बाळाचे नाव

Submitted by नितीन बाबा शेडगे on 9 November, 2016 - 07:48

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "क " K आणि "ग " G आले आहे.
pl. नाव सुचवा.
वेबसाइट वरती पाहिली नावे, परंतु तीच ती आहेत.
त्यातल्या त्यात आम्ही कैवल्य, कौस्तुभ तसेच Gary हे नाव सुचवले आहे.
Gary हे नाव जरा इंग्लिश वाटते.
वेळोवेळी मायबोली आणि मायबोलीकर धाऊन येतात.
तुमच्या कडून नावे येऊ द्या.

धन्यवाद...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gary हे नाव जरा इंग्लिश वाटते >>> जरा नाही हो पुरेच ईंग्लिश आहे. आपल्या साऊथ डोंबिवलीच्या कर्स्टनचे नाव आहे ते Happy
कैवल्य नाव छान आहे. दिदोदुदा सिरीअलची छाप जाणवत असले तरीही मला नावासकट ते कॅरेक्टर आवडायचे.
कौस्तुभ खूप जुने कॉमन वाटते.

बादवे, तुम्ही हे गप्पांचे पान म्हणून उघडले आहे. म्हणजे वाहता धागा. ईथे आलेली नावे तुम्ही वेळेत पाहिली नाही तर ईतिहासजमा होतील. त्यापेक्षा प्रश्न म्हणून काढले असते तर आवडलेल्या नावांवर लोकांनी लाईक करून पसंती दिली असती. (ईसको बोलते है एक्सपिरन्स Happy )

तुर्तास आपल्याला मदत म्हणून धागा वर काढायला ही पोस्ट. मला नको नको तेच आधी सुचते. तरी एखादे चांगले नाव सुचले पटकन तर टाकेन ईथे Happy

कबीर

कैवल्य नाव छान आहे. >>> नाव चांगलं आहे पण मला व्यक्तिशः , तांत्रिक कारणाने हे नाव आवडत नाही .
म्हणजे कैवल्य नितीन शेडगे - हे नाव नंतर "कै. नि. शेडगे" होईल Sad

कार्तिक, कौशिक, कौशल, कल्पक, कल्पित, कणाद, कण्व, कियान
(कणाद एक ऋषी होते, त्यांनी अणु म्हणजे अ‍ॅटम पासून विश्वाच्या उत्पत्तीची थिअरी मांडली होती, आमच्या नात्यात एका मुलाचं नाव कणाद आहे म्हणून मला माहिती!)
गिरिश, गौरांग, गुरुराज, गगन, गर्व, गौरव

ऋन्मेऽऽष, अव्यक्त मी..., स्वस्ति, मेधा, स्वप्नाली, सपना हरिनामे, ज्ञाती, सनव, vaibhavayare12345,
सर्वांना खुपच धन्यवाद...
स्वस्ति यांनी तर मला डायरेक्ट पोहचवले... बाकि पोस्ट छानच...
अर्थ सुद्धा सांगितलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद..

शार्ट लिस्ट : कल्पक, गुरुराज व कनीष्क तर मस्तच ...

अजुन कोणी बाकि आहे का??

Krishna