आशा ___ ३७५

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 November, 2016 - 17:26

ही तीच तर नाही?
नताशा ! टी वाय बी कॉम, ब्यूटीक्वीन ..
ह्मम, तीच तर दिसतेय .. बाहेरची ती लाल गाडी, तिचीच असणार. आजही चेहर्‍यावरचा अ‍ॅटीट्यूड काही कमी दिसत नाही.. प्रदीप स्वत:शीच बोलत होता,

कॉलेजच्या फायनल ईयरला असताना शेजारच्या क्लासमधील ज्या मुलीला त्याने प्रपोज केले होते ती आज त्याला सहा वर्षांनी दिसत होती. ती एक कमालीची सुंदर मुलगी होती, तर हा यथातथाच. तरीही चान्स घेतला होता. लागला तर जॅकपॉट. नाहीतर नकार ऐकायची मनाची तयारी ठेवली होतीच. अपेक्षेप्रमाणे नकारच आला होता. तो ही पहिल्याच फटक्यात. समोरून त्याच्या मनाचा जराही विचार न करता. त्यामुळे नाही म्हटले तरी दुखावला गेला होता. त्याचे साधारण रूप, ज्याचे तो काहीही करू शकत नव्हता ते त्याच्या प्रेमाच्या आड आले होते. पण त्याचवेळी तो सुद्धा तिच्या रुपालाच भुलला होता हे देखील एक सत्य होतेच. तीच नताशा आज अचानक ईतक्या काळाने त्याला पुन्हा दिसत होती. हृद्यात एक कालवाकालव तर होणारच होती. आपला अर्धा संपलेला कोल्ड्रींकचा ग्लास त्याने पुढचा घोट न घेता तसाच खाली ठेवला. आता त्याला ते सावकाश संपवायचे होते.

इतक्यात त्याला हॉटेलच्या दारातून एक टक्कल पडलेला थोराड वाटणारा ईसम आत येताना दिसला. ऊंची सूट आणि पेहराव पाहून कोणीतरी मोठी असामी असावी हे ओळखू येत होते. तो थेट तिच्याच दिशेने जात होता. त्याला पाहून तिच्याही चेहर्‍यावर हास्य पसरले. त्याने तिच्या जवळ जात बसल्याजागीच तिला एक आलिंगन दिले आणि तिच्या कानात हळूवारपणे काही कुजबुजून मागे फिरला. ईथे याला अंदाज बांधणे अवघड नव्हते..

पैसा! जर तुमच्याकडे सौंदर्य नसेल तर त्याजागी पैसा हवा. पैसा ही एकच अशी गोष्ट आहे जी सौंदर्याची कमतरता भरून काढते. आपणही तो कमावू शकलो असतो, कमावू शकतो. पण तोपर्यंत आपल्या वयाची पस्तिशी उजाडेल. तिशीच्या आत असा रुबाब झाडायला बापजाद्यांचीच मिळकत हवी. याच नैराश्यात त्याने कोल्ड्रींकचा ग्लास उचलला आणि एक मोठा घोट घेतला.

तेवढ्यात त्याला तिचा आवाज ऐकू आला. ईतक्या वर्षांनीही त्याने तो बरोबर ओळखला. त्या मगासच्या माणसालाच तिने पाठीमागून हाक मारलेली.., दादा !

ओह्ह दादा, आणि आपण उगाचच तिच्याबद्दल वेडावाकडा विचार केला. पैश्यासाठी ती अशीच कोणाबरोबरही लग्न करणार नाही. तिच्या सौंदर्याला साजेसाच शोधणार....

ती आपली नाही तर नाही, पण एखाद्या आपल्यापेक्षाही साधारण दिसणार्‍या थोराड माणसाला ती मिळाली नाहीये याचा त्याला आनंदच झाला होता.
त्याची नजर आता तिच्या गळ्याभोवती भिरभिरत होती. त्यात कोणाच्याही नावाचे लायसन नव्हते. स्टिल सिंगल!
आणि इतक्यात ती आपली कॉफी संपवून उठली..
एवढ्या वेळ त्याच्या नजरेस न पडलेल्या कुबड्या उचलून निघाली..
किंचितशी लंगडत च् ...

आणि इथे याच्या मनात आशा पल्लवित झाल्या..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ऋन्मेष, कथेतील नायिका, नायक दिसायला आपल्या तोडीचा नाही म्हणून त्याला नाकारते तर कथेतील नायक, नायिका अपंग झाली म्हणजे ती आता आपल्या तोडीची झालीय असा विचार करतोय.

दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. जिना, इसी का नाम जिंदगी!!!

कथेतून आपण मानवी मनोवृत्तीचे दर्शन घडविण्यात सफल झाला आहात. आपले अभिनंदन!!!

@ ऋन्मेष, कथेच्या शिर्षकामद्ये हे ३७५ काय आहे? मला नाही समजले.

ते ३७५ चं काय ते सांग>>>

ते १०० डेज मालिके सारखे आहे!

आता पर्यंतच्या ३७५ झाल्या... त्यातील ही पहिली पुढे ३७४...... १ असे येतील भाग! Wink

छान लिहलयं !! असाच एक प्लॉट पुर्वी वाचलेला कुठेतरी नक्की आठवत नाहिये!

सचिन काळे ते सस्पेन्स आहे.
म्हणूनच कथा ईतकी साधी सोपी नाहीये >>>>>>

अरे बाप रे ! मी ऋन्मेऽऽष फॅन क्लबमधे असले तरी, ही एखादी क्रमशः कथा असेल आणि प्रत्येक पुढच्या भागाचा क्रमांक उतरत उतरत 'आशा__१' ला सस्पेन्स संपणार आहे, अशा माझ्या गेसने मलाच भीती वाटली. इतके छोटे छोटे भाग असतील तर अजुन ३७४ भाग सहज होवु शकतील.

ऋन्मेऽऽष, झोपेत ३६५ ऐवजी ३७५ लिहिलं नाहीए ना? तेवढच आम्हाला १० भागांचं कन्सेशन मिळतं आहे का चेक करत होते. Wink

झोपेत ३६५ ऐवजी ३७५ लिहिलं नाहीए ना? तेवढच आम्हाला १० भागांचं कन्सेशन मिळतं आहे का चेक करत होते. डोळा मारा >>>> ३.७५ असु शकत नाही का? बघा काय अ‍ॅडज्स्ट होत असेल तर.

ऋन्मेऽऽष, झोपेत ३६५ ऐवजी ३७५ लिहिलं नाहीए ना? तेवढच आम्हाला १० भागांचं कन्सेशन मिळतं आहे का चेक करत होते. डोळा मारा >>> Proud नाही असे काही नाही. नव्हते. पण आयड्या छान आहे, ट्राय मारायला हरकत नाही. ३७५ नाही तर किमान ७५ पर्यंत तरी लिहू शकतो ईतपत विश्वास वाटतोय सध्या Happy

साती, आपला विश्वास पाहता आपण बरोबर ओळखले असणार Happy
संध्याकाळपर्यंत सांगेनच पण त्या आधी हिंट देत लोकांचे कन्फ्यूजन आणखी वाढवतो,
ज्यांनी कॅरेबिअन संस्क्रुतीचा अभ्यास केला आहे अश्यांना हे चटकन ओळखता येईल, ज्यांनी नसेल केला ते आता गूगल करू शकता Happy

रीया Angry
माझ्या धाग्यावरचे पाचपन्नास प्रतिसाद कमी केलेस तू हे सिक्रेट फोडून Proud

पण ३७५ च्या टारगेटने लिहिलेली हे ३७६ कसे झाले. शीर्षक किंवा माझे नाव पकडलेस का? कोणीतरी आणखी तिसरा डोळा बनत मोजेल का रे?

तर किमान ७५ पर्यंत तरी लिहू शकतो ईतपत विश्वास वाटतोय सध्या>>>

अच्छा ! म्हणजे आता पर्यन्त ७५ झाल्यात तर! Wink

आणि त्या ७५ लिहुन पुर्ण होईपर्यन्त अजुन समविष्ट होतीलच ना! Wink

अहो कृष्णा हे काल्पनिक आहे. कथा आहे.>>>

ऋ, हो मी त्या तुझ्या काल्पनिक कथानायका बाबत बोलतोय! तुझ्या बद्दल नाही! Wink तुझ्या असे का मनात आले??

Pages