लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर एका दिवसाची बंदी !

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 November, 2016 - 15:43

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे अतिप्रमाणात वार्तांकन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला एक दिवसासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पहिल्यांदाच एखाद्या वाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचे वार्ताकन करताना ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीने हवाई तळावर मिग आणि लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफगोळे, हेलिकॉप्टर्स आणि दारूगोळा याचा ठावठिकाणा सांगणारे तपशीलवार वार्ताकन केले होते. यामुळे दहशतवादी हल्ला करणा-यांना आणखी माहिती मिळाली असती असा निष्कर्ष केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समितीने  काढला होता. त्यानुसार एनडीटीव्हीवर एक दिवसांसाठी प्रक्षेपण बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

..

माझ्या आठवणीप्रमाणे 26/11 मुंबई हल्ल्याच्यावेळीही एका वाहिनीने (हीच होती का?) उत्साहात वा ब्रेकींग न्यूज साठी वा आणखी एखाद्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांना फायदेशीर ठरेन असे चित्रकरण केल्याचा आवाज सोशलसाईटवर उठला होता. पुढे तो आवाज बहुधा सोशलसाईटवरच दबला.

जर एखाद्या वाहिनीमुळे थेट देशाची सुरक्षाच धोक्यात येत असेल तर अशी कारवाई करत त्यांना सक्त ताकीद देणे वरकरणी योग्य वाटत आहे.

पण आपला देश लोकशाहीने नटलेला आहे. ईथे अतिरेक्यांचा एनकाऊंटर झाला म्हणून मानवतावादी संघटना आवाज उठवू शकतात, ईथे कसाबसारख्या एखाद्या दहशतवाद्यालाही कोर्ट कचेरीच्या मार्गानेच शिक्षा ठोठावली जाते. अशी लोकशाही ज्या देशात जपली जाते तिथे एखाद्या वृत्तवाहिनीवरील बंदीच्या कारवाईला समर्थन न देणारी मते नक्कीच असतील. ती देखील जाणून घ्यायला आवडतील. आणि हो, यात कुठलाही उपरोध नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन, गुड, कोणीतरी हे ठणकावायलाच हवे होते.

>>चर्चा, चर्चा म्हणजे काय? तर तुम्ही कोणत्या बाजूचे आहात ते जाहीर करून टाका अन् कळपात सामील व्हा. या बाजूला, नाही तर त्या बाजूला. मध्यम मार्ग नाहीच. दारांवर फुल्या मारण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.

सत्यवचन श्रीमान !

पाकळ्या नाय आमच्याकडे डायरेक्ट पिसं काढायची सिस्टीम आहे.

स्वतःला संतुलित म्हणवणारे प्रत्यक्षात एका साईडला असतात, व स्वतःच फुल्या मारत असतात, ती गोष्ट वेगळी Wink

After burning midnight oil and netpacks justifying the ban on NDTV, our dear bhakts have been stabbed in the back by BJP Govt. who has now lifted the ban on NDTV India. Heartfelt condolences for their severely mangled hearts.

एक भाप्र. जानेवारीतलं प्रक्षेपण देशहिताच्या विरोधात होतं हे नो्व्हेंबरात कळलं?

Pages