एक पत्र "पप्पा"साठी

Submitted by कविता९८ on 13 November, 2016 - 22:25

प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."
माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप काही केलं.पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तो साजरा नाही करणार हे माहित आहे.त्यापेक्षा गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडत पण पप्पा मला हे माहिती आहे की तुम्ही स्वतः साठी काही मागत नाही. काल डोक्यात विचार चालू होता की यावर्षी तुमचा वाढदिवस साजरा करावा. पण तुम्ही देत आलेल्या पॉकेटमनीनेच तुम्हाला सरप्राईझ पार्टी दिली तर तुम्ही खरं खूष होणार का??हा प्रश्न पडला आणि तो विचार मनातच राहिला. जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभी राहिन ना तेव्हा तुम्हाला जो आनंद होईल तो बघायला मला आवडेल.
हे पत्र लिहितेय कारण तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी , किरण साठी खुप काही केलात पण स्वतः ला मात्र विसरलात.तुम्हाला आठवतं का पप्पा चौथीला असताना स्कॉलरशीप परीक्षा साठी तुम्ही मला सोडायला आला होता आणि तिन्ही पेपर होईपर्यंत तुम्ही त्या शाळेच्या मैदानात उभे होता. बाहेर आल्यावर त्या सर्व पालकांच्या घोळक्यात माझी नजर तुम्हाला शोधत होती.तसी.ई.टी. परीक्षेला पण पेपर सोडवुन बाहेर आल्यावर माझी नजर तुम्हाला शोधत होती.तब्बल सहा तास तुम्ही बाहेर थांबला होतात...तुमचा हात पाठीवर असला की माझ सर्व टेंशन गायब होतं..
जन्म घेण्याआधीच मुलीला गर्भातच मारल्या जाणार्या या देशात मी आज जे मला आवडत त्यात शिक्षण घेत आहे ते तुमच्यामुळेच.तुम्ही कधीच माझ्या आणि किरण मध्ये कोणताच भेदभाव केला नाही.खरं मी खूप नशीबवान आहे.दहावी बोर्ड परीक्षेला एक महिनाच बाकी असताना शाळेतून एका काव्यलेखन स्पर्धेत मी भाग घेतला होता...तेव्हा जर तुम्ही सोबत नसता तर कदाचित टेन्शन मुळे काही सुचलं नसतं आणि माझ्या प्रत्येक स्पर्धेच्या दिवशी तुम्ही सुट्टी घेतली.जेव्हा मी त्या स्पर्धेत जिंकायची तेव्हा तुमचा आनंद बघून मला नेहमीच प्रोत्साहन मिळत आलं आहे...
बारावीच्या निकालानंतर तुम्ही किती खुष होता ना..तोच आनंद मला तुम्हाला आयुष्य भर द्यायचा आहे..
तुम्ही माझ्यासाठी खूप केल आणि अजून पण करत आहात.. पण पप्पा आता मला काहीतरी करायच आहे तुमच्यासाठी..आणि तो दिवस येईल लवकरच..
तुम्ही संस्काराची जी शिदोरी दिली आहे ना ती आयुष्यभर पुरुनसुध्दा उरेल..
आतापर्यंत मी जे काही लिहिले..अगदी चारोळी सुध्दा लिहली तरी ती आधी तुम्हाला ऐकवली.माझी पहिली कविता मी पाचवीत असताना लिहिली ती "आई" वर..पण माझ्या साठी एवढ काही करणार्या पप्पासाठी काहीच लिहल नव्हत सॉरी..
कधी रागात तुम्हाला काही बोलली असेन तर सॉरी.आणि प्रत्येक वेळी माझ्या मागे उभे राहिलात म्हणून thank you Happy ....मला 18 वर्षे पुर्ण झाली तरी मला नेहमी तुमची तीच छोटी कऊ म्हणून राहायचं आहे..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा.
- तुमची "कऊ"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कऊ..खूप मस्त लिहीलय...माझ्या बाबांनी स्काॅलरशीप ;mtse सगळ्याचा अभ्यास घेतलेला...कदाचित त्यांनी अभ्यास घेतला म्हणून मला सगळं सक्सेसफुली करायला जमलं.... माझ्या वेळी चौथीच्या स्काॅलशीपमध्ये मला 280/300 मिळालेले तेव्हा आमच्या विभागात माझा पाचवा नंबर आलेला ...शाळेत जेव्हा सत्कार झाला तेव्हाचा त्यांचा आनंद अवर्णनीय होता....योगायोग म्हणजे आजच माझ्या भावाची mts ची परीक्षा झाली आणि आत्ता तुझा धागा वाचला..आतापर्यंत फक्त दहावीच्या परीक्षेला ते नव्हते माझ्याबरोबर कामासाठी जर्मनीला गेल्यामुळे....नाहीतर अशी एकही परीक्षा नाही की जेव्हा ते माझ्यासोबत नव्हते.... दहावीत पण जेव्हा 94.20% मिळालेले तेव्हाही त्यांनीच गणिताचा अभ्यास घेतलेला म्हणून त्यात मला 93/100 मिळाले....नाहीतर गणिताचं आणि माझं कधीच जमायचं नाही...आता बारावीत मी गणित सोडलं..पण ते शिकवणार असते तर नक्कीच ठेवलं असत...आतापर्यंत बाबांनी घेतलेली सगळी मेहेनत झरकन डोळ्यासमोर आली तुझं हे पत्र वाचून....

Pages