खा खा सुटे कुणाला

Submitted by देवा on 2 March, 2009 - 00:00

प्रेरणा: काटा रुते कुणाला
(शांता शेळके आणि जितेंद्र अभिषेकी.. क्षमस्व)

खाखा सुटे कुणाला
चेकाळतात कोणी
मग पोटही सुटावे
हा जैव रोग आहे ||धृ||
सुटे कुणाला...

सांगु कशी कुणाला
चव आटल्या दुधाची
क्षिर पाक साखरेचा
बघ तापतोच आहे||१||

काही करू पहातो
उठतो तवंग जेथे
हा रंग लाल असला
मिसळीस येत आहे||२||

ही जीभ पोट ओठ
काहीच आवरेना
अन लाळ ओघळोनी
हा देह चिंब आहे||३||

गुलमोहर: 

Biggrin Biggrin

देवा खूप दिवसांनी...

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      देवा ... Lol
      -----------------------------------------
      सह्हीच !

      Rofl
      ************
      हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
      मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

      साष्टांग दंडवत Happy
      एकदम जबरी.....आजकाल सैपाक घरातला वावर वाढलेला दिसतोय Wink

      वाह... 'काही करू पहातो...' सुंदर Happy

      मस्त रे देवा, मस्तच ! ! सह्हीच !! ! Happy

      सांगु कशी कुणाला
      चव आटल्या दुधाची ! >>>

      एकदम मस्तच ! आवडेश ! ! ! Happy Happy

      खा खा... Wink

      Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

      खा खा सुटे कुणाला... हे सही आहे Happy

        ***
        Entropy : It isn't what it used to be.

        देवा जबरदस्त रे.... झल्लास..!!!

        भारीच्च आहे.. Lol
        महान देवा महान _/\_

        फर्मास! एकूण एक ओळ मस्त आहे Lol

        धन्यवाद मंडळी..:)
        >>आजकाल सैपाक घरातला वावर वाढलेला दिसतोय
        जयावि, सवय करून घेतोय.. पुढे मागे येईल कामाला..:)

        जबरदस्त... चालीवर म्हणून पण बघितलं. अगदी फिट्ट बसतय... जियो....

        मस्त.. Happy

        ('प्रीती सुरी दुधारी'च्या चालीत पण बसतंय. Happy )

        'बाटा' नंतर 'खा खा'. आता पुढे काय?

        शरद

        नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
        ह्रदयावरच्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!

        देवा.. एकदम भारी.. Rofl
        =========================
        रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

        आई ग ! हसुन हसुन पुरेवाट -वाट लागली

        वाचून उपवास सुटल्यासारखे वाटले. एकदम मस्तच.
        जे.डी. भुसारे

        एकच नंबर आहे....लै भारी... Happy

        ०---------------------------------------०
        ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
        या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

        Pages