Submitted by बेफ़िकीर on 28 November, 2016 - 11:01
घडलेल्यावर करत राहतो हाय हाय केवळ
पंचमहाभूतांचे आपण बोनसाय केवळ
तेहतीस कोटींना आज्ञा स्थलांतराची द्या
सव्वा अब्जांची भागवते भूक गाय केवळ
जळताना हे जाणवले की प्रेम पोचले वर
आता कळले....तुला हवीशी असे साय केवळ
मन भोकाड पसरते हल्ली इतक्या त्वेषाने
असे वाटते, फक्त असावी इथे माय केवळ
कसली दु:खे, काय जाणिवा, गेले रे दिन ते
पिढी राहिली आहे आता हायफाय केवळ
असण्यावरती टीका केली कोणी नसण्याने
कोणी असणे सोसावे का मीच काय केवळ
परदु:खाने दु:खी होण्याचा अभिनय करता?
'बेफिकीर'ची ध्यानी घ्या की एक राय केवळ
==================
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान !
खुप छान !
मन भोकाड पसरते हल्ली इतक्या
मन भोकाड पसरते हल्ली इतक्या त्वेषाने
असे वाटते, फक्त असावी इथे माय केवळ>>>>>अतीशय सुरेख!
कसली दु:खे, काय जाणिवा, गेले रे दिन ते
पिढी राहिली आहे आता हायफाय केवळ>>>>>>सही!
छान
छान
वा आवडली
वा
आवडली
मस्त गझल!मक्ता कहर!!
मस्त गझल!मक्ता कहर!!