जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?

Submitted by गणेश कुलकर्णी on 2 December, 2016 - 07:45

जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
कुणाचा कुणाला इथे मेळ आहे? || १||

मी निघालो तिला भेटायला आता असा
तिला कुठे मला भेटायला वेळ आहे? || २||

दु:खं केव्हाचे सोबत माझ्या जन्मल्यापासून
त्याच्यासाठी कवितेत एक राखीव ओळ आहे !|| ३||

ही तुझी सोसायटी, ही माझी सोसायटी...
सांग कुठे आता राहीले गल्ली बोळ आहे ? ||४||

मी माझे स्वच्छ मन घेऊन फिरतो 'समीप '...
पण मेंदूत चालतो कसला घोळ आहे ? || ५ ||

***************************
गणेश कुलकर्णी (समीप)
०८०५९९३२३६८
***************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users