्यांचे आभार...

वा, सुंदर. !!. आणि हे सगळे नेहमीचे सगळे व्याप संभाळून करते हि. द्राक्षं तर बहुदा एका दिवसातच पुर्ण केली.+++ हो दा द्राक्षे एका दिवसात केलीत आणि तो सरबताचा ग्लास दुसर्‍या दिवशी...
तुम्ही सुचवल्या प्रमाणे केला, घरी पण खुप आवडला.. त्यामुळे तुम्हाला विशेष धन्यवाद.

सुरेख आहे सगळं. मला तो क्युट जिराफ जास्त आवडला ++ धन्स जाई..

मस्तं केलय. तुमच्या लेकाचे अभिनंदन, इतका छान जिराफ सुचवल्याबद्दल. गोड केलीय तुम्ही त्याला. बाकी सगळेही छान.

खूपच सुंदर केलाय सगळं, सायकल आणि सायकलच्या बास्केट मधली फुलं खूपच छान दिसतायत. जिराफ पण मस्तच हसतोय. तुमचं बघून मला पण खुमखुमी आलीय खूप दिवसात सुई नाही घेतली हातात, नक्की भरणार काहीतरी.

आऊ, पवनपरी मनःपुर्वक आभार..
तुमचं बघून मला पण खुमखुमी आलीय खूप दिवसात सुई नाही घेतली हातात, नक्की भरणार काहीतरी.++ नक्की करा..खुप रेफ्रेशींग वाटतं आणि ईकडे पण फोटो द्या..:)

सायू,
मी अख्ख्या दोन साड्या केल्या गं विनकामाने...
शाबूत असेल तर फोटो देईल त्या साड्यांचे.. केल्या त्यावेळी कॅमेराच एवढं फॅड नव्हत Sad

Pages