काळा रंग आणि भाषा-साहित्यातील वर्णभेद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2016 - 12:59

काळ्या रंगावरून कोणाला चिडवू नये किंवा कोणाला कमी लेखू नये. असे आपण एकीकडे म्हणतो. पण काळ्या रंगाला रुपक म्हणून वापरताना आपण नेहमीच कमी लेखतो आणि वाईटाचे प्रतीक म्हणूनच दाखवतो, असे का?

जो पैसा भ्रष्ट मार्गाने कमावला जातो तो काळा पैसा ! ब्लॅक मनी ! ज्या मार्गाने तो कमावला जातो तो काळा बाजार !

याऊलट कष्टाचा पैसा मात्र पांढरा पैसा ! तो पैसा कमावणारे पांढरेपेशे ! व्हाईट कॉलर !

एखादे वाईट काम म्हणजे कृष्णकृत्य ! ईथे कृष्ण नावाचा आपला देव असूनही या शब्दाचा अर्थ मात्र वाईटच !

जादू टोणा, अघोरी विद्या, म्हणजेच काळी जादू ! काळी विद्या !

एखाद्याच्या स्वभावाला ग्रे शेड म्हणतानाही पांढरा रंग त्यातील चांगुलपणाचा आणि काळा रंग त्यातील वाईटाचा !

एखादा दिवस आयुष्यात वाईट गेला तर तो काळा दिवस ! ब्लॅक फ्रायडे !

पांढरा रंग शांतींचा, तर काळा रंग निषेधाचा !

एखाद्याच्या तोंडाला फासली जाणारी शाई देखील काळीच !

अगदी मंगलकार्यांमध्येही काळ्या रंगाला नकारच दिला जातो, कारण काळे म्हणजे काहीतरी अमंगल !

ब्लॅक ब्यूटी या शब्दातही मला एक खोचकपणाच जाणवतो.. ब्लॅक असूनही ब्यूटी ! म्हणजे अपवाद !

माझे भाषा-साहित्याचे ज्ञान कच्चे आहे, म्हणून फार उदाहरणे देऊ शकत नाही. पण जगात बहुधा सगळीकडच्या भाषांमध्ये काळ्या रंगालाच कमी लेखले जात असावे. तर हे चुकीचे वाटत नाही का? आणि काळ्या रंगाकडे बघण्याची द्रुष्टीच आपली नकारात्मक आहे असा याचा अर्थ होत नाही का?

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कपड्यांबाबत काळेनिळे माझ्यासुद्धा टॉपलिस्टवर. माझ्या आईच्या भाषेत कसले मेले जळले काळेनिळे कपडेच घेतो
अर्थात मी रंगाने सरासरी भारतीय रंगापेक्षा किंचित उजळ असल्याने मला शोभतात आणि शोभतात म्हणून घालतो.

पण मला वाटते, काळ्या रंगाचे कपडे शोभणे वा केस काळेभोर असणे हे वेगळे झाले आणि लेखात लिहिल्याप्रमाणे काळा रंग नकारात्मक प्रवृत्तींचे, वाईट गोष्टींचे प्रतीक म्हणून वापरणे हे वेगळे झाले.

मला स्वत:ला काळ्या गोष्टी फार आवडतात म्हणुनच अगदी गोरे चिट्टे मुलं माझे क्रश होऊ शकत नाहीत Proud >> ह्म्म्म शायनी अहुजासारखी पांढुरकी लोकं का?

मला फार बोअर वाटतात गोरीपान वगैरे भारतीय मुलं. ते मेवाड किंवा जयहिंद लग्नी शेरवानी च्या जाहिरात फ्लेक्स वर भयंकर हेवी भरतकाम जरदोसी कपड्यात एक्सप्रेशन लेस मठ्ठ मॉडेल असतात तशी वाटतात.
याला एक वेगळ्या प्रकारचा वर्णद्वेष मानता येईल.हा काढण्यावरही मनात काम चालू आहे.

याला एक वेगळ्या प्रकारचा वर्णद्वेष मानता येईल >> +११
कपड्यांबाबत काळेनिळे माझ्यासुद्धा टॉपलिस्टवर.+११११११११११११११

याला एक वेगळ्या प्रकारचा वर्णद्वेष मानता येईल. >> वर्णद्वेष + लिंग भेदभाव?

कॉलेज, हापिसात काही उत्तरेकडची मुलं अगदी गुलाबी, गोरी, चकाकणाऱ्या त्वचेची वगैरे होती. रागच यायचा त्यांना बघून! तशाच मुलींबद्दलमात्र काही वाटायचे नाही.

हा काढण्यावरही मनात काम चालू आहे. >> काढावा असा विचार अजून स्वतःहून मनात आला नाहीय. येईल तेव्हा बघू....

मला फार बोअर वाटतात गोरीपान वगैरे भारतीय मुलं.
याला एक वेगळ्या प्रकारचा वर्णद्वेष मानता येईल.

>>>>
अ‍ॅक्चुअली नाही मला हे तसे वाटत. ती तुमची सौंदर्याची चॉईस बोलू शकतो.
उदाहरणार्थ मला काळ्यासावळ्या, गोर्‍या मुली आवडतात. पण गव्हाळ नाही. हेल्दी फिगरवाल्या आवडतात, पण अगदीच सडपातळ झिरो फिगर नाही. हे मी माझ्या आवडीनुसार त्या त्या निकषापुरतेच सौंदर्याचे मूल्यमापन करत आहे.
वर्णद्वेष वा जातीभेद म्हटले की माझ्यामते कातडीच्या रंगावरून वा जातीपातीचे लेबल बघून श्रेष्ठत्व ठरवणे, उचनीच करणे. जर कोणाला काळ्या किंवा पांढर्‍या रंगाची माणसे सुंदर वाटत नसतील तर ईटस ओके. त्यात काही गैर नाही असे मला वाटते.
अर्थात सौंदर्याच्या निकषाबाबतही काही मेंटल ब्लॉक असतील तर ते निघणे चांगलेच.

का कुणास ठाऊक, मला आजवर जेवढ्या गोऱ्यापान कॅटेगरी मुली भेटल्या त्यातली एकही ग्रेसफुल वाटली नाही, कधीच स्वतःहुन त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही.
याउलट, गव्हाळ किंवा सावळ्या मुली फार आवडतात, २ मुली तर सरळ काळी म्हणतात त्या कॅटेगरी, पण त्यांची smile, नेहमी ग्रेसफुल असणं आणि फिगर.. भयंकर आवडायच्या मला त्या.
रंग आणि सुंदरता यांचा काहीएक संबंध नाही!

पूर्वी वीज नसताना रात्र काळीकुट्ट, म्हणून चोर्यामार्या किंवा इतर वाईट कामं जास्त करून रात्री होत असणार. मग रात्री केलेली सगळीच कामं वाईट, मग काळोख वाईट, काळोख काळा म्हणून काळा रंगच वाईट असा हा प्रवास होत गेलेला असेल.
मला वाटतं की (साहित्यात) आपल्याला काही तरी ' प्रतीक' लागतं. मग दुष्टतेसाठी काळा रंग वापरला गेला असेल.

Pages