मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 30 November, 2016 - 10:06

तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो.
तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार?
जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांना हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने नॉनव्हेज कमी झाले व ति सवय सुटली.

पुढे कॉलेजसाठी मी कोकणात चिपळुणला गेल्यावर मासे खायला सुरवात केली.बांगडा,सुरमई,पापलेट ,कोळंबी,सोडे,मांदेली खेकडे काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल.माझ्या मावसंभावाकडे एअरगन असल्याने आम्ही कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो.कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो व शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा ग्रामिण भागातील एखाद्या धाब्यावर गावरान चिकन,चुलीवरचं मटण खायला आम्ही जायचो.प्रसंगी दारुही प्यायचो.
तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मांसाहाराच्या आहरी गेलो आहे.

मला आता मांसहाराची चटक लागली आहे.आताशा मी ३१ वर्षाचा आहे व वजन आणि तब्येत वाढत चालली आहे.माझे दोन चुलतभाऊ हार्ट पेशंट झाले आहेत.मी ज्या रस्त्याने जात आहे त्याच रस्त्यावर ते गेल्याने एकाला हायपरटेंशन व एकाची ॲँजिओप्लास्टी झाली आहे. मला मांसाहाराशिवाय अलिकडे रोजच्या शाकाहारी पदार्थात इंटरेस्ट राहीलेला नाही.घरी आमटी,भेंडीची भाजी,तोंडलं असल्या भाज्या असतील तर माझे डोके उठते.त्या रोजच्या पोळीभाजीची चव वाटेनाशी झाली आहे.सतत बिर्याणी,चुलीवरचं मटण ,बांगड्याचं कालवण असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो.याचा अर्थात खिश्यावरही ताण पडायला लागला आहे.मांसाहार कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का?
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?
३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल?
४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?
५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का?
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही धागे असेच असतात, काळाच्या पुढे. वेळ आल्यावरच त्यांची किंमत कळते. तोपर्यंत त्यांना टिका झेलावीच लागते Happy

अजुन एक धागा ज्यात प्रतिसादांनी मनोरंजन होत आहे Proud

सिंजी, तुम्ही करा हो बिनधास्त मासांहार. आमच्याकडे तर वर्षाचे ३६० दिवस मांसाहार करणारे पुरुष आहेत. ज्या दिवशी मटण, चिकन, मच्छी यापैकी काहीच नाही मिळाले तर सुकी मच्छी खातात पण मासांहार करतातच. आणि सगळेच तब्यतीने उत्तम आहेत. त्यातील दोघांनी तर सत्तरी ओलांडली आहे. हो फक्त बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा घरी आणुन शिजवून खा.

हो फक्त बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा घरी आणुन शिजवून खा.
>>>>
याला प्लस वन !
मांसाहार घरी करत असाल तर तो उत्तमच, बाहेरचा आणि हलक्या दर्जाचा कुठे असेल तिथे जरा जास्त डेंजरस असते.

रोगाने मेलेल्या कोंबड्या खाऊ घालतात.
महागाई वाढली तर चिकन बिर्याणीच्या जागी कव्वा बिर्याणी खाऊ घालतात.
मटण मागितले तर कुठले कुठले प्राणी त्यात जमा होतील सांगता येत नाही. मग ते कचर्‍यात तोंड घालणारे डुक्कर असेल किंवा म्युनसिपालटीने मारलेले चावरे कुत्रे असेल.
मेलेले प्राणी काही पोटातून कावकाव किंवा भूंभू करून आपण कोण आहोत हे सांगणार नाहीत Sad

महागाई वाढली तर चिकन बिर्याणीच्या जागी कव्वा बिर्याणी खाऊ घालतात.
मटण मागितले तर कुठले कुठले प्राणी त्यात जमा होतील सांगता येत नाही. मग ते कचर्‍यात तोंड घालणारे डुक्कर असेल किंवा म्युनसिपालटीने मारलेले चावरे कुत्रे असेल.
मेलेले प्राणी काही पोटातून कावकाव किंवा भूंभू करून आपण कोण आहोत हे सांगणार नाहीत. >>>>. तू नक्की कुठल्या हॉटेलात जातो बे. काहीही फेकतो.

माझी एक मैत्रीण आहे जी रोज चिकन खाते, त्यांचे व्हेज म्हणजे भाज्या + चिकन.

मध्यंतरी बर्ड फ्लु ची साथ असताना जेव्हा सगळे कोंबड्या खाणे टाळायचे तेव्हातर ते लोक अजुन जास्त चिकन खात... पण काहीही नाही झाले

बादवे मला स्वतःला सुद्धा हॉटेलात मटण खायला आवडत नाही काय भरवसा मटण च्या एवजी बिफ दीले तर

ऑल प्रतिसाद लै भारी .

मांसाहार म्हणून उघडत नव्हते ह्या धाग्याला पण बरं झालं उघडला ते . एका चांगल्या टाईम पास ला मुकले असते .

हैद्राबादसाइड ला तर पाया नाहरी, उंटाचे मटन पन मिळते खायला. मी काही खाल्ले नाही. पण मांसाहार मसल बिल्डिंगला चांगला. माझे ऐकाल तर असले काही काँप्लेक्स गोंजारत बसण्या पेक्षा एखादा प्रॉजेक्ट साधा का होईना, जसे शेताला कुंपण घालणे, एखादा तुम्हाला न आव्डणारा पण आवश्यक असा प्रॉजेक्ट. तो नेटाने पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला खूप आत्म विश्वास येइल. व कैप्पण करू/ खाउ शकाल विदाउट गिल्ट. आमच्याकडे पण चिकन म्हणजे भाजी समजणारे मेंबर आहेत. मी बनवते. मग समोर ठेवून आणि माझे काय असेल ते व्हेज खाते. बराचसा स्वाद त्या ग्रेव्हीतच असतो.

मुंबाईची सिस्टिम फॉलो करता येइल. मंगळवारी नाही. फार तळकट मसाले दार बनवू नका. खिमा वगैरे साजुक तुपात बनवायला सांगा. पण ह्या सर्व कॅलरी बर्न करायला हव्यात नाईतर तुमचे वजन वाढेल. अरे दिल छोटा न करो सिंजी. अपनी मर्जीसे जियो.

वरील काही प्रतिसाद वाचुन मला असे वाटत आहे की ध्याग्याचा विषय भरकट्तोय........
सिंजि खुप आशेनी काही प्रश्नचिन्ह टाकुन आणि वेगवेगळे धागे(?????)काढुन आपल्या कडुन सल्ल्याची अपेक्षा करत आहेत. ते सोडुन ईथे कलाकारांच्या खाण्या विषयी बोलल जात आहे. Sad Sad Sad
तरी माबो करांनी हळव्या आणि भित्रट सिंजि ना Wink Wink Wink इकडे तिकडे न भरकट्वता योग्य ती माहीती द्यावी. Happy Happy Happy
'" दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" या त्यांच्या प्रयत्नाला माबो करांनी प्रोत्साहन द्यावे Proud Proud Proud
"सिंजि चा उद्याचा येणार्‍या ध्याग्याच्या प्रतिक्षेतील एक माबोची वाचक"

>>>> १. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का? <<<<
नाही. मला मांसाहार धार्मिक कारणामुळे वर्ज्य आहे.

>>>>२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले? <<<<
मांसाहार करीत नाही, प्रश्न मला गैरलागु

>>>>३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल? <<<<
जीभेला लागलेली चटक इटसेल्फ "बायलॉजीकल इन्स्टींक्ट " आहे (असे माझे मत)
याव्यतिरिक्त चटक लागणे हे सायकोलॉजिकल गरजेतुन देखिल असते

>>>>४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे? <<<<
चार पाच दिवस कुठल्या डोंगरी ट्रेकला जावा, सोबत्यांना आम्हि सांगुन ठेवु काय ते... Proud ( भरपूर श्रम अन भरीस उपासमार घडवुन आणल्यावर) मग पानात समोर येईल वा हातावर मिळेल त्या खाद्यपदार्थाशी इंटर अ‍ॅक्शन होईल... Proud

>>>>५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? <<<<<<
आमच्याकरता चिंचगुळ हा सर्वोत्तम मसाला आहे Wink

>>>> हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का? <<<<
विकायची परवानगी आहे म्हणजे सेफ असावेत

मांसाहाराची आवड आहे पण व्यसन वगैरे नाही ,,,,,,,, आठवड्यातून ६ दिवस शाकाहारी झाले कि मग एक दिवस ते हि शक्यतो रविवारी मांसाहारी खावेसे वाटते ,,, त्यातून पण बरेच दिवस असे येतात ज्यादिवशी खाणे चालत नाही .

त्या कोणा फिल्मी कलाकाराने 'कौआ बिर्याणी' फेमस केली होती, तो आता कुठे दिसत नाही ते! बिर्याणीचा नवा आयटम आणून मज्जा आणली होती त्याने.

Mock Meat ट्राय करून पहा. मटण खायची इच्छा झाली तर हेच खायचे. नोन-व्हेज सारखे दिसते व चव पण जवळजवळ तशीच लागते पण व्हेज असते. पूर्वी सोयाफुड म्हणून बाजारात मिळायचे. आता माहित नाही. चौकशी करा.

मला मांसाहार करायची सवय होती. मी एकदा एका देवस्थानाला गेले होते. तिथे एका अगदी छोट्या कोकराला बळी द्यायला नेत होते. त्यावेळची त्या निष्पाप जीवाची तगमग बघून माझी नॉन vej खायची इच्छा मेली. मी त्यानंतर कधीही नॉन vej खाल्ले नाही

प्रयत्न करुन पहा. ताज्या भाजीची चव किती छान असते. एकदा भाजी पोळी खायची टेस्ट devlop झाली की आपोआप शाकाहारी banaal

विकायची परवानगी आहे म्हणजे सेफ असावेत
असं नसतं. पदार्थ सेफ असतात किंवा नसतात. त्याचा विक्री अनुमतीशी असा सरळ संबंध नसतो.

@विषयः शुद्ध शाकाहारी लोक सुद्धा अमुक तमुक चटक लावून, ओबेसीटी आणि परिणामी होणारे हृदयरोग वगैरे पायर्‍या यशस्वीपणे गाठतात. तेव्हा मांसाहारावरुन शाकाहाराकळे वळले की ते टाळता येते असे नव्हे.
स्मार्ट इटर बना.चांगल्या आहाराशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्या. ते कुठे सापडतात याची मात्र कल्पना नाही.

एखाद्याला रोज नॉन व्हेज खावे वाटत असेल तर का टाळावे?
त्यात पण लिन मिट आणि काही मासे वगैरे मसल मास वाढवणारे प्रकार आहेत ना?ते घरच्या घरी ग्रील करून खा.

खाण्याची चटक लागणे हे डिप्रेशनचे एक चिन्ह् असू शकते.

शाकाहार करा वा मांसाहार , पण तो घरी करा.

बाजारातून सामग्री आणणे , रेसिपी करणे , मस्त गाणी ऐकत खाणे आणि भांडीही धुवुन् ठेवणे ... यात मोठा आनंद असतो.

एखाद्या रविवारी करून बघा.

मांस स्वत: घातक नसते , त्यातले मसाले , तेल , चरबी , फार वेळ तळणे इ मुळे ते घातक होते.
( अपवाद फक्त मांसातून होणार्या परजीवी जंत वगैरेचा )

Pages