मदत हवी आहे - फिटनेस बॅन्ड कोणता घ्यावा.

Submitted by saare_ga_ma_pa on 10 November, 2016 - 07:44

मला हाताच्या मनगटाला बांधायचा, ₹२५०० किंमतीपर्यंत मिळणारा फिटनेस् बँड विकत घ्यायचा आहे.

असा बँड वापरत असणाऱ्या मायबोलीकरांनी, नवीन फिटनेस् बँड विकत घेताना कोणकोणती काळजी घ्यावी? यासंबंधी कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाग्याच्या नावात! >>>>>

धाग्याच्या नावात

हे कॉपीपेस्ट करा बरं तुमच्या प्रतिसादात!

@ सोनु...

बरे झाले तुम्ही लायटली घेतलेत.. नाहीतर त्यावरुन वाद होतील काय असे वाटले पण तोपर्यंत प्रतीसाद दिला होता

@ saare_ga_ma_pa >>>>

ईकडे सगळे सध्या नोटा बदलण्यात किंवा त्यावर चर्चा करण्यात व्यस्त आहेत म्हणुन कदाचीत कोणी काही सुचविले नसेल

खरच घेतलात का बँन्ड..... हो तर कोणता ते सांगा कदाचित दुसर्या कुणाला ही माहिती ऊपयोगी पडेल

मला हाताच्या मनगटाला बांधायचा, ₹२५०० किंमतीपर्यंत मिळणारा फिटनेस् बँड विकत घ्यायचा आहे.

असा बँड वापरत असणाऱ्या मायबोलीकरांनी, नवीन फिटनेस् बँड विकत घेताना कोणकोणती काळजी घ्यावी? यासंबंधी कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद.

हे कॉपीपेस्ट करा बरं तुमच्या धाग्यात!

Happy

@ @ सोनु
हे कॉपीपेस्ट केले.

@ मी मानिनी
आजून घेतला नही.. मायबोली चे २- ३ धागे मिळाले जिथे ह्या बद्दल महिती आहे.
मला एक बरा वाटला आहे तो हा http://www.mi.com/in/miband2/

फक्त स्टेप काउन्ट साठी फिटनेस बँड किंवा स्मार्ट वॉच घ्यायचे आहे. Mi आणि Honor सगळ्यात जास्त विकले गेले आहेत ऑनलाईन, पण रिव्यू काही चांगले तर काही अतिशय वाईट आहेत. फिटबीट आणि गर्मीन फार महाग आहेत माझ्यासाठी. मोबाईल दिवसभर जवळ ठेवत नाही आणि इंटरनेट गरज लागेल तेव्हाच चालू करते. ज्यांनी फिटनेस बँड किंवा स्मार्ट वॉच वापरले आहे त्यांनी प्लीज काहीतरी सुचवा.

स्टेप काऊंट हे आता कमोडटाईज्ड झालेलं आहे. चायनिज पासून ब्रँडेड काहीही घ्या. पट्टा तुटण्याची प्रोबॅबिलिटी बदलते.
किती वेळ झोपलात, किती वेळा कूस बदललीत, किती वेळा शेकहँड केल्यानंतर सॅनिटायझर लावलात, किती वेळा २० सेकंदाहुन कमी वेळ हात धुतलेत?, किती वेळा आलिंगन दिलंत, ते देताना हार्टरेट बदलला का?, ते आलिंगन देणार्‍या दुसर्‍या व्यक्तीचा हार्टरेट काय होता?, सोशल (ब्लुटूथ) डिस्टंसचं किती वेळा उल्लंघन केलंत, ते उल्लंघन केलेल्या डिव्हाईसेची मॅक लिस्ट काय आहे?... आणि मग ही सगळी माहिती वापरुन तुमंच जे प्रोफाईल बनतंय त्याला काय प्रॉडक्ट गळी उतरेल? आणि तो डेटा कसा फक्त आम्ही सिक्युअर ठेवतो आणि आम्हीच कसे व्हेंडर अगनॉस्टिक तुमचा डेटा सगळ्यांना सारखा विकतो... अशा उन्नीस बीस फीचर्सचा फरक पडेल. Happy

Mi 4
स्वस्त आणि मस्त
Basic आहे

माझ्याकडे mi 3 आहे
बँड बरा आहे
पण नुसता तो बँड घालून वजन कमी झालं नाही Light 1

Mi 4
स्वस्त आणि मस्त
Basic आहे

>> यस्स. माझ्याकडे हाच आहे. Happy

धन्यवाद किल्ली आणि पियू.
नुसता तो बँड घालून वजन कमी झालं असतं तर कितीला बरं विकला गेला असता तो बँड Wink खरंच असा शोध का नाही लावत कुणी.