अहिराणी लगिनघाई!

Submitted by मी_आर्या on 17 November, 2016 - 06:23

नमस्कार!
२०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' आपल्या मायबोलीने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते.
त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय. Happy सर्वांना समजेल अशी आशा आहे..

प्रसंग असा आहे:
आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय.

.....
नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो बरं !

नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...

एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथनी नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
दुसरी करवली: बैगं! तुन्ह्या लुगड्यामां तं नै अडकनि? कालदिन तु ते जरीनं लुगडं घालेल व्हतं ना! त्यामां धुंडी ले तं पह्यले.
नवरीनी मावशी: आह्या माय वं! तुन्हा नाकमां तं दखी व्हती मी, तु बेळमाथनी पुजी राह्यन्थी तव्हय. कोन मरी जाय जो ना हात मां पडी व्हई ना तं कल्याण शे!

पहिली करवली: हाव ना व माय ! आते दिपवाळीले लिन्थी! 'यास्ले' कळनं तं मन्ही काई खैर नई.

नवरीनी मायः हा वं बहीन्! जवाईले कळनं तं मग बसं व्हई गयं! आसा दांगडो घाली तो लगिनमां. आन दख तु...आथाईनच वापस जाई इले लिसन! आखो तिले आयुसभर डोस दीथीन तिन्हा सासरकडना लोके ... "भाउना लगिनमां गयी आन नथना आहेर करी उनी चोरास्ले.!!! " तुले सांगस.. हाई शुभीना नवरा भलता आग्यायेताळ शे! एक येळ इस्तव हातमां धरी जाई पन ह्यास्ना सोभाव ना ... बाप रे बाप! शुभे, तु आतेपुरती मन्ही नथ घाली ले बईन! पन त्यास्ले आतेच नको सांगु!

दुसरी करवली: व माय, काकुले सान्गी दे जो... तुन्हा जवाई हाई लगीनमा नुसती सफारी नइ, आन्गठी बी मान्गी राह्यनात.
तिची आई: तुमन्ह त आस शे ना, का "घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका"!

इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.

"माय वं, अण्णाले पह्यलेच सांगं व्हतं मी की मन्ह्या नंदासकडं बी निवतं धाडनं पडी, पन त्यास्ले पत्रिका नै मियनी आतेपावत. तं मन्ही सासु कितली बोलनी माले, म्हाईत शे का? की इन्हा मायबापले काही वळनच नै शे तं पोरले कसं व्हई?, आनि इन्हा बाप तर नाक वर करीसन बोलस.. आसं आनि तसं...!" तु आते ना आते शरदले (चुलतभावाला) गाडी लीसन धाड आणि मन्ही नणंदले ली ये म्हना! माले काई म्हाईत नै...

नवरीनी मायः का वं कस्तुरा? माले एक सांग, तुन्ही नणंदना देरना लगनमां आम्हले निवतं धाडं व्हतं का?आन मंग आते कसा बोलतस तुन्हा सासरकडना? हाई दख! आते तुले खमकी व्हयनं पडी. ४ साल व्हई ग्यात लगनले...! आस शे..."कीतलभी कय तरी, कोयडांच हाथ निघस"

नवरीना बापः उकाव व... तठे नवरदेव ई लागना पारवर आनि तुम्ही काय चावळी राह्यनात आठे? हाऊ बबन्या कोठे शिलगना? वर्हाडना स्वागत कराले फुलमाळा सांगन्या व्हत्या मी कोपर्यावरन्या फुलवालाले! लेवाले ग्यात का कोन? तो सत्या, आज्या तर काई कामनाच नै शेतस! "दिनभर आथ तथ, दिन मावळणा जाऊ कथं"!

त्या वाजावाला, पोटझोड्या उनात का? त्याले म्हना नेमबंद वाजवा, नवरदेवकडना वर्‍हाड पोची राह्यनं ! कव्हय जाई हाई 'सुख्या' आते पारवर? त्यान्हाबरोबर कोन जाई राह्यनं? शेवंता, धुरपदा,कली तुम्हन्या पोरेस्ले धाडा बरं सुख्याना बरोबर!

बबन्या: हाई काय ई राह्यनु हार लीसन! घ्या वं बहिनीओन... गजरा बांधा!

नवरीना काका(नवरीना बापले): दादा, मानकर्‍यास्नी लिश्ट व्हई ना? हाई नारय आनेल शेतस..,. नेमबंद मोजी ल्या बरं! पंगतीमां त्यास्ना ताटेसले लावाना शेतस!

नवरीनी आजली: तेलनपापड्या लिध्यात का? आन सांजोर्‍या? त्या परमिलाले इचार बरं! गिरजे... नवरदेवले पारवर देवाले दुधशेवाया ली ले तं ताटमां!
नवरीची आई: हाओ आत्याबाई! लिधं बरं मी बठ्ठं सामान!
नवरीना काका: चला चला..गाडीमां बठी ल्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहिराणी एवढी जमत नाही बोलायला तरी ऐकायला गोड वाटते कानांना.
लगीनघाई वाचायला छान वाटली.. जणु काही समोरच चालू आहेत प्रसंग..

मस्त मस्त मस्त लिहिलंय एकदम.

तुच बोलत एक पात्री सादर करतेयस असं तरळून गेलं डोळ्यासमोर

पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हाही आवडलं होतं आणि परत वाचायला मजा आली. अहिराणीशी एरवी कधीही संबंध आलेला नसला तरी सग्गळं कळलं Happy