मैत्री (भाग २)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 01:12

माझ नाव मार्तंड. मी एक घरीब घरात राहणारा असल्यामुळे. कदाचित,  त्याचमुळे माझी स्वप्न  पूर्ण होऊ शकली नाही. असे माझ्या एका मनाला वाटते. मात्र माझे दुसरे मन सांगते. कि, एकतर मी कार्य नाही  केले किंवा धाडस करून  माझ्या घरातच्यान समोर हे कधी बोलूच नाही शकलो मी. कि मला खर्या आयुष्यात काय बनायचे आहे.  आणि  म्हणूनच माझ स्वप्न  पूर्ण होऊ शकलेले नाही. असो ते स्वप्न मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही कोणत्याही क्षणी पूर्ण करून दाखवेन. कारण स्वप्न  पूर्ण करण्यासाठी संधी ची
वाट पाहण्या पेक्षा मी स्वतःच ती संधी निमार्ण करेन. तसे मी सध्याच्या आयुष्यात खूप प्रयत्न देखील करत आहे. मात्र मनापासून करावे असे काम मिळत नसल्याने आताच याच काही दिवसांपूर्वी  आयुष्यात आलेल्या एका सुंदर स्वप्नाला मी होकार नाही देऊ शकलो. मात्र नकार सुद्धा दिलेला नाही. ते स्वप्न खर व्हावं अशी मनापासून इच्छा आहे आणि  म्हणूनच करावे लागतील ते सर्व प्रयत्न, कार्य मी  करत आहे. पण मार्ग हा योग्यच असला पाहिजे असा माझा अट्टाहास आहे आणि तिला देखील तो आवडेल हे मला माहिती आहे म्हणूनच मी फक्त  आणि  फक्त  तिच्यासाठी  स्वतःला संपूर्ण पणे झोकून दिलंय. स्वतःला तिच्या योग्यतेच होण्यासाठी. मी तिला प्रथम पहिले होते त्या क्षणी मी बहुधा तिच्या त्या निर्मळ मनाचा ठाव घेतला होता. ते मन जरी एखाद्या अथांग महासागरा सारख असल तरी, मला नक्कीच त्याच्या निरागसतेचा अंदाज आला आहे. आता या क्षणी मी
तिच्या याच विचारात मग्न होऊन काहीतरी लिहीत बसलोय. इतक्यात कानावर एक ओळखीचा आवाज आला, मी माझ्या खोलीत बसून आहेना तरी तो आवाज कोणाचा हे ओळखण्याचा प्रयत्न केला, आणि ते बोलतात ना, कि, प्रयत्ने काहीतरी रगडीता
काहीतरी गळे, हा तेच ते, ते तुम्ही बघून घ्या. मामा आला? हो नक्कीच मामा आला, मात्र अजून एक वेगळा आवाज ऐकू येत होता. कोण असेल बर? काहीच कळेना. मी हळूक डोकावून बघितल पण फक्त मामाच दिसत होता. मात्र दुसरी व्यक्ती दिसेचना.
बोल्लो जावूदेत असेल कोणीतरी मामाचा मित्र आपल्याला काय? मी मात्र  माझ्या लिखाणात मग्न होतो. इतक्यात माझा विषय निघाला. झाल लिखाण राहील बाजूला. माझे कान टवकारले थेट त्या चर्चच्या दिशेने. आणि मला ज्याची भीती होती तेच घडल. माझ्या नोकरीचा विषय निघाला. मी डिग्रीच शिक्षण अर्ध्यावर सोडल. कारण शेवटच्या परीक्षेत एक विषय राहिला. आणि मला सुद्धा तो विषय सोडविण्याची इच्छा राहिली नाही. मात्र  माझ्या घरातल्यांचा समज असा होता कि जर मी विषय सोडवला तर मला आकाशातून वीज पडावी अशी नोकरी सुद्धा  लगेच मिळेल. आणि नेमका तोच विषय चालू होता. आणि तितक्यात आई ने हाक मारली. बाहेर गेलो. चर्चा झाली पण मी माझ्या मनाशी पक्क केल पुन्हा परीक्षा  नाही द्यायची. इतर सर्व जरी माझ्या विषयी चिंतातूर असलेतरी, मामाच्या मित्रा च्या मनात मात्र  काहीतरी वेगळच चालू होते. आणि ते मी हेरलं होत. मी पुन्हा परीक्षा देणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे हे समजल्यावर सर्वजण शांत झाले आणि हीच होती ती शांतता जी माझ्या आयुष्यात वादळ घेऊन आली.
मामाचे मित्र बोल्ले मी याला नोकरीला लावू शकतो. मात्र याला हरकत नसावी. हे शब्द ऐकून मी हादरलो. सरकारी नोकरी ती सुद्धा बारावी पास ला. कस शक्य आहे? विचार केला आणि. होकार दिला. पण मामाला प्रश्न पडला, कारण अशा कोणत्याच नोकरीचा उल्लेख त्यांनी मामा कडे कधी केलाच नव्हता. मामा चा मित्र त्या क्षणी माझ्या घरातल्यान समोर फक्त इतकच बोल्ले. तुला टायपिंग येत ना? मी हो बोलण्याच्या आधीच माझ्या घरातल्यांनी माझ्या बद्दल गोडवे गायले मामा त्याच्या मित्राला काही विचारणार इतक्यात ते उठले आणि बोल्ले चल तुला नक्की काय काम करायचे आहे ते दाखवतो. घरातले तर मागेच लागले जा जा म्हणून. मी लगेच तयार होऊन आलो आणि आम्ही त्यांच्या गाडीत बसून निघालो. मार्ग तसा ओळखीचा होता. पण शंका नव्हती कारण मामा सोबत होता. गाडी एका ओळखीच्या बंगल्या पाशी येऊन थांबली. हा तोच बंगला आहे ज्याच्या मी प्रेमात पडलोय. ही लहान कहाणी आहे. सांगतो चला या. अरे flashback मधे या हो. मी एका सर्वेक्षण करण्याच्या कार्यालयात कामाला असताना तीन चार वेळा या रस्त्याने येण जाण केल होत तेव्हा बघत्या क्षणी हा बंगला मला आवडला होता. आणि मनाशी नक्की केल कि स्वतःच अस घर घेणार तर तो हा बंगला. हो कारण मी अजून पर्यंत जितक्या वेळा या बंगल्याला बघितल होत तेव्हा तेव्हा ह्या बंगल्यात कोणीच राहत नाही हेच दिसून आल. मला तर शंका पण आली होती कि हा भूत बंगला तर नाही ना? मामाचा मित्र (अरे flashback संपला चला या बाहेर) गाडीतून उतरले मामा ही खाली उतरला. मला मात्र शंका आली होती कारण या बंगल्याच्या मागे म्हणजे अगोदर सुद्धा एक सरकारी कार्यालय आहे आणि आम्ही तिथेच जाणार आहोत. त्यांनी मला बाहेर बोलावल आणि बोल्ले ये तुला तुझ काम दाखवतो. ते बंगल्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते जणू...

http://www.maayboli.com/node/60750

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users