सोयाबीन चिल्ली

Submitted by पद्म on 22 November, 2016 - 21:33

I want a recipe, can somebody give me the recipe of soybean chilli?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

My bad जे नसते सांगायला गेले

You tube वर व्हिडीऑ पण पहायला मिळतो तर मला वाटले ते जास्त सोयिचे असेल. पण असो तुम्ही आयांनाच विचारा सगळे

सोयाबिनचे मोठे चंक्स साधारण

सोयाबिनचे मोठे चंक्स साधारण पंधरा वीस घ्या.
कुकरात चंक्सच्या वर चार अंगुळे राहिल इतके पाणी घालून त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून सोया चंक्स घाला.
आपापल्या सोयीनुसार आणि (एथिक्स नुसार Wink ) एक शिटी काढा किंवा प्रेशर आल्यावर गॅस मंद करून पाच मिनीट ठेवा.
मग थोडे थंड झाल्यावर सोयाचंक्स हाताने दाबून त्यातील पाणी निथळून घ्या.

इथून पुढे दोन प्रकार आहेत.
१. लाडात नसाल तर - यालाच रेडी टू प्रिपेअर सोया चंक्स समजा
२. लाडात असाल तर- आलं मिरची लसूणची पेस्ट, पाव चिमूट अजुनोमोटो आणि सोयासॉस यांचे मॅरिनेशन करून सोयाचंक्स त्यात मॅरिनेट करायला ठेवा. कॉर्न्फ्लोअरची /मैद्याची कोट होईल इतकी थिक पेस्ट करून त्यात एकेक सोया चंक बुडवून निथळूण घ्या.
अतिचशय लाडात असाल आणि अंडं चालत/ पळत असेल तर दोन अंडी फोडून ती लाईट व्हिस्क करून एकेक सोया चंक प्रथम एग बॅटरमध्ये बुडवून मग फ्लारपेस्ट मध्ये बुडवून मग तळा. असले तळलेले सोयाचंक्स रेडी टू प्रिपेअर सोया चंक्स समजा.

आता पुन्हा लाडात नसाल तर घरात उपलब्ध असेल ती कढई घ्या. लाडात असाल तर (ला अ त) तयार सामुग्रीच्या दहापट सामुग्री मावेल इतकी मोठी लोखंडी कढई घ्या.
गॅस अतिशय मोठा करा. कढईत तेल टाका (ला अ त तिळाचे तेल घ्या).
त्यात तुकडे केलेल्या लसूण पाकळ्या, आल्याचे ज्युलिअन्स टाका, उभे चिरलेले कांदे (आवडत असल्यास टाका) मिरच्यांचे तिरके तिरके कापलेले तुकडे टाका जरासे परतून मग त्यात उभ्या सळ्या केलेल्या ढब्बू मिरच्या (३-४ नग ) टाका.
हे फटाफट हात चालवून परता.
मग यात आवडीप्रमाणे सोया सॉस, चिली सॉस आणि टमॅटो सॉअ टाका.
आमच्याकडे मुलांना अर्धा टेस्पू चिली सॉस्+एक टे स्पू सोया सॉस्+दोन टे स्पू टमॅटो सॉस लागतो.
हे घालून परता. चव बघून आणि सोया चंक्स मध्ये मीठ आहे या अंदाजाने मीठ घाला. हवंच असेल तर अजिनमोटो पाव चिमूट घाला. थोडे बुडबुडे यायला लागल्यावर रेडी टू कुक सोया चंक्स घालून परता.

आम्ही हे एकदम ड्राय होईपर्यंत परततो. म्हणजे सॉअ थिक होऊन चंक्सना फक्त कोट करतो. उगाच ग्रेवी टाईप दिसत नाही.

आता ला अ त कांद्याच्या पातीचे देठ गोल गोल कापून गार्निश करा.
नाहीतर असेच खायला घ्या.

फोटू सापडला तर नंतर चिकटवते.

साती, आपका ये एहसान मैं जिंदगी भर नहीं भुलूंगा... आम्ही जैन आहोत, कांदा आणि लसणासाठी काही पर्याय आहे का?.....

मानिनी, लहान बळाला त्याचे शेजारी पण शिकवू शकतात, पण तो प्रश्न आईलाच विचारतो.......>>>>>>> sorry Manini if you got hurt, I was just joking.....Thank you for your suggestions too.

पद्म,
कांदा आणि लसणासाठी श्रेडेड कोबी हा पर्याय आहे.
किंवा काहीच न घालणं.
आणि ला अ त ऑप्शनात चंक मॅरिनेट करायला नुसत्या आल्यामिरचीची पेस्ट वापरा किंवा नुसता सोया सॉस.

जालावर सोया चिली नावाने दिलेल्या रेसिप्या पाहिल्या.
पहिलीच बहुचर्चित रेसिपी(हिंदी) जर मी केली तर त्याला 'सोयाचंक्सचं फदफदं' म्हणेन.
बाकीच्या वाचल्या नाहीत.
Wink

मस्तच साती.
काय "बी" बोलतंत!>>>>> हो का? अ ओ, आता काय करायचं >>>> हो आता तर मलाही तसेच वाटतेय

माझ्या हातून फार कमी रेस्प्या लिहून होतात.
तर या निमित्ताने एक झाली.

>>> फोटो टाकल्याशिवाय, रेस्पी लिहीण्याचे सगळे पुण्य मिळत नाही. Wink

कमळराव, तुम्ही धाग्याचे नांव देवनागरीत, पुढील उत्तरे देवनागरीत लिहलीत धाग्यातील मजकूर मात्र रोमन लीपीत का?

असो, पण तुमच्या धाग्यामुळे ही रेसिपी मिळाली प्रयत्न करायला हरकत नाही!

फोटो टाकल्याशिवाय, रेस्पी लिहीण्याचे सगळे पुण्य मिळत नाही. डोळा मारा>>>

हो सातीजी, तेवढे फोटोचे बघा!

मोबाईलात शोधला फोटो.
पण कॉलीफ्लॉवर चिलीचा आहे.

आता पुन्हा एकदा बनवेन तेव्हा अपलोड करेन फोटो.

@krishna. I'm sorry but it is very difficult for me to write in Marathi. Please understand......
@Manini. I've already apologized, I was just joking....

@साती, मी तरी कधी नाही करू शकलो, पण आज माझ्या कुककडून हि रेसिपी करून घेतली.
मज्जा आ गया........... पुन्हा एकदा धन्यवाद!!!