बाळाचे नाव

Submitted by नितीन बाबा शेडगे on 9 November, 2016 - 07:48

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "क " K आणि "ग " G आले आहे.
pl. नाव सुचवा.
वेबसाइट वरती पाहिली नावे, परंतु तीच ती आहेत.
त्यातल्या त्यात आम्ही कैवल्य, कौस्तुभ तसेच Gary हे नाव सुचवले आहे.
Gary हे नाव जरा इंग्लिश वाटते.
वेळोवेळी मायबोली आणि मायबोलीकर धाऊन येतात.
तुमच्या कडून नावे येऊ द्या.

धन्यवाद...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sharvi

माहुल, मेवेंद्र, मनिरुद्ध, ममित, मितेंद्र, माजेंद्र, मक्षय, माज, मुद्धव, मारायण, मजित, मरद, म्रकाश, माजेश, मिनोद, मनमोहन, मश, मादित्य, मिद्धार्थ, मिराट, मपिल, मविनाश, मगजीत, महेंद्र, मौरव, माजीव, मंजीव, मिलीप, मत्रुघ्न, मृषी, मृत्विक, माहीद इ.

मोहक ,मिहीप

मंदिर

मानव

मानव नाव ठेवू नये असे मी सुचवेन.

अ: "तो कोण आहे?"
ब: "तो ना? मानव."
अ: "व्हेरी फनी. आपण काय जनावर आहोत का? सांग ना कोण आहे?"

मन
मोक्ष
मेघ
मधुर
मलय(चंदन)
मधुज
मिहान
माधव
माधवन
मोहनिश
मयूर
मयुरेश
मंगेश
मनवन्त (साहसी)

मलय(चंदन) >> मलय हे एका पर्वताचे नाव आहे, जिथे चंदन सापडते/पूर्वी मोठ्या प्रमाणात असावे. मलयावर राहणारी भिल्ल पुरंध्री चंदनाच्या फांद्या इंधन म्हणून वापरते असा श्लोक आहे Happy

मलेशियात राहणाऱ्या लोकांनाही मलय म्हणतात.

अतिपरिचयादवज्ञा (अतिपरिचयात् अवज्ञा) संततगमनादनादरे (संततगमनात् अनादरो) भवति
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमिन्धनं ( काष्ठम् इंधनं ) कुरूते

अतिपरिचयामुळे अवज्ञा आणि सततच्या येण्याजाण्यामुळे अनादर होतो (होऊ शकतो). म्हणजे कौतुक किंवा नाविन्य रहात नाही. जसं मलय पर्वतावर रहाणारी भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडचंही सरपण करते. (चंदनाचं कौतुक रहात नाही, अवमुल्यन होतं)

मंडळी, मी मामा बनलोय नुकताच. बाळासाठी (मुलगा) छानसं साधं सोपं (दोन वा तिन अक्षरी आणि मोडतोड करता यायला नको असं) तरीही वेगळं असं नाव हवंय. मी येथील जुने धागे आणि इतरही ठिकाणी बरंच धुंडाळंय पण एकही 'क्लिक' होईना.
यश नाव डोक्यात आहे पण अजून पर्याय हवेत तर प्लिज... Happy

Pages