नोकरीच्या शोधात...

Submitted by योगी on 27 February, 2009 - 04:57

नमस्कार,

मी ८+ वर्षाचा अनुभव असलेला संगणक अभियंता आहे. आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेला बळी पडलेल्या अनेकांपैकी एक.

काल सकाळपर्यंत सगळं काही सुरळित चालू होतं. अचानक १२ वाजण्याच्या सुमारास HR ने केबिन मधे बोलावून घेतलं आणि सांगितलं - "तुमचे आमचे ॠणानुबंध आता संपले. आज तुमचा इथला शेवटचा दिवस! उद्यापासून तुम्ही येणार नाही आहात!"

झालं... क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक खूप मोठं प्रश्नचिन्ह सोबत घेउन घरी आलो. रात्री अर्थातच झोप काही लागली नाही. जेवण सुद्धा घशाखाली उतरत नव्हतं. "आता पुढे काय" हा एकच प्रश्न!

आज उठल्यावर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे CV अपडेट केला. सगळ्या मित्रांना/मैत्रीणींना फोन लावले. सगळ्यांना CV पाठवला. सगळ्या जॉबच्या साईट्स वर सुद्धा अपलोड केला. बघुया पुढे काय होतंय ते.

असाच विचार करत असताना आठवलं की इथे मायबोलीवर सुद्धा अनेक जण संगणक क्षेत्रातले आहेत. म्हणून इथे येऊन मी तुमची मदत मागतो आहे.

Short Profile Summary

Experience Summery:

  • 8+ months of experience as a Project Manager
  • 3+ years of experience as a Team Leader
  • 8+ years of total experience in software development
  • Worked extensively on mobile technologies for handheld devices
  • Rich experience of developing applications for Palm OS / Windows CE

Technical Skill Set:

  • C / C++ with Metrowerks CodeWarrior 9.0 for Palm OS
  • eVC++ 3.0 / 4.0 for Windows CE
  • AppForge MobileVB for Palm OS
  • Pilot Catapult 2.0 for Conduit Setup Kits

तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया माझ्या प्रोफाईल ला सुटेबल संधी कुठे असतील तर मला अवश्य फोन करुन कळवा. माझा मोबाईल नंबर आहे - ९३२४२६८६९६.

-योगेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमच्या सेंटरला लेडी काउन्सेलरची जागा आहे.

एच आy व्ही एड्स टीबी या विषयासाठी.

गोवंडी

१३ के / पी एम

मी software engineer आहे.2.6 वर्श नोकरी केल्यावर २००९ मधे बाळा साठी सोडली.नन्तर lectureship and ME(E and TC) पण तिथे मन लगत नाही.पुन्हा industry मधे यायच आहे.

IT experience :2.6 years
worked on Borland Delphi,designed and developed modules
proficient in c,c++ and Oracle .

Please let me know if anybody come across any openings.
I have already uploaded resume on naukri .I do get calls but the problem is my resume does not get shortlisted as there is 6 years gap since I left industry.
SO please help me out.

Pooja

पूजा, तुम्ही सध्या हिट असलेलं एखादं टूल, अ‍ॅप, लँग्वेज शिकुन मग नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. दोन्ही एका वेळी केले तरी हरकत नाही पण कोर्स करून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी परीक्षा दिली तर रेझुमेला वजन येइल आणि १००% फोकस करता येइल. .net, माँगो, हडुप, ड्रुपल, जावा, HTML5 आणि जेक्वेरी वापरून वेब डेव्हलपमेंट, स्मार्ट फोनसाठी प्रोग्रॅमिंग असे बरेच पर्याय आहेत आणि भारतात क्लासेस, सर्टिफिकेशनसाठी एक्झाम सेंटर्स इ. सोयी आहेतच.

पूजा
सिंड्रेलाने तुम्हाला सुचवलेला पर्याय योग्य वाटतो. तुम्ही EC च्या आहात त्या दृष्टीने मी अजून काही कोर्सेसचे पर्याय सुचवू इच्छितो.
१. Embedded चा कोर्स व्हेक्टर इंडिया सारख्या इन्स्टिट्यूट मधून करता येऊ शकतो.
२. VLSI कोर्स करता येऊ शकतो.
मी सद्ध्या VLSI कोर्स केलेला आहे. मी २०१४ पासआउट आहे. या कोर्सेस बद्दलची माहिती लागल्यास मी तुम्हाला पुरवू शकतो.

लोकहो,
मी EC २०१४ पासआउट आहे. त्यानंतर मी RV-VLSI Design Centre, बंगलोर येथून VLSI चा कोर्स केला आहे. Front End Design and Verification हे माझे specialization होते.
Verilog, System Verilog, UVM, Perl इ. येते..
GATE-१४ आणि GATE-१५ अनुक्रमे ९४ आणि ९३ पर्सेंटाईल ने पास आहे.

या क्षेत्रात कोणी माबोकर असल्यास कृपया संपर्क साधावा.
pratik.kulkarni001@gmail.com

तसेच या कोर्सेस बद्दल माहिती हवी असल्यास संपर्क साधावा..

धन्यवाद ..

Thanks cinderella and pratik.
Mi sadhya cdac course karate ahe.pan companies itkya gap la consider kartil ka?
Mala kalat nahiye mi course karte ahe ,will it help me in getting calls?

पूजा,
माझा अनुभव या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर देण्याइतका नाही. तसे उत्तर जाणकार देतीलच. माझ्याकडे थोडेसे आहे सांगण्याकरता, ते सांगतो.
माझ्या एका मित्राने आपल्या सारखेच काही वर्ष कंपनीत काम केले, मग ४ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर ती नोकरी सोडून त्याने VLSI चा कोर्स केला. त्याला काही ठिकाणी फ्रेशर नाही म्हणून काही कंपन्यांनी क्रायटेरिया मधून वगळले. परंतु अशा कंपन्यांची संख्या फक्त २० ते ३० % होती. बाकी कंपन्यांनी त्याच्या अनुभवाकडे नक्कीच सकारात्मकतेने बघितले व आता तो एका उत्तम कंपनीत नोकरी करीत आहे..
त्यामुळे मला वाटते आपल्याला नोकरी मिळण्यास अडचण येईल म्हणजे थोडासा वेळ लागू शकेल इतकच. बाकी काहीही होणार नाही..
तसेच आपल्या जुन्या कंपनी मधील मित्र मैत्रिणींचा आपल्याला इंटरव्यू पर्येंत पोहोचण्यास उपयोग होतो शकतो. अशा प्रकारच्या रेफरल ड्राईव्हज साठी प्रयत्न करू शकता...
शुभेच्छा Happy

जर एखाद्या कडे UK or US चा पासपोर्ट असेल तर त्याला भारतात बँकिंग (Investment बँकिंग) मध्ये बाकीच्या लोकांपेक्षा जास्त पगार मिळतो असं कुठे तरी ऐकलं होतं - compared to Indian Passport holder at same level/position. हे खरं आहे का?
कोणी ह्या क्षेत्रातील मंडळी माहिती देऊ शकतील का?
खालील बँका बद्दल माहिती हवी आहे
HSBC, Deutsche Bank, Barclays, Credit Suisse , JP Morgan, Morgan Stanley, BNY Mellon, Goldman Sachs, Nomura, Bank of America, Citi Bank, UBS, RBS, RBC, BNP Paribas, Wells Fargo, Societe Generale, Lazard, etc.

मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या ५०+ वय आणी सलग एकवीस वर्षे अनुभव असलेल्या माझ्या मावस भावाला देशात किंवा परदेशात कुठेही नोकरी हवी आहे. SAP MM वापरण्याचा ( प्रोग्रॅमिंग नव्हे) दहा वर्षे.

कुठे प्रयत्न करावेत? पुण्यात काही दिवस येऊन राहणे योग्य आहे का? इ इ सूचनांचे स्वागत आहे.

विकु, SAP functional experience असेल तर त्या प्रोजेक्ट्स मधे सहज मिळायला हवे. एसएपी कन्सल्टन्सी फर्म्स मधे चौकशी करायला सांगा. नाहीतर रिक्रुटर गाठायला सांगा त्या क्षेत्रातील. माझ्या मते काहीच अडचण यायला नको.

नमस्कार

मी माझ्या पत्नीसाठी जॉब शोधत आहे. तिने MBA(HR) केलय आणि गेली ३ वर्षे Communication Skills/SoftSkills/Spoken-written English/Corporate Training शिकवतेय. आधीची २ वर्षे पुण्याबाहेर काम केलय. पुण्यात सध्या FreeLancing करतेय.

आत्ता एखाद्या कंपनीत permanant नोकरीच्या शोधात आहोत. त्यासाठी एक-दोन कन्सल्टंट कंपन्यांची पण मदत घेत आहे. Naukari.com/monster/Shine वर पण रजिस्टर केलय.
पण एखादा असा कन्सल्टंट आहे ज्याच्याशी प्रत्यक्ष भेटता येईल व जो आम्हाला नोकरी शोधायला मदत करेल तर त्यांची माहिती हवी आहे.

माहिती असल्यास कळवावे.

धन्यवाद.

मी software मैनुअल टॅस्टींग,॑वलीटी मध्ये ५ वर्षे काम केलेले आहे.२ वर्षापुर्वी नोकरी घरची शेती सांभाळावी म्हणून सोडली.२ वर्षे अनुभव घेतला, पुन्हा industry मधे यायच आहे.
बैंन्कींग अप्लीकेशन सपोर्ट मध्ये देखील काम केलं आहे.

नमस्कार,

माझे सी.एस (Executive) पुर्ण झाले आहे. सध्या मी पुणे येथे नोकरीच्या/आर्टीकलशीप शोधात आहे.
Naukari.com/monster/Shine वर पण रजिस्टर केलय.

माहिती असल्यास कळवावे.

धन्यवाद.

Urgently looking for intermediate to expert BI Microsoft SSRS developers for 2 mnths.... Make sure You send 1. Latest CV with details of subject, 2. Latest pay slip 3. Visa status(let me know if based in South Africa or outside SA . Pm or comment before 12 noon in 2 October.

Calling in Delphi Developers for 3 months in South Africa.
Visa and stay will be taken care for the right candidate.

नोकरीचा शोध घेण्यात लिंक्डइनचा सर्वात जास्त उपयोग होतो का? एचआर मॅनेजर्स्/स्टाफींग्/रिक्रूटर्सशी कनेक्शन्स करता येणे हे आहेच पण
इन्डीड, मॉन्स्टर, डाइस वगैरेच्या तुलनेत लिंक्डैन जास्त उपयुक्त ठरले असा कुणाला अनुभव आहे का?

Pages