मैत्री (भाग ७)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:23

ते कार्य आमच्या सारखे समाज सेवक पूर्ण करतील.   मृत्यूलाही भय वाटले पाहिजे असे शासन करू.  याच दंत कथान मुळे मी मलीन झाली, मनाने नाही मानाने)
ते सर्व ऐकल्या नंतर मला धक्काच बसला.  म्हणजे ही, हे घर बांधायच्या अगोदर पासूनच इथे राहते.  वा! छान! म तू हे सर्वाना का नाही सांगितलस?  तीच उत्तर हे साहजिकच होत.  माझ्या सोबत बोलण्याची हिंमत कोण करणार.  नुस्त भूत बोललं तरी लोक
घाबरतात.  अशा परिस्थितीत इतक मोठ प्रवचन कोण ऐकत बसणार.  बरोबर बोलतेस तू.  माफ करा.  तुम्ही.  माझी औपचारिकता पाहून ती हसली.  आणि बोल्ली माझ्यामते आपण मित्र आहोत.  मग जर एका मित्राने दुसऱ्या मित्राला एकेरी हाक मारली तर काहीच गैर नाही.  मग ही औपचारिकता कशासाठी.   आणि मला नाही आवडणार हे अस.  तुम्ही वगैरे बोल्लेल.  मी विचार न करताच तिला विचारल.  मी तुला एक प्रश्न विचारला तर तुला राग नाहीना येणार.  तिने मला भयानक अशा चेहऱ्याचे प्रतीबिंब
दाखून ती बोल्ली.  तू जर मला प्रश्न विचारलास तर मी तुला खूप रागवेन.  नंतर सामान्य होऊन गालातल्या गालात हसली.  आणि बोल्ली विचार रे.  तुझ्यावर का रागावू? मी खूप हिंमत करून तिला विचारल.  जे तुझ्या सोबत देवाने होऊ नाही दिल.  तू त्या मुली सोबत सुद्धा ते होऊ नाही दिलस.  मग इतर मुलीन सोबत सुद्धा होऊ नये यासाठी तू काहीच का नाही करत?  तिने थोडा विचार केला आणि ती बोल्ली.  तू जे बोलतो आहेस ते बरोबर आहे.  पण, मी या जागी स्थिरावली आहे.  मी ही जागा नाही सोडू शकत मग, मी त्या सर्व घटना कशा थांबवणार?  आणि जेव्हा मी त्या मुलीला वाचवलं.  तेव्हा देवांनी मला साथ दिली पण त्या नंतर मी ही अशी एकटीच आहे तीच हे बोलण मला थोड खटकल.  मी न घाबरता बोल्लो. मला नाही वाटत.  कारण मी आता पर्यंत जे ऐकल आहे, त्या नुसार तू ते केल आहेस, जे एखादा सामान्य माणूस कधीच नाही करू शकत.  मग तू इतक्या सहजतेने कस काय बोलू शकतेस. कि, तू काहीच नाही करू शकत.  मला तरी अस वाटतंय कि, तुझ्या कडे ते आहे.  म्हणजे तुझ्या अंता नंतर तुला देवांनी ते दिलंय, जे एखाद्या सामान्य माणसाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही.  ती माझ्या बोलण्याचा विचार करू लागली.  मला एक सांग, तू लाईट कशी काय बंद केलीस.  तिने विचारल म्हणजे.  अग मगाशी ती सिंहाची डरकाळी ऐकून सरळ सरळ लाईटच बंद केलास ना.  ती भडकली.  अरे माकडा मी भूत असले म्हणून काय झाल.  मी पण घाबरते.  आणि मला नाही समजल त्या क्षणी नक्की काय कराव. म्हणून.  ती अचानक विचारत दंग झाली.  हां तेच तू तो लाईट कसा बंद केलास.  कोणत्याही बटनाला स्पर्श न करताच?  अग माकडीणी म्हणजेच तुझ्या कडे काहीतरी आहेच ना.  ती ओरडली.  ऐ कोणाला माकड बोल्लास तुला पण बंद करेन हां.  जास्त बोल्लास तर.  मला पण राग आला.  ऐ तुझाच शब्द तुलाच परत केला.  आणि  तू अशील भूत तुझ्यासाठी. माझ्यासमोर नाही नाटक करायची.  शांत बस.  झाल बाई तापली.  मग काय मी गप खोलीतून काढता पाय घेतला.  स्पष्ट सांगायचं झालच तर पळत सुटलो. जिन्यातून खाली उतरणार इतक्यात बाईने तिच्या ताकती चा वापर करायला सुरूवात केली.  संपूर्ण जिना गायब.  काय करणार माझ पण तोंड सुटल. घातल्या शिव्या.  हा पण सर्व शिव्या संस्कारी होत्या. बाईला काय झाल काय माहिती. बाई लागली हसायला.  बोल्ली.  अरे ऐ तुला साध्या शिव्या पण नाही देता येत.  म्हणजे मी पण शिव्या नाही देत पण, खूप लोकांना देताना ऐकल आहे. पण मी माझ्याच तोर्यात, ऐ तू शांत बस ग, भूत कुठची.  ती माझ्या कडे आश्चर्याने एकटक बघत बसली.  आणि विचारल. म्हणजे?  म्हणजे मी तुला शिवी दिली.  अरे तू डोक्यावर पडलायस का?  आणि  मी परत मुख्य मुद्याला हात घातला.  त्याच डोक्याचा वापर कर.  आणि समाजसेवा सुरूकर.  सोशल वर्कर हो आणि सोसल तेव्हढच वर्क कर.  आणि आता तिने या विषयाचा गांभीर्या ने विचार केला.  तू बोलतोयस ते खर आहे.  खरच मला एक वेगळीच शक्ती  प्राप्त झाली आहे.  आणि त्याच शक्ती चा वापर करून मी ते सर्व थांबवू शकते... 

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users