मैत्री (भाग ६)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:11

बेड वर ती बसल्याचे प्रिंट्स दिसत होत्या.  त्या प्रिंट्स वरून मी अंदाज बांधायला सुरूवात केली.  पण काहीच जाणवत नव्हते. तिने विचारल काय पाहतो आहेस.  मी मनाशी ठरवल त्या प्रिंट ला मेजर करून हवेत बोलायचं.  म्हणजे माझी दृष्टी पारदर्शीन राहता
तिच्या पर्यंत पोहोचेल.  शेजारीच एक खुर्ची होती. तिच्यावर बसलो.  आणि फक्त इतकच विचारल "कशी आहेस."  इतक्या वर्षा नंतर पहिल्यांदाच कोणीतरी हा प्रश्न विचारला होता तिला.  म्हणून ती भाऊक झाली. आता मला तिच्या डोळ्यातून वाहणारे ते थेंब
स्पष्ट दिसत होते.  माझा अंदाज कधीच चुकत नाही. आणि तो या वेळी सुद्धा चुकला नव्हता.  मी बरोबर तिच्या चेहऱ्याकडे पहात होतो.  दोन सामान्य माणस भेटल्यावर जो संवाद सुरू व्हावा त्या प्रमाणे ती माझ्याशी बोलत होती.  मला या संवादात खंड
पाडायचा नव्हता पण आता तिलाच माझे मन समजले होते.  मी काहीच न विचारता पण जे मनात आले होते त्याचा ठाव घेऊन तिने सर्व काही सांगायला सुरूवात केली.  (पाच वर्षा पूर्वी अचानक एक तरूणी माझ्या दिशेने धावत आली आणि मी जिथे पडले होते.  तिथे येऊन ती पडली.  ते नर भक्षक समोरच होते.  मला अचानक ती रात्र आठवली.  जे माझ्या सोबत घडले नाही ते तिच्या सोबत घडणार होते.  मी तर श्वास  सोडला पण ती अजून जिवंत होती.  म्हणजे, नाही मी हे होऊ नाही देणार.  ते तिला स्पर्श करतील या आधीच मी, मला काही तरी झाल.  मी एक वेगळेच रूप धारण केले होते.  मी ओरडले.  पण माझ ते ओरडण इतक भयानक होत कि मला देखील समजले नाही कि हे कसे घडले.  ते लांडगे पळून गेले.  मी निर्मळ मन मलीन होण्यापासून वाचवू शकले याचा आनंद होता.  ती तिथून सुखरूप घरी गेली.  पण माझ्या सोबत नक्की काय घडले होते.  ते माझे मलाच समजले नव्हते.  आकाशवाणी झाली.  तुला पंच महाभूतांचेवरदान प्राप्त झाले आहे.  आताच काही क्षणान पूर्वी तू विष्णूंचा दहावा अवतार म्हणजेच नरसिंह अवतार धारण केला होतास.  सगळी कडे शांतता झाली.  मी मनाशीच बोल्ले जर मी एखादा अवतार धारण करू शकते, तर मी माझे मूळ रूप सुद्धा धारण करू शकते, म्हणून इतक्या वर्षान पासून मी स्वतःलाच पाहिलं नव्हत.  ते सुंदर प्रतिबिंब आज मला पाहता आल.  मी त्यात सर्व काही हरवून गेले.  इतक्यात मला आवाज आला ते दुष्ट लोक त्या मुलीच्या शोधात परत आले होते.  ती वाचली होती मात्र आता त्यांची नजर माझ्यावर पडली.  ते माझ्या जवळ आले मी पाळण्याचा प्रयत्न करत नाहीय हे पाहून त्यांच्यातला एक जण बोल्ला. 
"शिकार स्वतःहून आलय, जास्त कष्ट नाही घ्यावे लागणार."
 त्या मूर्खाना कुठे माहिती होत.  साक्षात त्यांचा मृत्यू त्यांच्या समोर उभा आहे ते. ते दहा जण होते.  माझ्यावर हल्ला करणारे पण दहाच होते.  त्यांनी माझ्या देहाची विटंबना केली होती.  पण मी यांना जिवंतच फाडणार आहे.  सर्वाच्याच डोळ्यावर पट्टी बांधून एकेकाला पकडून पकडून फाडायला सुरूवात केली.  जंगली प्राण्यांनी शिकार करावी असेते दृष्य होते.  त्या रात्री मी तिथे ज्या अवस्थेत पडले होते.  त्याच अवस्थेत आज ते सर्व जण पडले होते. 
सकाळी पोलीस आले. एखाद्या जनावराने हा हल्ला केला असावा अस समजून जास्त चौकशी न करताच निघून गेले.  तिथे ये जा करणाऱ्या लोकांनी एक दंत कथा तयार केली.  त्या मुलीवर अत्याचार झाला होता तिनेच सूड घेतला. कारण या आधी इथूनच माझा देह सुद्धा घेऊन गेले होते.  झाल मग काय ही जागा शापीत झाली. म्हणजे इथे कोणीच रात्री येऊ नये.  अमावस्या असेल तर फिरकू पण नये.  अशा अंधश्रद्धा पसरवण्यात आल्या.  यांचा फायदा घेऊन काही तळीराम इथे बसायला यायचे.  मला ही गोष्ट खटकायची.  मी सरळ त्यांना पळवून लावायचे.  मात्र ते प्यायलेले असायचे म्हणून त्यांच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवायचं कि, मी त्यांना पळवून लावल आहे म्हणून. ज्या व्यक्ती  ने इथे घर बांधल तो आणि त्याचा परिवार सभ्य लोक आहेत.  म्हणूनच मी त्यांना इथे हे घर बांधू दिले.  लोकांनी त्यांना पण भोंदू कथा सांगून पळवण्याचा प्रयत्न केला पण ते सुशिक्षित आहेत.  शहाणे आहेत. म्हणून त्यांनी घर बांधल.  मात्र जेव्हा मी त्याचं स्वागत करण्यासाठी गेले तेव्हा मात्र ते घाबरले.  मला नाही समजल कि, का? माझ्यात अस घाबरण्या सारख काय आहे?  मी लोकांचा जीव घेतला पण एका निर्मळ मनाला मलीन होण्यापासून वाचवण्यासाठी.  त्यात मी काय गैर केले.  आणि जर केले असेल तर, ते जे वागतात ते योग्य का?  ते वाईट कृत्य करतात आणि कायद्याच्या कचाट्यातून सुद्धा सहीसलामत सुटतात. पुन्हा अजून एका निर्मळ मनाला मलीन करण्यासाठी. मी जर त्यांना मृत्यूदंड दिला तर त्यात वाईट ते काय? जेव्हा एखाद्या रूग्णा चा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून थकतात आणि बोलतात कि, बाकी सर्व देवाच्या हातात.  त्याच प्रमाणे जेव्हा आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटतो तेव्हा पण बोला कि, आता सर्व देवाच्या हातात.  ते...

http://www.maayboli.com/node/60754

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users