एक पत्र "पप्पा"साठी

Submitted by कविता९८ on 13 November, 2016 - 22:25

प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."
माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप काही केलं.पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तो साजरा नाही करणार हे माहित आहे.त्यापेक्षा गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडत पण पप्पा मला हे माहिती आहे की तुम्ही स्वतः साठी काही मागत नाही. काल डोक्यात विचार चालू होता की यावर्षी तुमचा वाढदिवस साजरा करावा. पण तुम्ही देत आलेल्या पॉकेटमनीनेच तुम्हाला सरप्राईझ पार्टी दिली तर तुम्ही खरं खूष होणार का??हा प्रश्न पडला आणि तो विचार मनातच राहिला. जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभी राहिन ना तेव्हा तुम्हाला जो आनंद होईल तो बघायला मला आवडेल.
हे पत्र लिहितेय कारण तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी , किरण साठी खुप काही केलात पण स्वतः ला मात्र विसरलात.तुम्हाला आठवतं का पप्पा चौथीला असताना स्कॉलरशीप परीक्षा साठी तुम्ही मला सोडायला आला होता आणि तिन्ही पेपर होईपर्यंत तुम्ही त्या शाळेच्या मैदानात उभे होता. बाहेर आल्यावर त्या सर्व पालकांच्या घोळक्यात माझी नजर तुम्हाला शोधत होती.तसी.ई.टी. परीक्षेला पण पेपर सोडवुन बाहेर आल्यावर माझी नजर तुम्हाला शोधत होती.तब्बल सहा तास तुम्ही बाहेर थांबला होतात...तुमचा हात पाठीवर असला की माझ सर्व टेंशन गायब होतं..
जन्म घेण्याआधीच मुलीला गर्भातच मारल्या जाणार्या या देशात मी आज जे मला आवडत त्यात शिक्षण घेत आहे ते तुमच्यामुळेच.तुम्ही कधीच माझ्या आणि किरण मध्ये कोणताच भेदभाव केला नाही.खरं मी खूप नशीबवान आहे.दहावी बोर्ड परीक्षेला एक महिनाच बाकी असताना शाळेतून एका काव्यलेखन स्पर्धेत मी भाग घेतला होता...तेव्हा जर तुम्ही सोबत नसता तर कदाचित टेन्शन मुळे काही सुचलं नसतं आणि माझ्या प्रत्येक स्पर्धेच्या दिवशी तुम्ही सुट्टी घेतली.जेव्हा मी त्या स्पर्धेत जिंकायची तेव्हा तुमचा आनंद बघून मला नेहमीच प्रोत्साहन मिळत आलं आहे...
बारावीच्या निकालानंतर तुम्ही किती खुष होता ना..तोच आनंद मला तुम्हाला आयुष्य भर द्यायचा आहे..
तुम्ही माझ्यासाठी खूप केल आणि अजून पण करत आहात.. पण पप्पा आता मला काहीतरी करायच आहे तुमच्यासाठी..आणि तो दिवस येईल लवकरच..
तुम्ही संस्काराची जी शिदोरी दिली आहे ना ती आयुष्यभर पुरुनसुध्दा उरेल..
आतापर्यंत मी जे काही लिहिले..अगदी चारोळी सुध्दा लिहली तरी ती आधी तुम्हाला ऐकवली.माझी पहिली कविता मी पाचवीत असताना लिहिली ती "आई" वर..पण माझ्या साठी एवढ काही करणार्या पप्पासाठी काहीच लिहल नव्हत सॉरी..
कधी रागात तुम्हाला काही बोलली असेन तर सॉरी.आणि प्रत्येक वेळी माझ्या मागे उभे राहिलात म्हणून thank you Happy ....मला 18 वर्षे पुर्ण झाली तरी मला नेहमी तुमची तीच छोटी कऊ म्हणून राहायचं आहे..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा.
- तुमची "कऊ"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर खरेच पप्पांना धन्यवाद द्यायचे असतील तर त्यांच्याबरोबर संपूर्ण हेल्थ चेक अप ला जा. व हेल्थ चेक अप करवून घ्या. एक्स रे काढून घेताना, इतर टेस्ट करून घेताना बरोबर कोणीतरी लागते. तो रोल तुम्ही मनावर घ्या.

त्यांना च ष्मा असेल तर तो नीट आहे का का रिपेअर करायचा आहे ते विचारून तो करून आणून द्या. त्यांना हाय बी पी आहे का? गुढगे दुखी आहे का? ते विचारा. कधी कधी पालक लोक सांगत नाहीत. त्यावरचे औषध घ्यायची त्यांना रोज आठवण करा.

ऑफिसातून आल्यावर गरम चहा, पाणी द्या. त्यांना आराम वाटेल असे करा.
दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

त्यांना च ष्मा असेल तर तो नीट आहे का का रिपेअर करायचा आहे ते विचारून तो करून आणून द्या. त्यांना हाय बी पी आहेका? गुढगे दुखी आहे का? ते विचारा.>>आमच्या पूर्ण नाईक कुटुंबात माझे पप्पा मस्त हेल्दी आहेत.. जीवदानीला जाताना सर्वांत जास्त उत्साहीत पप्पा असतात.. आणि महत्त्वाचे म्हणजे त्याना कोणत व्यसन नाही

जीवदानीला जाताना>> जीवदानी म्हणजे काय? आणि सर्व हेल्दी असले तरीही एक प्रिवेंटिव्ह हेल्थ चेक अप करून घ्या. बीपी चे सिंप्टम नसतात. शुगर चेक करून घ्या. हे सर्व पुढे उपयोगी पडते. आप णा सर्वांचे आरोग्य असेच छान राहो हीच प्रार्थना. तुमचे बाबांवरचे प्रेम वाचून खूप छान वाटले. ही इज लकी टू हॅव अ बेबी लाइक यू. Happy

तुम्हाला आठवतं का पप्पा चौथीला असताना स्कॉलरशीप परीक्षा साठी तुम्ही मला सोडायला आला होता आणि तिन्ही पेपर होईपर्यंत तुम्ही त्या शाळेच्या मैदानात उभे होता.
>>>>>>
अगदी अगदी हे आमच्या पप्पांनीही केलेय, आणि चौथीच्या स्कॉलरशिपलाच केलेय Happy
पुढे ती मला मिळालेली सुद्धा. मुंबईत चौथा आलेलो. याला स्वत:चे कौतुक म्हणू शकता पण सांगायचे हे की आज तुमच्यामुळे आज पुन्ह्यांदा आठवले की त्या यशात त्यांचेही श्रेय होतेच. त्या वर्षभरात माझा अभ्यास घ्यावा ईतकी बुद्धीमत्तेतील हुशारी कदाचित त्यांच्याकडे नव्हती. पण ईतर असे जे काही करावे लागते ते बरेच काही केलेय Happy

तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो Happy

मी महाराष्ट्र मधून चौदावी आली होती..
सातवीला असताना पण स्कॉलरशिप मिळाली..
पण तेव्हा सरांच्या वेताच्या छडीचा मार पण खाल्ला..
मुलगा असो वा मुलगी काही अभ्यास विसरल्यावर छडी मारायचे..

कऊ ईंच का पिंच, मलाही सातवीलाही मिळाली होती. पण तरी मला वाईट वाटलेले. कारण अपेक्षा वाढलेल्या, मुंबईतून पहिले वगैरे येण्याच्या Proud

छान लिहिलंय. पप्पांना शुभेच्छा.

जीवदानी विरारचीना, आम्ही जायचो पूर्वी नालासोपारा इथे राहत होतो तेव्हा. आता रोपवे झालाय असं ऐकलं. जायला हवं एकदा.

कारण अपेक्षा वाढलेल्या, मुंबईतून पहिले वगैरे येण्याच्या>>>होत रे अस कधीकधी...माझ्या दहावीच्या निकालाच्या वेळी सर्वांना वाटलं 90% क्रॉस करणार पण 86.20% मिळाले

kavu 86.20% pn vait nhit g.... khup chan mark pdlet.... fkt aaplyakdun sglyana apeksha astat pn aapan tya purn kru shaklo nhi yache thode vait vatte

धन्यवाद माधव जी..
raviraj sir आता डबल मेहनत घेऊन मम्मा पप्पाना काहीतरी. बनवून दाखवेन.

तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभो>>> +१

छान लिहिलंय. एकदम गोडुलं. पप्पा खुष झाले ना वाचून? म्हणजे पत्र लिहिल्याचं सार्थक झालं म्हणायचं..

असाच आनंद देत रहा त्यांना... गॉड ब्लेस यू Happy

सर? Uhoh
सर नका म्हणू. फक्त संशोधक म्हटलं तरी चालेल.

Pages