लग्न - एक चर्चा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2016 - 01:54

प्रेम माणसाला आंधळे करते...
लग्न डोळे उघडते..
उघड्या डोळ्यांनी जग दिसते..
ते जग फार सुंदर असते..
पण आपल्या काही फायद्याचे नसते,
........ कारण आपले लग्न झालेले असते Happy

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

हे शब्द माझे असले तरी विचार माझे नाहीत, बस्स असेच काहीसे ऐकत असतो माझ्या विवाहीत मित्रांकडून, पुरुष आणि महिला दोघांकडून..
कधी गंमतीत तर कधी सिरीअसली..

एक विनोद कम तत्वज्ञान कुठेतरी वाचलेले,
अविवाहीत विचार करतात की की विवाहीतांची मजा आहे,
विवाहीत विचार करतात की अविवाहीतांची मजा आहे
फरक ईतकाच, विवाहीत हा विचार दिवसा करतात, तर अविवाहीत रात्री Wink

पण जग झपाट्याने पुढे चालले आहे, शरीरसुखासाठी लग्न केले पाहिजे किंवा लग्न हाच एक शरीराची गरज भागवायचा मार्ग आहे हे चित्र समाजाच्या काही स्तरांत तितकेसे राहिले नाही. ईतर स्तरांतही कदाचित हळूहळू हा बदल होत जाईल. सलमानसारखा बॉलीवूडी अभिनेता असो किंवा कित्येक राजकारणी नेते असोत, लग्नावाचून काही अडत तर नाहीच उलट आयुष्यातील ईतर ध्येयांवर फोकस करता येतो याची उदाहरणे प्रचलित होऊ लागलीत. पुरुषांसारखेच स्त्री देखील शिक्षणाने महत्वाकांक्षी होऊ लागली आहे. जर दोघांचे ध्येय गाठण्याचे मार्ग वेगळे असतील तर एकत्र राहून आपापल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करणे अवघड होऊ लागले आहे. कुटुंब नियोजनात ‘हम दो, हमारा एक आणि एकच’ रुजू लागलेय, याचे कारण वाढती महागाई किंवा लोकसंख्या नसून त्या अपत्याचे पालनपोषण करायला पालकांना पुरेसा वेळ काढणे अवघड जाऊ लागलेय आणि त्यामुळे कित्येक जोडपी एकावरच थांबू लागली आहेत. बरं कोणी लग्नच केले नाही तर प्रश्नच नाही पण एकदा लग्न करून मूल होऊच द्यायचे नाही असे ठरवणे भावनिकदृष्ट्या अवघड जाऊ लागलेय. भावनिक गरज म्हणून कुटुंब आणि मूल हवेही आहे आणि त्यात अडकायचेही नाहीये अश्या काहीश्या द्विधा मनस्थितीत बरेच जण अडकले आहेत. कोणी लिविंग मध्ये राहण्याला सुवर्णमध्य म्हणून बघत आहेत पण तो पर्याय चाचपताना आणखी फसत आहेत.

हे सर्व आज सुचण्याचे कारण की, दहापंधरा वर्षांपूर्वी माझ्या वयाच्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता सुरू व्हायची. पण सध्या पालकसुद्धा मुलांच्या मागे तगादा लावत नसल्याने, त्यांचे ते काय ते शोधतील आणि ठरवतील असा विचार करत असल्याने, आमच्याकडे माझ्या लग्नाला घेऊन कसलीही घाई किंवा टेंशन नाही. माझ्या गर्लफ्रेंडच्या घरातही अशीच स्थिती आहे. किंबहुना माझ्या गर्लफ्रेंडच्या दूरच्या नात्यातील दोन सख्या बहिणी आम्हाला लग्नच करायचे नाही म्हणत वयाची तिशी उलटून गेली तरी आपल्या मतावर ठाम आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांच्याप्रमाणे ‘मला मुळी लग्नच करायचे नाहीये’ असा काही विचार मांडत नाही यातच ते समाधानी आहेत.

पण आम्ही मात्र विचार करायला घेतला आहे. जवळपास तीन वर्षांपेक्षा जास्त आमच्यातील नातेसंबंध टिकल्याने एकमेकांना झेलू शकतो हा विश्वास आम्हाला फायनली आला आहे. पण सोबत कैक प्रश्नही घेऊन आला आहे.
अगदीच पहिला प्रश्न - लग्न करायचे का? केले तर कधी करायचे? जर लग्नानंतर काही काळासाठी करीअरसाठी म्हणून एकाच शहरात दोघांना राहणे शक्य झाले नाही तर असे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप लग्नानंतर काम करते का? किंवा ती शक्यता जोपर्यंत आहे तो पर्यंत, म्हणजे करीअर सेट होईपर्यंत थांबावे का? कि लग्न करावे पण तोपर्यंत मूलाची जबाबदारी घेऊ नये हे योग्य राहते? उशीरा अपत्य झाल्यास कॉम्प्लिकेशन येणे, तसेच आपल्या निवृत्तीची वेळ येईपर्यंत मूल आपल्या स्वत:च्या पायावर उभे नसणे, अश्या अडचणी येत असल्याने आधीच लग्न उशीरा त्यात मूलासाठी आणखी थांबणे हे बरोबर वाटत नाही. दत्तक मूलाचा पर्याय दोघांनाही सहजपणे आतून तसे वाटल्याशिवाय त्याकडे एक पर्याय म्हणून बघणेही चुकीचे वाटते. लिव्ह ईन मध्ये राहण्याचा पर्याय खरेच लग्नापेक्षा सोयीस्कर आहे का? की आपले जे मन लहानपणापासून जश्या संस्कारांच्या प्रभावाखाली वाढलेय ते पाहता त्याला ही बंडखोरी फार काळ झेपणार नाही.

सो कॉलड कुटुंबसंस्था त्यातील बंधनांसाठी मोडावीशी वाटतेय पण त्यातील फायद्यासाठी राखावीशीही वाटतेय. पुन्हा आईवडिलांना काय वाटेल आणि त्यांना कोणाला काय उत्तरे द्यावी लागतील हा विचारही आलाच..

मला कल्पना आहे की प्रत्येकाची केस वेगळी असणार, पण तरीही प्रत्येकाचे केस बाय केस विचार ऐकून घ्यायला आवडतील. आज आपल्या भारतातील मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित समाज एकंदरीतच लग्नसंस्थेबद्दल कसा विचार करतो. मायबोलीवर ९० टक्के जनता याच गटात येत असावी, तसेच ज्या गटात आपण येतो त्याच लोकांना पकडून आपण राहात असल्याने आपल्या आसपासचा बहुतांश समाज त्यातच येतो, म्हणून ईथल्यांचे विचार जाणून घ्यायला आवडतील. यातून आपल्या आसपासच्या समाजाचे एक चित्र डोळ्यासमोर उभे राहील.

- आणि हो, मला नेमके काय म्हणायचे आहे हे कळले नाही किंवा मी एक ना धड भाराभार बोललो आहे, असे तुम्हाला वाटू शकते. पण मग आमची नजरेशनच लग्न या विषयावर कन्फ्यूज आहे असे समजून ते चालवून घ्या Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे प्रश्न सगळ्याच 'लग्नाळू' लोकांना पडलेत हो...पण उत्तरं कुठुन मिळणार?
लग्न झालेले लोक पण समाधानकारक ( पेक्षा पाॅझिटिव्ह) उत्तरं देत नाहीत.

चिन्मयी, बरोबर आहे आपले. दर चार सहा आठ वर्षांनी लग्नाळू मुलांचा एक गठ्ठा तयार होतो, जो याच प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असतो.
पण प्रत्येक पिढीला त्याची उत्तरे नव्याने शोधायची असतात. हीच तर खरी गंमत आहे.

@ ऋन्मेष, प्रत्येक पिढीला त्याची उत्तरे नव्याने शोधायची असतात. हीच तर खरी गंमत आहे.>>> +१

आपले तत्वज्ञान नेहमीच भारी असते. Happy

आपले कौतुक वाटते. किती तेज (fast) विचार करता आपण.

तुम्हाला जे काही लग्नाचे / बिन-लग्नाचे फायदे -तोटे वाटत आहेत ते लिहून काढलेत तर कदाचित तुमचंच तुम्हाला उत्तर मिळेल.

आपला स्वभाव, आपली कुवत, आपल्या आयुष्यात आपण कोणत्या गोष्टींना कीती प्राधान्य देतो, आपली स्वप्ने, आयुष्याकडून आपल्या अपेक्षा ह्या सर्वांचा विचार करून प्रत्येकाने आपापली उत्तरे शोधायची असतात!! इतरांचा अनुभव आपल्या कामी येत नाही आणि हे केवळ लग्नाबाबतीतच नाही तर कोणताही निर्णय घेताना लागू होते.

Happy मला रस्त्याने चालताना हातात हात घालून चालायला कोणीतरी हवं होते, ज्याचाबरोबर चालायला मला चांगलं वाटेल आणि कोणी माझ्या ओळखीचे मला असं चालताना बघून भुवया वर करणार नाहीत.

राजसी __/\__

हा प्रणाम एवढ्यासाठी की आपल्या या वाक्याने एक फार जुनी आठवण आठवली.
माझे आताच्या गर्लफ्रेंडशी जेव्हा नुकतेच जुळले होते, म्हणजे आम्ही फ्रेंडशिपवरून लवशिपच्या घरात सरकलो होतो, तेव्हा एकदा आम्ही रस्त्यामधील डिवायडरवरून चाललो होतो. खरे तर ती डिव्हायडरवरून चालत होती आणि मी तिचा हात धरून खालून रस्त्यावरून चालत होतो. तिचा मूड जरा भारी असल्याने ती जरा अल्लड बालकासारखे नाचत उड्या मारत चालत होती. आणि मी तिचे ते वागणे, ते रूप एंजॉय करत होती. त्यानंतर ती मला म्हणालेली की यासाठी तू मला माझ्या आयुष्यात आणि आहेस कारण मी तुझा हात पकडून रस्त्याच्या मधून बिनधास्त उड्या मारत चालू शकते. याची ना मला लाज वाटते ना संकोच ना कसली भिती Happy

>>दर चार सहा आठ वर्षांनी लग्नाळू मुलांचा एक गठ्ठा तयार होतो,

हे चार सहा आठ चे लॉजिक काय आहे?

आजकाल हे "लग्नाच्या" बाबतीत आमचा कसला गोंधळ होतोय म्हणायची फॅशन आलीय बहुदा!
Some people just love to "be confused"

स्वरूप, कन्फ्यूजन हे फॅशन नसून खरोखर तसे होत असावे. होत आहे. त्यामुळे त्याची कारणे शोधायला हवीत.

एक काळ होता जेव्हा आईवडील मुलांच्या लग्नाचा निर्णय घ्यायचे. मुलांची आवडनिवड जराही लक्षात घेतली जायची नाही. म्हणजे कन्फ्यूजनचा प्रश्नच नाही. कारण आईवडीलांचे निकष ठरलेले असायचे. जातपात, तोलामोलाचे घराणे आणि मानपान बघितले की झाले. ईतर गोष्टी तुलनेत गौण.

मग एक जमाना आला जिथे मुलांची ईच्छा विचारली जाऊ लागली. त्यांनाही नकार द्यायचा अधिकार दिला जाऊ लागला.

मग हळूहळू मुलांची आवड लक्षात घेऊ जाऊ लागली. आईवडील आणि मुले दोघांना पसंत पडेल हे बघितले जाऊ लागले. 50-50 चा जमाना म्हणू शकतो ...

मग एक हल्लीहल्लीचा जमाना ज्यात मुलेच आपला जोडीदार शोधतात पण तरीही आईवडीलांची पसण्ती त्यांचे मन राखण्याचा प्रयत्न असतोच.

पण आता जो काळ येतोय त्यात आईवडिलांची पसण्ती असो वा नसो मुलांनी ठरवले की झाले. तो त्यांच्या आयुष्याचा निर्णय आहे. आईवडीलांची शून्य ढवळाढवळ..

आता यात गंमत अशी की जोडीदार निवडायची संपूर्ण जबाबदारी हळूहळू आता मुलांवर स्वत:वर येतेय. त्यांना या निर्णयाची जबाबदारी स्वत: घ्यायची आहे. पण प्रश्न हा आहे की ते पेलण्यास सक्षम आहेत का?

येणारया पिढ्या सक्षम असतील. कारण ते त्या मानसिकतेतच लहानाचे मोठे झाले असतील. पण हा जो बदलाचा संक्रमण काळ आहे ज्यातून आमची पिढी जातेय, ती लहानाची मोठी होताना या बदलासाठी पुर्णत: तयार झाली नाहीये. आम्हाला हे निर्णयाचे स्वातंत्र्य हवेही आहे पण लहानपणी आपल्या आधीच्या पिढीला बघताना पुढे जाऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळणार आहे याची कल्पना नसल्याने ती जबाबदारी उचलायची मानसिक तयारीही तितकीशी झाली नाहीये. म्हणून आता त्या दडपणाखाली अशी कन्फ्यूज अवस्था होत असावी Happy

मला तरी काहीही कंन्फ्यूजन दिसत नाहीये, ऋन्मेश. सगळाच विचार मोठ्याने करून झालाय की.
उरलेलं सगळं खरतर करूनच बघण्यातलं आहे. तेव्हा...

ऋन्मेष माझा अनुभव सांगते.
जन्माचा जोडीदार अठरा- एकोणीसाव्या वर्षीच मिळाला.
तरीही २३ व्या वर्षीपर्यंत शिकणे चालू असल्याने लग्नाचा विचार केलाच नाही.
नंतर दोन वर्षे लिव इन- त्याच्याचबरोबर!

शेवटी घरचे मागे लागले लग्न करा म्हणून.
मग अक्षरशः फॉर्मॅलिटी म्हणून चार दिवस सुट्टी घेऊन लग्न उरकून आलो.
Happy

मुंबईतच राहिलो असतो तर कुणी काहिही विचारलं नसतं असा अनुभव आहे.
पण इथे बारक्या गावात मात्र ऑफिशीयली लग्न होणं कंपल्सरी आहे.

आता इतक्या वर्षांनी मुलंबाळं, सामाजिक मान्यता , मुलांचं समाजातलं स्थान, आपल्या इतरांच्यापेक्षा वेगळ्या वागण्याने मुलांना समज यायच्या आधीच हेटाळणीला सामोरं जावं न लागणं या सगळ्याच्या दृष्टीने लग्न केलं ते चांगलंच झालं असं वाटतं.

मुलं मोठी झाल्यावर आईबाबा मॅरीड नाही आहेत किंवा त्यांना लग्नाबाहेरही स्वतःचं आयुष्य असू शकतं हे समजून घेऊ शकतात कदाचित.
पण लहानपणी मुलांना एक छोटंसं, सुरक्षित, स्वतःचं असं आईबाबांसह विश्व असावं असं मला वाटतं.
तसं नसेल तर मानसिक जडणघडणीत काहितरी मोठ्ठा फरक पडतो त्यांच्या.

हां आता मुलंच नको म्हणालात तर आरामात लिव्ह ईन्/ओपन मॅरेज हे ऑप्शन कंटिन्यू करू शकता.

साती, आपले लिव इन मध्ये राहून झालेय. कमाल आहात.
मुलांबाबतचा आपला मुद्दा पटला. तो विचार करता लिव इन मध्ये मूल न होऊ देणे किंवा त्या आधी काय ते फायनल ठरवून लग्न उरकणेच योग्य.

दाद धन्यवाद, हो मोठ्याने विचार करून झाला आहे. फक्त तो विचार बाहेर मांडल्याशिवाय माझे समाधान होत नाही. ऐकावे जनाचे करावे हे मी कटाक्षाणे पाळत असलो तरी मनाचे करायच्या आधी जनाचेही ऐकायला आवडते.

श्री, आयडीचं लग्न Happy
एखादी महिला आयडी नजरेत असेल तर सांगाल. माझी गर्लफ्रेण्ड माबोवर आयडी नाही काढणार, कारण अशीही ती मायबोलीला आपली सवत समजते Happy

सस्मित, एक प्रत्यक्षातले. एक आयडीचे. उद्या तुम्ही तुळशीचेही मोजाल आणि किती लग्न म्हणून ओरडाल Happy
तसेही त्या दिवशीच्या चर्चेचा संदर्भ घेता आम्ही दोघेही नोकरीधंद्याला जाणारे असू तर मुलांना सांभाळायला म्हणून दोघांपैकी एकाला दुसरे लग्न करावेच लागणार Happy

ऋन्मेष,
कमाल काही नाही त्यात.
माझ्या ओळखीत बरेच जण आहेत ज्यांनी हा अनुभव घेतलाय, घेत आहेत.

हायला मग माबोकरच कमाल आहेत म्हणायचे.
तसे माझ्या गर्लफ्रेंडच्या नात्यातही एक जण लिव ईन मध्ये राहत आहे, ते देखील एका विधवेबरोबर जिला मूलही आहे. आणि त्यांनी स्वतःचे वेगळे मूल होऊ न देता त्यालाच सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.

पण त्यामुळे उद्या माझी गर्लफ्रेंड सुद्धा त्याच्या कडे बोट दाखवत मला सुद्धा असे राहायचे म्हणू शकत नाही. कारणे दोन. एक तर तो मुलगा आहे आणि ही मुलगी. त्यामुळे निकष वेगळे लागतात. आणि दुसरे कारण म्हणजे त्याचीही काही आरती ओवाळली जात नाही तर त्यांच्या नात्यातलेच लोकं त्याला कुजकट टोमणे मारताना पाहिलेय.

ऋन्मेऽऽष..
तु काहीपण केल तरी लोक नाव तर ठेवणारच रे..
लोकांचा विचार सोड जे तुला आणि तुझ्या गफ्रेला वाटतं ते करा फक्त एकदा आईवडीलांचा सल्ला घे

कॉफी विथ करण पाहतोस का? अक्षय व ट्विंकल आले होते तो भाग बघ. हॉटस्टारवर आहे. तिने मस्त सांगितलीत लग्नाची कारणे व लग्न करण्यापूर्वी जोडीदाराची काय माहिती काढणे गरजेचं आहे ते! ड्रामेबाजीही आहे त्यामुळे बघायला मजा येईल.

@ ऋन्मेष, प्रत्येक पिढीला त्याची उत्तरे नव्याने शोधायची असतात. हीच तर खरी गंमत आहे.>>> +११११

jevha kahihi dhaage kadhnara Runmesh ashya mature comments deto ...tevha kharach bharun yete mala.... Lol

अक्षय ट्विण्कलचा विडिओ काही तांत्रिक कारणांनी अर्धाच बघता आला, पण त्यातूनही दोन गोष्टी समजल्या ..

1) एकमेकांची ज्योतिष कुंडली नाही बघितली तरी चालेल पण मेडीकल कुंडली जुळवून घ्यायची.
2) वयाची चाळीशीनंतर वा पन्नाशीला पोहोचताना दोघांनीही ईक्वली फिट आणि टकाटक दिसणे अति गरजेचे. (जर आपण कमी पडलो तर जोडीदारालाही अरबट चरबट खिलवून आपल्या लेवलला आणायचे)