तडका - हे सत्य आहे

Submitted by vishal maske on 3 December, 2016 - 09:25

हे सत्य आहे

विश्वासाच्या पडद्याखाली
अंधत्वाने जपलेले आहेत
बुवा बाबांच्या वेशामध्ये
नराधमही लपलेले आहेत

अध्यात्माच्या पदरा आडून
रासलीला खेळल्या जातात
अंधविश्वासी काया सहज
धोक्यामध्ये घोळल्या जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल सर, अगदी बरोबर .!!!!!!!!!
पण विचार केला तर या सर्वासाठी आपणच जबाबदार आहोत,कारण कितीही सांगितलं तरीही लोक ह्या असल्या ढोंगी बाबांवर लगेच विश्वास ठेवतात..तो काय तर म्हणे देवाचा अवतार!!
आपण सर्वानी ठरवलं कि काहीही झालं तरी अश्या लोकांकडे जायचेच नाही,तो आपल्याला सांगणार मग आपण एखादा मार्ग अवलंबनार .आपण काय लहान बाळ आहोत का?????
ज्याला प्रत्येक वेळी बाबांची गरज आहे????????????

पु.ले.शु................