घाला विस्मरणाचा पडतो

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 November, 2016 - 03:21

आठवणींचा ऐवज जपतो
घाला विस्मरणाचा पडतो

भुकंप येतो मतभेदांचा
पाया विश्वासाचा खचतो

माणुसकीचे कर्ज काढते
पिढया-पिढ्यांचा हप्ता थकतो

गळा घोटते नैराश्याचा
जन्म नव्या इच्छेला मिळतो

निकड भासते अभिव्यक्तीची
गल्ला कल्पकतेचा फुटतो

आर्त तान घेतो हा कोकिळ
विरहाचा मोहर घमघमतो

समिधा आसक्तीची पडते
वैराग्याचा यज्ञ भडकतो

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समिधा आसक्तीची पडते
वैराग्याचा यज्ञ भडकतो >>>> Happy

सुंदर !!

सुरेखच!!!

आर्त तान घेतो हा कोकिळ
विरहाचा मोहर घमघमतो

समिधा आसक्तीची पडते
वैराग्याचा यज्ञ भडकतो

दोन्ही कडवी अप्रतिम!!!