चित्रपटगृहांत राष्ट्रगीत अनिवार्य - सुप्रीम कोर्टाचा आदेश

Submitted by भास्कराचार्य on 1 December, 2016 - 04:21

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...

ह्या निर्णयावर काहींनी असहमती दर्शवली आहे, तर काहींनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. मला स्वतःला 'राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे' हे वाटतेच. शाळा किंवा महाविद्यालयांतही अगदी ते रोज वाजवले गेले पाहिजे, असे वाटते. कारण ह्या संस्थांतून देशाचे नागरिक घडत असतात. परंतु चित्रपटगृहासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून त्याचा सन्मान झाला पाहिजे, हा नियम काही कळत नाही. देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. परंतु ही प्रतीके अशी जनसामान्यांना चित्रपटगृहात दाखवून काही फरक पडेल का, हे कळत नाही. अर्थात, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावल्यावर मी उभा राहतोच, व राहीनही. पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्रात हा नियम आधीपासूनच होता, पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला असल्याने तो देशभर झाला आहे, व तो सुप्रीम कोर्टाचा असल्याने त्यात बदल करणे अशक्यप्राय आहे. ह्याबद्दल मायबोलीकरांतही मतांतरे असतील, ती जाणून घेण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स , तुमची ती पोस्ट तुमच्या नावाशिवाय वॉटसॅपावर गेली आणि मला माबोअनरिलेटेड लोकांकडून फॉर्वर्ड झाली.
वॉट्सॅप पहा!

Just in - Supreme Court rejects petition to make National Anthem mandatory in Courts.

Details awaited.

चिनूक्स, awaiting further information.
अमा, I'm not generalizing. I can bet on my statement and I know I'll win hands down Happy If you think otherwise, please prove me wrong!

मला असं कळलंय की बहुतेकांना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय याची सुतराम कल्पना नसते. एक भारतीय म्हणून मी खरच स्वतंत्र आहे का? तर मुळीच नाही अरेरे बहुतेक लोकांना स्वातंत्र्याची भीती वाटते. मर्यादित स्वातंत्र्य किंवा जे मिळेल त्यालाच स्वातंत्र्य मानणे हे सगळ्यात सोप्पं! व्यक्तिस्वातंत्र्याचा विरोध करणारे भित्रे असतात कारण स्वातंत्र्याबरोबर जी जबाबदारी येते ती पेलण्याची हिंमतच नसते अंगात! मग नैतिक परंपरा आणि नसते कायदेकानून यांचं लोढणं गळ्यात अडकवून आपण कसे स्वतंत्र अशा गैरसमजूतीत आयुष्य जगत रहायचं! फक्त देश स्वतंत्र आहे म्हणून देशातली जनता आपोआप स्वतंत्र होत नसते. ज्या दिवशी लोकांना ही जाणीव होईल तो खरा स्वातंत्र्यदिन असेल!

जिज्ञासा,

मला असं कळलंय की बहुतेकांना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय याची सुतराम कल्पना नसते हे माझ्याबाबतीतही खरं आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ? त्यात काय काय अंतर्भूत असतं?
माझ्यामते तरी संपुर्ण 'स्व'तंत्र व्यक्ती असं काही नसतंच बहुतेक
आपल्या सगळ्यांवरच कसले ना कसले न पुसता येण्याजोगे संस्कार हे असतातच मग तो वेगळा / चहुबाजूनी विचार करण्याची शिकवण देणारा का असेना.

रोजच्या जगण्या देखिल मन मारून जगणारी, त्याग आणि बलीदान वगैरे करणारी माणसे ज्या समाजात बहुसंख्येने आहेत तिथे व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पनाच खूप परकी आहे असे नाही का वाटत. आपल्यातल्या ज्याने व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून उमजून त्या स्वातंत्र्याबरोबर आलेली जबाबदारी पेलली आहे, अशी एखादी व्यक्ती जिच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघावे असे कोण सांगता येईल का?

चिनूक्स , तुमची ती पोस्ट तुमच्या नावाशिवाय वॉटसॅपावर गेली आणि मला माबोअनरिलेटेड लोकांकडून फॉर्वर्ड झाली.
वॉट्सॅप पहा!
>>>
हायला मी काल परवानगी मागितलेली तीच पोस्ट का?
बाकी हे मी नाही केले आहे हा, मी ईथे आजवर कित्येकांकडे अशी परवानगी मागितली आहे. तरी जर मी ती पोस्ट हायलाईट केल्याने असे घडले असेल तर बहुतेक मी परवानगी विपुत मागायला हवी होती. पण याची कल्पना नव्हती.

एकाच व्यक्तिस्वातंत्र्य दुसऱ्याच व्यक्तिपारतंत्र्य असू शकतं, अश्या वेळेला काय करायचं. कदाचित जास्त लोकांना मला काय नको हे माहित असत. जे लोक मला काय हवं चा विचार करतातं ते काहीतरी बदल घडवू शकतात.

राष्ट्रगीताला उभे राहणे हे देशभक्तीचे प्रदर्षन का वाटते? ते आपसुक घडायला हवे ना?
राष्ट्रगीता ऐवजी 'स्थळाचे' औचित्य साधुन सन्मान पुर्वक राष्ट्रगान (वंदे मातरम..) ऐकवले/दाखवले तर जास्त संयुक्तिक होईल का?

हर्पेन, आपण कोणीच कधीच संपूर्णपणे स्वतंत्र नसतो हे खरंच आहे पण मला वाटत की आपल्याला कोणत्या बंधनात अडकायचे आहे याचे स्वातंत्र्य हवे! स्वातंत्र्य म्हणजे अनिर्बंध वागण्याची परवानगी नाही. मला वाटतं व्यक्तिस्वातंत्र्याविषयीचा हा एक मोठा गैरसमज आहे. व्य. स्वातंत्र्य म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःची जबाबदारी स्विकारणे. You have to own your thoughts and actions (so you have to first think and act). जोवर एखादी व्यक्ती तिच्या कृतीमुळे कोणाचेही (स्वतः, इतर माणसे, निसर्ग, वस्तू) नुकसान करत नाही तोवर त्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे वागता यायला हवे. पण असे होत नाही.
एखादी व्य. स्वातंत्र्य जपणारी व्यक्ती जिचा आदर्श ठेवता येईल असं मला पटकन सुचलेलं नाव म्हणजे दुर्गा भागवत. पण आदर्श म्हणण्यापेक्षा मी त्यांना प्रेरणादायी असं म्हणेन. कारण व्यक्तिस्वातंत्र्य हे शेवटी व्यक्तिसापेक्ष असणार. मला त्या दृष्टीने गांधीजी देखिल एक व्यक्ती म्हणून फार स्वतंत्र होते असं वाटतं. अर्थात जोडीने ते एक प्रभावशाली नेते असल्याने त्यांच्या स्वतंत्र विचारांचे परीणाम त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. But he had the guts to experiment and think out of the box.

कुठलेही प्रतिसाद न वाचता माझे मत -

जिथे जिथे राष्ट्र्गीत वाजते तिथे त्याचा योग्य तो मान ठेवला पाहिजे. राष्ट्रगीत कुठे वाजवले पाहिजे हे कोण ठरवते याची कल्पना नाही.

चिनुक्स तुझी मते नेहेमी व्यक्ती निरपेक्श आणि मुद्देसूद असल्याने तुझ्या मतावर माझा प्रतिसाद देत आहे. मला कायद्याची फारशी कल्पना नाही. सिंपली गोईंग बाय वॉट मेक्स सेन्स -

१. जनतेच्या मनात राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती निर्माण करणं हे कोर्टाचं काम नाही. आजचं निकालपत्र नीट वाचलं, तर त्यात अनेक गफलती आहेत. १९८६ साली सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि हा निर्णय यात पूर्ण फरक आहे.

---> कोर्टाने दिलेल्या निर्णयात फरक असू शकतो. विरोधाभास असेल तर अपील होणारच!

२. कोर्टानं शिवाय 'constitutional patriotism' असा शब्दप्रयोग केला आहे. असा प्रयोग करून कोर्टानं दिलेला अंतरिन आदेश मात्र पूर्णपणे घटनेच्या चौकटीला धक्का लावणारा आहे.

---> कल्पना नाही. अधिक जाणून घ्यायला आवडेल.

३. मी उभा राहिलो नाही, तर मला शिक्षा कोण करणार? शिक्षा काय असेल? २७ तारखेला पुन्हा सुनावणी होईल, त्यात काही बाबी स्पष्ट होतील, अशी अपेक्षा आहे.

--> पटले

४. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती अशी सक्तीनं निर्माण करता येते का? ती निर्माण झाली, असं नक्की कोण आणि कसं ठरवतं? थोडी सक्ती आणि पुष्कळ सक्ती यांत काय फरक आहे?

--> पटले

५. राष्ट्रगीत ऐकायला आवडतं, थेटरातल्या ध्वनिव्यवस्थेमुळे मज्जा येते वगैरे ठीक. पण मुळात मी पैसे खर्च केलेले असताना मी काय पाहायचं, हे दुसरं कोणी का ठरवावं?

---> पटले नाही. इन फॅक्ट कळलेच नाही. मला वाटलं की चित्रपट, नाटक, खेळ अश्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वेच्छेने फक्त येता.. तुम्हाला काय बघायला आवडतं तेच तुम्हाला बघायला मिळेल अशी खात्री नाही.

६. मला ते गाणं आवडतं, म्हणून मी सक्ती सहन करत असेन, तर अशीच सक्ती मी नावडती गोष्ट करण्याच्या बाबतीतही सहन करेन का?

----> हा मुद्दा कुठे जात होता ते कळले नाही. आवडत्याची सक्ती होत नाही. नावडत्याचीच सक्ती होते.

७. ही सक्ती चित्रपटगृहातच का? तेही दरवाजे बंद करून? म्हणजे सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाविरुद्ध असलेली क्रिया करून? म्हणजे ही जबरदस्तीच. नाटकांच्या वेळी का नको राष्ट्रगीत? नाटक ही तर जीवनावश्यक बाब आहे.

---> पटले. Happy

८. राष्ट्रगीत म्हणून, तेही चित्रपट बघण्याच्या आधी, देशभक्ती सिद्ध होते का? होत असल्यास, कशी? मी माझं काम प्रमाणिकपणे करतो, वाहतुकीचे, स्वच्छतेचे नियम पाळतो, सरकारी / सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत नाही, कर चुकवत नाही, हे पुरेसं नाही का?

---> पटले. पण समजा वाहतुकीचे नियम न पाळता, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करीत एखाद्याने अतिरेकी पकडून दिला तर तो देशभक्त नाही का? काय पुरेसं हे कोण ठरवणार?

९. राष्ट्रवाद ही संकल्पना आपल्याकडे युरोपातून आली. भारतातल्या बहुविधतेला ही संकल्पना छेद देते. बाकी सगळ्या पाश्चात्त्य संकल्पनांना तुच्छ लेखणारे आपण, हीच संकल्पना कवटाळून का बसतो?

---> मला वाटतं नॅशनॅलिजम आणि पॅट्रिऑटिज्म मध्ये फरक असावा.

१०. रवीन्द्रनाथ ठाकूर हे राष्ट्रवाद आणि देशभक्ती या संकल्पनांचे कट्टर विरोधक होते. राष्ट्रगीत आवडतं म्हणून ऐकायला काय हरकत आहे, किंवा सक्ती हवीच असं म्हणणार्‍यांनी गुरुदेवांचा 'Nationalism' हा निबंध वाचला आहे का?

----> हेही पटले नाही किंवा कळले नाही. गुरुदेवानी हे गीत राष्ट्रगीत म्हणून निवडलं का? तसं नसेल तर गुरुदेवानी अजून काय लिहिलं आहे ते वाचून या विषयावर तोडगा का निवडावा?

११. राष्ट्रगीत थेटरात ऐकायला हरकत नसणार्‍यांनी हायपर-राष्ट्रवाद किती घातक असू शकतो, याबद्दल वाचलेलं नाही का? इटली, जपान, जर्मनी यांनी जगाचा किती छळ केला, हे आपण इतक्यात का विसरलो?

---> पटले.

आत्ताच या विषयावर तासभर बडबड करून आल्यानं तूर्तास इतकंच.

पटले नाही. इन फॅक्ट कळलेच नाही. मला वाटलं की चित्रपट, नाटक, खेळ अश्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वेच्छेने फक्त येता.. *तुम्हाला काय बघायला आवडतं तेच तुम्हाला बघायला मिळेल अशी खात्री नाही*.

>> मग मला जे बघायचे आहे ते बघायला मिळत नसल्यास दुर्लक्ष करण्याची, मोबाईलवर टीपी करण्याची किंवा चक्क झोपा काढायची सुद्धा मुभा आहे. तशी याही बाबतीत मिळावी असं लिहिलं तर तुम्ही लगेच मला देशद्रोही ठरवणार.

भारतात प्रत्येक गोष्ट सुरु करण्याआधी राष्ट्रगीत गायले जावे. अगदी न्यायालयाचे सत्र पासून ते सत्यनारायणची पुजा घालताना देखील. देवाच्याही आधी देश येतो. पुजा सांगणार्‍याने आधी राष्ट्रगीत म्हणावे मगच पुजा करावी. तेच लग्न सुरु होताना देखील करावे. इतकेच काय टिव्हीवर सुध्दा नविन चित्रपट चालू होण्याआधी राष्ट्रगीत चालू करावे.
देशासाठी ५८ सेकेंद देता येत नाही का? एक दोन जाहीराती कमी दाखवली जावी. तेच मालिका सुरु होण्याआधी ही करता आले तर अतिउत्तम. लोकांना स्वातंत्र्याची किंमतच राहिली नाही. प्रत्येक ऑफिस कारखाने इ. मधे देशात एक वेळ ठरवली पाहिजे. त्यावेळेस रस्त्यांवरचे भोंगे रेडीओ. टिव्ही इ. माध्यमांमधुन राष्ट्रगीत चालू केले पाहिजे.
देशातील प्रत्येकाने त्यावेळेस राष्ट्रगीताकरीता तयार व्हावे. समजा सकाळी ९ वाजता राष्ट्रगीताची वेळ असेल तर त्यावेळे पुर्वी सगळ्यांनी आपापली कामे आटपून रस्त्यावर उभे राहून राष्ट्रगीत गाण्यास प्रारंभ करावा
ट्रेन बस टॅक्सी इ. त्यावेळेस थांबले पाहिजे. जीवनावश्यक सेवांना मात्र त्यातून वगळले पाहिजे.

तरच पुढची पिढी प्रखर जाज्ज्वल्य देशभक्त बनेल.

पण मुद्दा असा की, आरती देवांची, देवाला उद्देशुन म्हणत, देवाशी बोलत असता, देवाकरता आदर दाखविणे म्हणून उभे रहाणे आपसुक घडते, तसे "संस्कार" आहेत , तिथे "व्यक्तिस्वातंत्र्य" आड येत नाही, आड येत असेल, तर खपवुन घेतले जात नाही, अशा व्यक्ति खड्यासारख्या बाजुला फेकल्या जातात.

>> Uhoh

चेन्नईच्या एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवलं जात असताना उभे न राहिल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्यांत दोन महिलांचा समावेश आहे.

या मारहाण करणार्‍यांना आहे त्या कायद्याखाली की शिक्षा होणार की त्यांना काही पारितोषिक वगैरे दिलं जाणार? दोन्हीही होऊ शकतंच म्हणा.

काही जणांनी वंदणिय कृत्य केल्यामुळे मुजफ्फरपुर मधे त्यांचा जसा "जाहीर सत्कार" केलेला. तसाच जंगी सत्कार त्यालोकांचा एकमेव देशप्रेमी, राष्ट्रवादी पक्षा तर्फे केला जाऊ शकतो.

हे सर्व प्रकार आणि झाडू या सदस्याने मी माझ्या प्रोफाईलवर कुठले चित्र लावायचे यावरून दिलेले प्रतिसाद हे एकाच पातळीवरचे आहेत. स्वतःची ओळख नाही, द्यायची हिंमत नाही आणि दुस-यांच्या प्रोफाईलची माहिती वारंवार कॉपी पेस्ट करताना लाज नाही का वाटत ?

काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रगीत गाताना सुपर कॉमेडी ,

https://www.youtube.com/watch?v=0_1Ch8B9vZw
Congress suprb comedy singing jana gana mana kerala

https://www.youtube.com/watch?v=4y7ljJwX-WI
Congress leader's selfie disrespect for national anthem | Cauvery News

झाडू यांनी भाजप्यांचे दिल्यावर इतके दिवस शोधायला भक्त मुर्खांना लागले Biggrin
ते ही केरला साऊथ इंडियावाल्यांचे शोधले अरे रे रे रे

बुद्धीची किव करावी की माणसाची ? Happy

कोणत्याही भारतीयांना आपले राष्ट्रगीत नीट म्हणता येत नसेल तर तितकीच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांचा प्रांत पक्ष धर्म जात पाहून काय मिळतंय.

बरोबर हार्पेन पण एका नॉर्थ वाल्याला न येण आणि साऊथ वाल्याला न येण यात फरक आहे
राष्ट्रगीत यायला हवेच यात वाद नाही
पण भाजप्ये उघडे पडल्यावर भक्त पिसाळला आहे वर बघितले ना Wink

बरोबर हार्पेन पण एका नॉर्थ वाल्याला न येण आणि साऊथ वाल्याला न येण यात फरक आहे >>>>> हे कळलं नाही. राष्ट्रगीत गाण्यात नॉर्थ आणि साऊथ असा फरक का?

Pages