तडका - सासु दहन

Submitted by vishal maske on 18 November, 2016 - 21:02

सासु दहन

हिवाळा सुरू होताच
सासुची आठवण येते
शेकोटीसाठी सासुची
आपुलकीने साठवण होते

मग सासुच्याच मदतीने
ती थंडीही ऊबवली जाते
सासु दहनाची हि परंपरा
राजरोसपणे राबवली जाते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ!

@ vishal maske, मला नाही समजले. आपण 'सासू' नावाच्या कुठल्यातरी वस्तूविषयी लिहिलेय का? जी शेकोटीत जाळण्याकरीता वापरली जाते. आणि तिची सांगड आपण नामसाधर्म्यामुळे 'सासू' नावाच्या व्यक्तीशी घातली आहे. असं असेल, तर हे खरेच दुर्दैवी आहे.

जळावू लाकडांच्या बाबतीत "सासु" हा शब्द गो. नी. दांडेकरांच्या भटंकती लेखनात अनेक ठिकाणी वाचला आहे.

मस्के जी... तुमच्या सगळ्याच ज्या काहि कविता असतील त्या एकदाच टाका माबोवर... किती धागे विणताहात

अरे बर्‍याच वर्षांपासुन वापरात आहे तो शब्द , लहान मुलं जेव्हा शेकोटीला बसतात तेव्हा सहजपणे म्हणतात , ' ए तुझी सासु आण' त्यात खरी सासु नाही तर गवत / काटक्या अभिप्रेत असतात Proud

अरे बर्‍याच वर्षांपासुन वापरात आहे तो शब्द , लहान मुलं जेव्हा शेकोटीला बसतात तेव्हा सहजपणे म्हणतात , ' ए तुझी सासु आण' त्यात खरी सासु नाही तर गवत / काटक्या अभिप्रेत असतात >>>>>>>

गावाकडे आम्ही असचं म्ह्णायचो शेकोटी करताना Lol

हे बर आहे राव, जाळण्यासाठी सासू अन मग विझवण्यासाठी काय ? सून ? ☺ हा मस्करी भाग झाला . पण धन्यवाद तुमच्यामुळे नवीन शब्द मिळाला

हि कविता विनोदी नाही नक्कीच. पण पहिल्याच प्रतिसादामुळे जो हसण्याचा उमाळा फुटला त्याचा तिसऱ्या प्रतिसादापर्यंत मोठा धबधबा झाला. कधी नव्हे ते प्रचंड व खूप खूप हसलो. Biggrin Biggrin Biggrin कवीला आणि प्रतिसाद देणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद. ( रश्मी.. यांचे "आँ!" वाचून अजूनही तितकेच हसू येत आहे. Lol Lol Lol )

(बादवे नंतरचे प्रतिसाद वाचून कळले सासु आणि सासू असा फरक आहे)