मैत्री (भाग १)

Submitted by Suyog patil on 6 November, 2016 - 00:57

(ही कथा वाचताना अथवा वाचून झाल्या नंतर जर निर्मळ भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी मी आताच जाहीर माफी मागतो. ही कथा कोणाच्याही वयक्ति आयुष्यावर भाष्य करणारी नसून कोणीही स्वतःला यात पाहू नये.)
धन्यवाद.
ते पाच सहा जण होते. बहुतेक जन्माचे उपाशी. आयुष्यात कधी एखाद्या स्त्री ला पहिलेच नव्हते बहुधा. अशा त्या क्रूर नजरा.  ती रात्र  त्यांचीच होती. बाहेर गावचे होते ते. गरीब असतील? माहिती नाही. पण एकूण चित्र पाहता हेच जाणवत होते. मात्र खरच ते
गरीब होते? .. . कि त्यांना पाहिजे असलेली उब आधीच मिळाली होती? पण तरी देखील त्यांची भूक?.... हो... ते भूकेलेच होते. आता  त्या लांडग्यांची पुढची शिकार मी होणार?..... नाही. मी?.... . या कल्पनेनेच मी घाबरून  गेले आणि गाडी थांबत्या क्षणी गाडीतून उतरले. तडक स्टेशन मधून बाहेर येऊन आता या वेळी मिळेल ती गाडी पकडून पळेन. मी धावत धावत चुकून गाडी समोर आली. आता याच क्षणी ही गाडी मला चिरडून जाणार इतक्यात गाडी थांबली. ड्रायव्हर काहीतरी बोलत होता. पण त्या क्षणी माझ्या मनाची अवस्था मलाच ठावूक. मी गाडीत बसले. घाईगडबडीत तिकीट काढल. मुठीत जीव कवटाळून डोळे घट्ट बंद
करून  बसून होते काही क्षणानंतर गाडी परत थांबली माझी हिमंतच नाही झाली, पण आता भीतीनेमाझा जीव घेण्याचेठरवले होते. ते लांडगे गाडीत आले होते. अगदी  माझ्या मागच्या सीट्स वर बसले होते भर पावसात भिजावं इतकी मी भिजली होते. भीतीने शरीर थरथरत होते. शेवटची गाडी असल्याने फक्त पुरूषच होते गाडीत. एक लहान मुलगी होती पण गाढ झोपली होती. कंडक्टर काकांच्या शेजारीच बसली होती. निरागस. गाडी खूप वेळानेकुठेतरी थांबली तेव्हा मी डोळे उघडून बघितल शेजारीच एक शाळा होती. मला वाटल माझा जीव वाचेल कारण अशा शाळांच्या  मागे शिक्षकांचे निवासस्थान असते. म्हणून मी सुद्धा  लगेच गाडीतून उतरले आणि शाळेच्या दिशेने धाव घेतली. मी एका अंधाऱ्या रस्त्याने जात होती. इतक्यात गाडी परत थांबल्याचा आवाज आला. मला अंदाज आला, ते माझ्या मागावरच आहेत. मी पळत सुटले. अचानक पायाखाली दगड आला आणि पडले. डोक्याला जबर मार बसला होता. मी रक्तात न्हावून निघाले. ते मागून आले मला पाहता क्षणी त्यांच्यातील एक जन बोलला
"वो देख, वहा हे"
मी तिथून पळ काढला. धावता धावता अचानक अंगातले त्राण संपले मी कोसळले, शेवटचा श्वास घेतला आणि  हे जग सोडल. पण त्या शेवटच्या क्षणी देखील त्यांचाच आवाज कानावर पडला
"वो देख, मिल गई. चल......." .
देवानेमला का नाही बोलावले, नाही समजलेपण त्याने मला त्या वेदनांन पासून दूर केले. मी शेवटचा श्वास घेत्या क्षणी माझ्या आतम्याने देह त्याग केला पण, तो माझ्या देहा जवळच होता.
माझा दुसरा जन्म.
सुरवातीला काही कळेच ना, मी जंगलात होते का? आजूबाजूला झाड तर होती मागे  लांबून कुठूनतरी गाड्यांचे आवाज माझ्या कानावर पडत होते म्हणजे इथे जवळच लोक वस्ती आहे. मग हा वास? ह्या  माश्या? नक्की कश्यावर घोंगावत आहे? अचानक वारेवाहू लागले. विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस का नाही पडत? मला प्रश्न पडला. एकच लख्ख प्रकाश पडला. मृत्यूचा सुद्धा थरकाप उडेल असा विजेचा आवाज झाला. दुसऱ्या क्षणी माझ्या शेजारच्या झाडावर वीज कोसळली. आगीनेतांडव सुरू  केल. आणि  त्या आगीच्या प्रकाशात मला ते विदारक सत्य दिसल ज्याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती. मी मेले अस समजून ते लांडगे तिथून निघून गेले असणार असा माझा समज झाला. मात्र  ती गिधाडाची जात होती. त्या मेलेल्या देहाचेसुद्धा त्यांनी लचके तोडले होते. मी हादरले. आक्रोश केला. रडू लागले आणि  अचानक पाऊस सुरू झाला. ते आभाळ सुद्धा  माझ्या दुःखात सहभागी झाल. दुसऱ्या क्षणी मला कसली तरी जाणीव झाली आणि मी देवाचे मना पासून आभार मानले. कारण देवानेच मला वाचवले होते त्यानेच मला सोडवले होते. माझा देह तर ते मिळवू शकले मात्र  माझ्या आत्म्याला स्पर्श नाही करू शकले.

http://www.maayboli.com/node/60749

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(ही कथा वाचताना अथवा वाचून झाल्या नंतर जर निर्मळ भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी मी आताच जाहीर माफी मागतो. ही कथा कोणाच्याही वयक्ति आयुष्यावर भाष्य करणारी नसून कोणीही स्वतःला यात पाहू नये.)----

वेगळेच आहे डिस्क्लेमर!

वेगळेच आहे डिस्क्लेमर!-

ते संपूर्ण कथेला साठी आहे.

आपल्या नाजूक भावना कधीही दुखावल्या जाऊ नयेत म्हणून