...मग असे द्या पैसे!

Submitted by निनाद on 14 November, 2016 - 19:13

कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या.
तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस
(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...)
-----------
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते.
युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे)

याचे फायदे:

- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.

एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अ‍ॅपस बनवली आहेत बँकांनी. युपीआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे पण मिळते आहे...
कोणतेही वापरले तरी सेफ असावे असे वाटते कारण बाटली बदलली तरी युपीआय ही दारू तीच असणार आहे.

यूपीआय वापरासाठी नोंदणी
Steps for Registration:
1.User downloads the UPI application from the App Store / Banks website
2.User creates his/ her profile by entering details like name, virtual id (payment address), password etc.
3.User goes to “Add/Link/Manage Bank Account” option and links the bank and account number with the virtual id

Generating M – PIN:

1.User selects the bank account from which he/she wants to initiate the transaction
2.User clicks on requried option

(हे वरचे कुणी सुलभ मराठीत भाषांतर करून देईल का? मग ते ही विकिवर टाकता येईल.)

खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे:
Banks live as PSP and Issuer:

1 Andhra Bank

2 Axis Bank

3 Bank of Maharashtra

4 Canara Bank

5 Catholic Syrian Bank

6 DCB Bank

7 Karnataka Bank

8 Union Bank of India

9 United Bank of India

10 Vijaya Bank

11 Punjab National Bank

12 Oriental Bank of Commerce

13 TJSB

14 Federal Bank

15 ICICI Bank

16 UCO Bank

17 South Indian Bank

18 HDFC

---
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.

--
टीपः हा लेख कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक वर वापरला तर चालेल!
---

मर्चंट एण्ड साठी काय सेट अप आहे याची मात्र कल्पना आली नाही..
त्यावर कुणी काही सांगेल का?

तसेच मोबाईल मधले एनएफसी वापरून पैसे कसे देता येतील यावर काही माहिती मिळेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एन्डीटीव्हीवरच्या चर्चेत स्टेट बँकेच्या चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य आल्या होत्या. मीरा सन्याल माजी बँकर, सध्या आम आदमी पक्षाच्या सदस्य) यांनी एप्रिल २०१६ पासून उपलब्ध असलेल्या या प्रणालीचा वापर करण्यावर बँका का भर देत नाहीत असा प्रश्न विचारला, ९पेटीएमच्या जाहिरातीचा संदर्भही होताच) त्यावर भट्टाचार्य यांनी या पद्धतीत अनेक त्रुटी असून एकूण १४ फेजेस (की अन्य कोणती टेक्निकल टर्म असल्याने ) ट्रान्झॅक्शन फेल होण्याच्या शक्यतेचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटले. म्हणजे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल होण्याचे (खाते डेबिट होणे पण पैसे न येणे किंवा पैसे येणे पण खाते डेबिट न होणे) जे प्रमाण आहे, त्यापेक्षा यात ते प्रमाण जास्त असेल.

पुढे त्यांनी हेही सांगितले की ही प्रणाली बँकांनी नाकारलेली नाही. किती व्यवहार केलेत त्याचे आकडेही दिले.

यातले तांत्रिक व्यवहार नक्की कसे बसवले आहेत याची कल्पना नाही. परंतु जसे एक एक इमेल एकदा गेला की गेला. तो फेल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. (उदा. जेथे पाठवला ती साईत किंवा सर्व्हरच डाऊन असणे वगैरे)

युपीआय यामध्ये तर अक्षरशः फक्त काही आकडे आणि अतिशय मोजकी अक्षरे पाठवायची आहेत. काही बाईटस पण याची जागा नसेल. याला बँक् अ‍ॅप्स संलग्न आहेत. म्हणजे एकाच सिस्टिम वर व्यवहार होणार. त्यात फेल होण्यासारखे काय असेल असा प्रश्न पडला आहे.

(म्हणूनच एन एफ सी वापरून व्यवहार शक्य नाही का असा प्रश्न विचारला आहे...)

आपल्या असलेल्या अकाऊंटकरता ही सुविधा घेता येते की नविन अकाऊंट काढावा लागतो.

की वर्ड्स डिसप्ले करून ठेवावे लागतील ना?
आणि कन्फर्मेशन झाल्यावरच ग्राहकाला सुविधा द्याव्या लागतील ना?

सर्वसामान्यांना भाजी दूध किराणा पेपर ही बिले मोबाईल बँकिंग ने देता आली पाहिजेत असे काही यात आहे का?
पेटीएम सारख्या गोश्टी फारशा वापरात अजून दिसत नाहीत.

स्टेट बँक मोबाईल बँकिंग वर MMID आणि imps वापरून मोबाईल फंड ट्रान्सफरची सोय देते. असे पैसाताईंनी तिकडे सांगितले आहे. त्यांनी असेही म्हंटले आहे की मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर सगळे आहे.

म्हणजे पैसे एकमेकांना देण्याचे सोपे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, सोय आहे, अधिकृत आहे, सरकारी आहे...
फक्त त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे.

खरे तर आता नोटांची आवश्यकताच पडायला नको! पैसा अकाऊंटला जावा आणि अकाऊंट मध्येच यावा इतकाच आग्रह धरला पाहिजे...

मला एक शंका आहे.

हे सगळे करण्यासाठी पर ट्रँजॅक्शन जे काय ४०-५० पैसे लागतील, त्याचा भुर्दंड कुणावर? नोट दिली तर मला ट्रँजॅक्शन कॉस्ट शून्य येते.

५ रुपयांचा चहा पिताना ५ रुपयांची नोट जाते. या प्रणालीमुळे साडेपाच जाणार, अन ते पैसेही सरकारला नाही, तर कुण्या खासगी कंपनीला.

अजेंडा क्या है भाई?

सर्वसामान्यांना भाजी दूध किराणा पेपर ही बिले मोबाईल बँकिंग ने देता आली पाहिजेत यासाठीच वापर करावा असे म्हंटले आहे. किमान ५० रुपये ते एक लाखा पर्यंत पैसे देताघेता येतात!

हे सगळे करण्यासाठी पर ट्रँजॅक्शन जे काय ४०-५० पैसे लागतील
फुकट व्हायला हवे! जी बँक असे पैसे लावत असेल त्यांच्या कडचे खाते बदलून टाका...

अन ते पैसेही सरकारला नाही, तर कुण्या खासगी कंपनीला. नाही जात. सरकारी आहे प्रणाली. त्यावर बँकिंग अ‍ॅप्स बसवले जातात.

पर ट्रँझॅक्शन ५ रुपये + सर्व्हिस टॅक्स असं एन्डीटीव्हीवर लिहिलंय. लिंक वर दिलीय. बाप रे! पण खुद्द बँकेने काय सांगितले आहे?

त्या एन्डीटीव्हीवर कुठे विश्वास ठेवता?

बरं. शोधलं.
कॅनरा बँक म्हणते पान ४ ११ वा मुद्दा चार्जेस लावले तर द्यावे लागतील. किती ते दिसत नाही.
http://www.canarabank.com/Upload/English/Content/terms%20n%20conditions%...
वर टेलिकॉमवाल्यांचेही चार्जेस पडतील.
आयसीआयसीआयवर सध्या चार्जेस नाहीत, असं म्हणतेय.
पण तसंही अन्य बँकेतल्या खात्यात पैसे पाठवायला ई बँकिंगमध्ये माझ्या दोनही बँका (म्हणजे जिथे माझे खाते आहे अशा) चार्ज लावतात. वर सर्व्हिस टॅक्स ही आहेच.

https://www.syndicatebank.in/english/MobileBanking.aspx इथली आमच्या बँकेच्या मोबाईल बँकिंग अ‍ॅपची माहिती वाचून घ्या. इतर सर्व सरकारी बँकांची पद्धत सारखीच असणार आहे. खाजगी बँकांचे कदाचित वार्षिक काही चार्जेस असतील ते आपापल्या बँकेला विचारून घ्या. सध्या तरी मोबाईल बँकिंग चालू करण्यासाठी किंवा फंड ट्रान्सफरला कोणतेही चार्जेस नाहीत. जसे एन ई एफ टी लाही नाहीत.

मोबाईल बँकिंगमधे विक्रेत्याकडचा सेटप व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही. पण विक्रेत्याच्या नंबरला पेमेंट पेटीएम प्रमाणेच करता येते. http://www.npci.org.in/imps_product.aspx बँकांच्या मोबाईल बँकिंगचा प्रसार तेवढासा झालेला नाही त्यामुळे इतकी चांगली योजना दुर्लक्षित राहिली आहे. वास्तविक आमची सर्कारी बेंकही मोबाईल बँकिंग वर MMID आणि imps वापरून मोबाईल फंड ट्रान्सफरची सोय देते. म्हणजे ज्या ज्या बँका मोबाईल बँकिंग अ‍ॅपवरून देतात त्या सगळ्यांकडे ही सोय असणार. मात्र लिंक केलेल्या बँकांच्या यादीत आमच्या बँकेचे नाव नाही. वरच्या लोकानी ते यावे म्हणून काही कष्ट घेतलेले नसणार. मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर सगळे आहे. पण एक टक्का सुद्धा लोक वापरत नसावेत. खरे तर ही अधिकृत आणि पेटीएम पेक्षा सुरक्षित सेवा आहे. शिवाय पैसे विक्रेत्याच्या थेट बँक अकाउंटला जमा होतात. मात्र लोकांपर्यंत पोचण्यात फार कमी पडली आहे.

निनाद, भम आणि पैसाताई धन्यवाद!

आज मी स्वाईप मशीनबद्दल विचारलं.
ओपिडीत बसवायचं होतं.
एस बी आय वाले मंथली २५० रू रेंटलवर देतात.
बसवायचे वेगळे चार्जेस घेत नाहीत.
पण पर ट्रन्सेक्शन ०.८ टक्के कापतात असे कळले.
बघू.
आमच्याकडे ते बसवेन.

मला अजूनही ग्राहकांना द्यायला वरच्या प्रकाराची खात्री आणि सुलभता वाटत नाहीये.

पण पर ट्रन्सेक्शन ०.८ टक्के कापतात असे कळले.
<<
म्हणजे १०० रुपयांना ८० पैसे.
१००० रुपयांना ८ रुपये
दहा हजारांना ८० रुपये.

हे विनाकारण बँकवाल्यांना द्यायचे. दुकानदार स्वतःच्या खिशातून तर देणार नाहीच. त्यामुळे ग्राहकांसाठी अजून अच्छे दिन!

अरे हो. ते मशिनचं भाडं व इंटरनेटचा खर्च राहिलाच की!

एस बी आयच्या २५० रु महिना रेंटलात एअरटेलचे सिम आणि त्या द्वारे थ्री जी नेटवर्क फॉर मशीन हे चार्जेसही कवर होतात.

मी ज्या दुकानात आता कार्ड स्वाईप करायला गेले त्याने मला हिशेब करून दाखवला.
माझ्या खरेदीवर १८ रू जात होते त्याचे.
जे तो माझ्याकडून घेत नव्हता.
तर स्वतःच्या पाकिटातून्न्देईन म्हणाला.
पण नेटवर्क कोलॅप्समुळे कार्ड चाललं नाही.
पाचशेच्या जुन्या नोटा घेतल्या.

दुकानदार इतका गोड होता की त्याने मला मशीन उघडून एअरटेलचे सिम दाखवले, बँकेच्या संबंधित अधिकार्‍याचा फोन नं दिला.
आमच्या जिल्ह्यात बँकेतले लोक काही सहकार्य करत नाहीत पण शेजारच्या जिल्ह्यात फोन केल्यास त्याचबॅ़ंकेचे अधिकारी एक दोन दिवसात येऊन माझ्या इथल्या अकाऊंटशी हे कनेक्ट करून देतील असे समजले.

@सातीताई
पैसे अ‍ॅप मार्फत भरू द्यावेत आणि मग
पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट द्यायला सांगायचा असाही एक मार्ग आहे. हा मार्ग मी नियमितपणे वापरतो.

पैसे बँकेतून त्या खात्याला वळते करतो. पैसे गेल्याच्या स्क्रीनचा शॉट घेतो आणि तो पाठवतो - पैसे दिल्याचा पुरावा म्हणून. बहुतेकवेळा प्रश्न येत नाही...
तरी काही लोक नालायक असतील तर हा मार्ग जरा धोक्याचा आहे हे खरे.

युनिफाईड पेमेंट इंटरफेस मार्फत जर लगेच पैसे जमा होत असतील तर मग ते देण्यात काय प्रश्न आहे हे कळले नाही? कारण त्यात बँक अकाऊंट नंबरसुद्धा द्यायचा नाहीये...
म्हणजे कोणतीही माहिती न देता फक्त पैसे जमा होणार.

UPI आणि IMPS द्वारे मोबाईलवरून सोप्या पद्धतीने पेमेंट्स
UPI काय आहे?

Unified Payments Interface.
अर्थात यात सामील झालेल्या बँकापैकी कोणत्याही बँकेच्या ग्राहकांसाठी मोबाईलद्वारे विविध पेमेंट्स करण्याची व्यवस्था. यात सामील असलेल्या एका बँकेचा ग्राहक दुसर्‍या बँकेचे मोबाईल अ‍ॅप वापरून या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. google app store मधून UPI app डाऊनलोड करून घ्यायचे. आपल्या बँकेशी संपर्क करून मोबाईल बँकिंग सुरू करून घ्यायचे आणि मग मोबाईलवरून या app द्वारे विविध पेमेंट्स करायची अशी ही सोपी पद्धत आहे. यात बँकेकडून एक व्हर्चुअल पत्ता abc@pockets अशा प्रकारचा दिला जातो आणि त्याच्या आधारे दुसर्‍याला पेमेंट करता येते किंवा स्वीकारता येते. पेमेंट घेणार्‍याकडे मोबाईल बँकिँग नसेल तरी Account Number + IFSC वापरून त्याला पैसे देता येतात.
Transfer through Virtual ID
Account Number + IFSC
Mobile Number + MMID
Aadhar Number
Collect / Pull money basis Virtual ID
या सर्व पद्धतीनी दुसर्‍याला पैसे देता येतात.
या पद्धतीने दुसर्‍याला छोट्या मोठ्या रकमा मोबाईलद्वारे देता - घेता येतात याशिवाय ऑनलाईन खरेदीच्या साईट्सवरून खरेदी करता येते. pockets हे icici बँकेचे UPI app चे उदाहरण आहे. यात ते ग्राहकाला व्हर्चुअल तसेच मागणी केल्यास फिजिकल व्हिसा कार्ड देतात.

IMPS
ज्या बँका अजून UPI व्यवस्थेत सामील झाल्या नाहीत त्यांच्या ग्राहकांसाठी IMPS उपलब्ध आहे. यात ऑनलाईन खरेदी वगळता इतर छोटीमोठी पेमेंट्स आणि मोबाईल डीटीएच रिचार्ज, वीज, फोन इ. बिले भरणे ही कामे आपल्या स्मार्टफोनवरून करता येतात.
IMPS काय आहे?
Immediate Payment Service
यातही मोबाईलवरून छोटी मोठी पेमेंट्स दुसर्‍या व्यक्तीला करता येतात. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. त्यासाठी आपल्या बँकेचे मोबाईल बँकिंग ऎप डाऊनलोड करून बँकेतून मोबाईल बँकिंग चालू करून घ्यायचे. बँकेतून आपल्याला यासाठी PIN आणि पासवर्ड मिळतो. आणि MMID जनरेट केला जातो. दुसर्‍या व्यक्तीकडे कोणत्याही बँकेचे मोबाईल बँकिंग चालू केले असेल तर या MMID आणि फोन नंबरचा वापर करून पैसे ट्रांसफर करता येतात. समजा दुसर्‍याकडे मोबाईल बँकिंग चालू नसेल तरी त्याचा Account number & IFS Code वापरून मोबाईल NEFT दवारे पैसे ट्रांसफर करता येतात.

सध्या नकद पैशांची चणचण भासत असताना या दोन्ही पद्धती वापरणे सर्वांसाठी सोयीचे आहे कारण ५० पासून ५०००० पर्यँतचे पेमेंट अवघ्या काही मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून करू शकतो. मात्र यासाठी स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. या व्यवस्था बँकिंग सिस्टीम मधून आल्या आहेत आणि सुरक्षित आहेत. फोन हरवल्यास बँकेत फोन करून नंबर ब्लॉक करता येतो. तसेच पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने मोबाईल इतर कोणाच्या हातात पडला तरी तो आपल्या खात्यातून पैसे वापरू शकणार नाही.

या व्यवस्थेसाठी काही बँकात कोणतेही चार्जेस नाहीत मात्र आपल्या बँकेत चार्जेस आहेत का आणि असल्यास किती आहेत याची खातरी त्या त्या बँकेच्या वेबसाईट किंवा हेल्पलाईन वरून करून घ्यावी.

पण पर ट्रन्सेक्शन ०.८ टक्के कापतात असे कळले.
बघू.
आमच्याकडे ते बसवेन.>>

नक्की बसवा. आणि जेवढा जास्त उपयोग होईल ते बघितले तर जास्त फायदा आहे ०.८% गेले तरी.

समजा एखाद्या डॉक्टरला दिवसाला १०००० रुपये रोख मिळत असतिल (हे उत्त्पन्न नाही ह्यात औषधे , लस, विज, जागेचे भाडे, पगार हा खर्च असतो तो जनरली चेक नी जातो). तर दिवसाला ८० रुपये जातिल. पण रोख बॅकेत जमा असल्याने चेक ने किंवा ऑनलाईन बिल भरु शकतो. आणि १०००० रुपय बॅकेत जमा करायला जायचा आणी लाईनीत उभे राहायचे वेळ, गाडीचे पेट्रोल ह्या गोष्टी जमेत घेतल्या तर त्या पेक्षा कमीच खर्च होईल. वेळ ही वाचेल.
ह्या व्यवहारात फाटकी / खोटी नोट येण्याचा प्रेश्न नाही. पैसे जमा झाल्याचे पोच पावती येते.
फक्त सायबर सिक्युरिटीचे बेसिक नियम पाळावर लागतात.

साहिल शहा,
बहुतेक त्यापेक्षाही कमी करणार आहेत आता राष्ट्रीयीकृत बँका असे कळले.
म्हणजे ०.५ किंवा फ्री ऑफ कॉस्ट.

मी मागवलंय एक.
पण सध्या या एक्स्ट्रा कामामुळे उशीर होईल असे म्हणालेत.
एचडीएफसीचे मंथली चार्जेस आणि पर ट्रान्झेक्शन चार्जेस जास्त आहेत.

कळवेनच इथे.

बँकेत पैसे भरायला मी जात नाही.

>>नक्की बसवा. आणि जेवढा जास्त उपयोग होईल ते बघितले तर जास्त फायदा आहे ०.८% गेले तरी.<<

अजुन एक फायदा. भारतात थोडा वेळ लागेल ॲडाॅप्शन करता पण होईल नक्किच...

अपाॅरच्युनिटि काॅस्ट इंपॅक्टस योर बाॅटमलाईन. प्लॅस्टिकमनी पाॅप्युलर झाल्यावर लोक कॅश ठेवत नाहि, क्रेडिटकार्ड वापरण्यावर भर देतात; बॅंकाहि कंझ्युमर्सना इंसेंटिव्हज देतात (कॅशबॅक, लाॅयल्टि पाॅइंट्स इ.). जो वेंडर/सर्विस प्रोवायडर क्रेडिटकार्ड घेत नाहि, त्याच्याकडे लोक जात नाहि, त्याला बिझनेस दिला जात नाहि - हे एक प्रकारचं नुकसानंच आहे...

मस्तं.
एका महिन्यात दोन व्हिजीटस- लॉयल्टी पाँईण्टस - १२ लॉयल्टी पॉईण्टस - एक व्हिजीट फ्री!

स्कीम ठेवायला हवी.

अपाॅरच्युनिटि काॅस्ट इंपॅक्टस योर बाॅटमलाईन. प्लॅस्टिकमनी पाॅप्युलर झाल्यावर लोक कॅश ठेवत नाहि, क्रेडिटकार्ड वापरण्यावर भर देतात; बॅंकाहि कंझ्युमर्सना इंसेंटिव्हज देतात (कॅशबॅक, लाॅयल्टि पाॅइंट्स इ.). जो वेंडर/सर्विस प्रोवायडर क्रेडिटकार्ड घेत नाहि, त्याच्याकडे लोक जात नाहि, त्याला बिझनेस दिला जात नाहि - हे एक प्रकारचं नुकसानंच आहे...

१००% सहमत आहे!
जो वेंडर/सर्विस प्रोवायडर क्रेडिटकार्ड घेत नाही, त्याच्याकडे लोक जात नाही, त्याला बिझनेस दिला जात नाही हे अगदी खरे आहे...
शिवाय जे व्यवसाय रोख(च) पैसे मागतात तेथे इन्कम टॅक्स चा घपला असणार, असे नकळतपणे मनात येतेच!

छान माहिती.. आता अशा प्रणालीची गरज आहेच.

माझी बँक ( बँक ऑफ इंडीया ) आर टी जी एस वर चार्जेस लावत नाही.. पण ती प्रोसेस जरा किचकट आहे म्हणजे ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याच्या बँक अकाऊंट चे सर्व डीटेल्स द्यावे लागतात.

माझे दोन प्रश्न आहेत, कदाचित या धाग्यावर अवांतर असतील कल्पना नाही, पण तरी कोणाकडे उत्तर असल्यास द्या.

१) मला मुंबई लोकल रेल्वेचा मासिक पास काढायचा आहे चार दिवसांनी तर तो आता मी कसा काढावा?

२) मुंबईच्या एका टोकाहून दुसर्‍या टोकापर्यंत टॅक्सीने प्रवास करायचा आहे. किंबहुना वरचेवर करतो. पण आधी अश्यावेळी कधी साधी काळीपिवळी टॅक्सी वापरायचो तर कधी मेरू/टॅबकॅब बोलवायचो. पण पेमेंट नेहमी कॅशनेच करायचो. कॅशलेसचा पर्याय उपलब्ध आहे की नाही ते देखील कधी बघितले नाही. तर ते तसे आहे का? आणि कसे करावे?

ऋन्मेऽऽष ,

१> IRTC च्या साईट वर जाउन कर. मी पास नाही काढला पण रेल्वेचे आरक्षित तिकिट त्याच वेबसाईट वरुन काढत आहे.

२> ओला कॅब मध्ये कॅशलेस चा पर्याय आहे. माझा चुलत भावाने ५००/१००० बाद केल्यावर पनवेल वरुन ओला कॅब मध्ये चलन न वापरता प्रवास केला होता. त्याना दुरध्वनी करुन विचार नाहीतर ओला मनी नावाच्या वेबसाईट वर जाउन बघ.

Pages