मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 30 November, 2016 - 10:06

तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो.
तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार?
जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांना हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने नॉनव्हेज कमी झाले व ति सवय सुटली.

पुढे कॉलेजसाठी मी कोकणात चिपळुणला गेल्यावर मासे खायला सुरवात केली.बांगडा,सुरमई,पापलेट ,कोळंबी,सोडे,मांदेली खेकडे काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल.माझ्या मावसंभावाकडे एअरगन असल्याने आम्ही कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो.कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो व शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा ग्रामिण भागातील एखाद्या धाब्यावर गावरान चिकन,चुलीवरचं मटण खायला आम्ही जायचो.प्रसंगी दारुही प्यायचो.
तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मांसाहाराच्या आहरी गेलो आहे.

मला आता मांसहाराची चटक लागली आहे.आताशा मी ३१ वर्षाचा आहे व वजन आणि तब्येत वाढत चालली आहे.माझे दोन चुलतभाऊ हार्ट पेशंट झाले आहेत.मी ज्या रस्त्याने जात आहे त्याच रस्त्यावर ते गेल्याने एकाला हायपरटेंशन व एकाची ॲँजिओप्लास्टी झाली आहे. मला मांसाहाराशिवाय अलिकडे रोजच्या शाकाहारी पदार्थात इंटरेस्ट राहीलेला नाही.घरी आमटी,भेंडीची भाजी,तोंडलं असल्या भाज्या असतील तर माझे डोके उठते.त्या रोजच्या पोळीभाजीची चव वाटेनाशी झाली आहे.सतत बिर्याणी,चुलीवरचं मटण ,बांगड्याचं कालवण असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो.याचा अर्थात खिश्यावरही ताण पडायला लागला आहे.मांसाहार कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का?
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?
३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल?
४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?
५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का?
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तुम्ही आणि रुनेमश मिळून स्वबोली का नाही सुरु करत?>> Lol
पण दोघेच एकमेकांना किती प्रतिसाद देणार?

I think maayboli has no restrictions over how much thread one should open.if someone relates to my thread he would definitely reply with sincerity. one shall not bother ,if my thread irritates someone ,I highly apologize.

<< १. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का? २. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले? >> प्रथमतः, आपण जर शाकाहारी लोकाना 'शाकाहाराचं व्यसन असलेले' म्हणत असाल तरच मीं स्वतःला मांसाहाराचे व्यसन आहे असं म्हणेन. आतां तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर - मीं अगदीं लहानपणापासून मांसाहाराचा [बहुतांशीं मासे ] शौकीन आहे पण आतां [ज्येष्ठ नागरिक ] मला त्याची तितकीशी आसक्ती राहिलेली नाही. कारण एकच - अनेक ठीकाणीं [यांत चिपळूणही आलं ] सर्व तर्‍हेने केलेले सर्व प्रकारचे मासे भरपूर खावून मीं तृप्त आहे.[ ' व्यसनमुक्तीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पूर्णपणे व्यसनाधिन होणे', असं ऑस्कर वाईल्डने म्हटल्याचं आठवतं ]. त्यामुळे, << मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो>> या आपल्या विधानावरून आपण व्यसनमुक्तीकडेच वेगाने मार्गक्रमण करताहात असं वाटतं.
अगदींच प्रकृतिची काळजी वाटत असेल तर मटन, चिकन कमी करून त्याऐवजी मासे खाण्याचं प्रमाण वाढवावं.

धन्यवाद भाऊ.रेडमीट कमी करावे असा विचार आहे.सातार्यात सी फुड ताजे मासे मिळत नाहीत ,नाहीतर मग मासे वाढवता आले असते.

तुम्ही नक्की भित्रट आणि अती हळवे ना ? चिडताय किती? खरंच हळवे असाल तर खटका समोर उभे राहून दोन दिवस बघा काय काय होतं.
नंतर दोन पैकी एक धागा उडवा.

जर तुम्हाला नुसते मांसमटण खायची सवय नसेल, आणि सोबत चपाती भाकरी वा भात खात असाल तर हे व्यसन नाहीये.

मूळात माणूस हा मांसाहारी प्राणी आहे. पुढे कधीतरी शेतीचा शोध लागला आणि तो शाकाहारी झाला.
पण आज तुम्ही या डुप्लिकेट शाकाहारी माणसांच्या जगात ओरिजिनल मांसाहारी असून स्वत:ला त्यांच्यासारखे होण्यासाठी बदलायचा प्रयत्न करत आहात हे दुर्दैवी आहे.

शक्य असल्यास झाडे वाचवा, झाडे जगवा आणि आपल्या मांसाहारी असल्याचा अभिमान बाळगा !

जीवो जीवस्य जीवनम,
जय चिकन, जय मटण !

one shall not bother ,if my thread irritates someone ,I highly apologize.

अजिबात गरज नाही हो माफी मागायची! लोकांना धागा न उघडण्याचा पर्याय असतोच की
तुम्ही पनीर, बटाटे, वांगी खात जा, मग हळू हळू तोंडली, भेंडीचं प्रमाण वाढवा. प्रोटिनसाठी उसळी खात जा. खान्देशी शेवभाजी भरली वांगी , पंजाबी पनीर बटर मसाला , झालंच तर दाल बाटी, कोल्हापूरी मिसळ- व्हेजही आवडायला लागेल!

सनव, तुम्ही त्यांना इकडे आड तिकडे विहीर करून सोडणार. हे करून हार्ट आणि पोट दोघांची वाट लावून घेतली, आणि महिन्याने शाकाहाराची चटक कशी सोडवू धागा आला की ओटमील सांगा त्यांना.

तुम्ही पाप करताय, देव बघतोय तुमच्याकडे वरून

रुंम्याचे काय ऐकू नका, त्याचे वय 60 आहे, रोज तो पोटाला सोसत नाही म्हणून डाळ भात खातो, गफ्रे वगैरे त्याच्या मनाचे खेळ आहेत. सई, स्वजो, शारुख असे म्हातारे लोक त्याला आवडतात त्यावरूनच त्याचे खरे वय कळून येते

हे काय यार.. सई, स्वप्निल आणि शाहरूखला का आणलेत या धाग्यावर.. आता आणलेच आहे तर एक क्लीअर करतो.. मी एखादी व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी यावरून ती कशी आहे हे नाही ठरवत.. जसे की शाहरूख खान पठाण म्हणजे तो नक्कीच दर दुसर्‍या दिवशी हड्ड्या तोडत असणार.. या ऊलट स्वप्निल तर नावावरूनच शाकाहारी वाटतो, दिसतोही गाजर खाणार्‍या सश्यासारखा गोंडस.. पण तरीही दोघेही माझ्या आवडीचे Happy

सनव,
तुम्ही तो अमोल उत्पलचा जुना गोलमाल पाहिला आहे का ?

बुढ्ढा घर पर है?
तुमने तो कभी उन्हे देखा नही, तो तुम्ही कैसे पता चला के वो बुढे है?
अरे, जिस इन्सान का नाम भवानी शंकर हो, वो तो पैदा होतेही बुढा हो गया रे.. Happy

दिसतोही गाजर खाणार्‍या सश्यासारखा गोंडस.

>>>>मी हिप्पोच्या आकाराचा गोंडस ससा मनासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय, पण नाहीच छे...हे तुच करू जाणे बाबा

ऋ स्वप्निल नॉनव्हेज खातो, त्याने एका मुलाखतीत सांगितलं. मी बघितली होती. 'दावत' नावाचा एक शो व्ह्यायचा 'मी मराठीवर', मॄणाल कुलकर्णी होस्ट करायची. दोन जणांच्या मुलाखती वेगवेगळ्या हॉटेलात जेवता जेवता असं स्वरुप होतं त्याचं.

ऋन्मेष ला स्वबोली सुरू करायला लाऊ नका.
मला आणि इतर फॅनक्लबातल्यांना तो इथेच हवाय.
या महाशयांना काय सांगायचंय ते सांगा

बाकी काही काही प्रतिसाद लै भारीयेत.

ऋन्मेष, स्वप्निल मांसाहारी आहे

सनव,
मागे मी कुठेतरी ज्योतिषशास्त्रासंबंधी लेखात वाचलेले. ज्याचे नाव स वरून सुरू होते ते शक्यतो (९० टक्के) शाकाहारी असतात. तसेच स वरून सप्टेंबर महिन्यात जे जन्म घेतात त्यांनाही हे लागू होते. शेवटी हे शास्त्र असे आहे की ज्याच्या त्याच्या श्रद्धेवरही अवलंबून आही. कोणी विश्वास ठेवते तर कोणाला नवल वाटते Happy

अन्जू, स्वप्निल जर खरेच नॉनवेज खात असेल तर प्रश्नचा सुटला. तो, मी आणि शाहरूख, जब मिल बैठेंगे तीन यार तेव्हा काय ऑर्डर करायचे हे समजत नव्हते. आता तंदूरीने स्टार्ट करायला हरकत नाही Happy

येस ! तुम्ही स्वप्नील यांच्या नावावरून केलेला अंदाज साफच चूक होता हे अंजू यांच्या पोस्टनन्तर सगळ्यांच्या झटकन लक्षात आलं आहेच! त्यामुळे आता पुन्हा मूळ विषयाकडे वळू या.

हो. एकतर तो ज्योतिष लेख थोतांड असेल. किंवा स्वप्निल १० टक्क्यांत येत असेल Wink

बाकी मूळ विषयावर माझे पहिल्याच पोस्टमध्ये लिहून झालेय. माझी ती ऑफिसपासूनची सवय आहे, आधी काम मग मनोरंजन Happy

खाटकाची आयड्या फसूही शकते.
खाटकाची मेहनत आणि कष्ट बघून त्याला रोजगार उपलब्ध करून द्यायच्या सदहेतूने चार तंगड्या आणखी तोडल्या जाण्याची शक्यता आहे.

<< खाटका समोर उभे राहून दोन दिवस बघा -->> रशियाच्या टॉलस्टायने खाटीकखान्याला भेट दिल्यावर तो शाकाहारी झाला , असं वाचल्याचं आठवतं. पण ती भेट त्याने उतरत्या वयात, मांसाहाराने तृप्त झाल्यावरच दिली, असा माझा अंदाज आहे !

Pages