एटिकेट्‌स श्रिंप आणि श्रीमंती !

Submitted by Charudutt Ramti... on 4 November, 2016 - 09:01

' नीट उभा रहा...! '
' अरेsss निदान शर्ट तरी नीssट 'इन' करायचास ! '
' तुला न कुठे न्यायचि म्हणून सोय नाही! '
' हे कुठ काय पच्केल याचा नेम नाही. '
' तू ज़रा बाहेर थांब...मी आत जाउन आले ’ ( इति. पुर्वी आई, हल्ली सौ. )

ही अशी असंख्य वाक्यं, लहान पणा पासून जो माणूस स्वत: विषयी ऐकत आला आहे, त्याला ‘एटीकेट्स’ नावाच्या दुर्धर अश्या मानसिक आजाराची संपूर्ण कल्पना असते.

एटीकेट्स चा जन्म हा जेवण्याच्या पंगती किंवा बुफे पासून सुरू होतो. (लीज्जतवाला) ऊडदाचा पापड आवाज न करता कसा खायचा? आमरसपुरीचा आस्वाद भुर्का न मारता कसा घ्यायचा? आम्रखंड हे वाटीत तर्जनी बुडवून खायचे पक्वान्न, त्या प्राणप्रिय अश्या थंडगार आम्रखंडा चे शेवटचे बोट न चाटता ‘हळहळत’ पानावरून कसे उठायचे? ह्या सगळ्याची बळजबरी करवून घेतलेली प्रॅक्टीस म्हणजे एटिकेट्स.

आपल्या घरच्या किंवा आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलेल्या एखाद्या कार्याला गेलो की मला दुसर्याने दिलेल्या गिफ्ट चे चमचमते रॅपर उघडून आत काय आहे हे एखाद्या लहान मुला प्रमाणे ताबडतोब पाहण्याचा फार मोह होतो...पण 'अहो हे आणि कशाला...?' असे म्हणत मी आयुष्यभर एकटिएटस या नावाखाली नुस्त 'मन' मारत आलोय. मला एकदा फार इच्छा आहे. की समोरच्याने दिलेल पाकीट त्याच्या समोरच उघडून त्यातल्या नोटा मोजत 'ते वेळात वेळ काढून आले ह्याच समाधान' व्यक्त करायच आहे. पण ह्या एटिकेट्स च्या लफड्या मधे त्या समोरच्याला इच्छा असूनही आम्रखंडात तर्जनि बुडवून ते खाता येत नाही आणि मला त्याच्या समोर नोटा मोजून मागच्या पाकिटात घालता येत नाहीत.

एकदा मागे असेच मी आणि आमची सौ. आम्हीही कसे श्रीमंत आहोत हे हिच्या मैत्रिणी ला पटावे म्हणून मैत्रीण, तिचा नवरा आणि आम्ही दोघे, उगाचच अती महागड्या अश्या फाइन डाइनिंग रेस्तोरंट मधे जेवायला गेलो. ह्या फाइन डायनिंग वाल्या रेस्तोरंट मधे काहीही कारण नसताना खिशाला जबरा ‘फाइन’ बसतो. मला खरतर अश्या महागड्या हॉटेल मधे उगाचच त्या 'वेटर' 'स्टुअर्डस' आणि 'क्रू' च दडपण येत. का ते माहीत नाही. पहिल्या पासून ! विशेषता: मला मागे एकदा ऑफीस मधल्या कुणी तरी सांगितल् 'की ह्या फाईव स्टार मधल्या वेटर्स ला आपल्या पेक्षा जास्त पगार असतो' हे ऐकल्या पासून तर हे अनामिक दडपण फारच वाढल. अहो फाईव स्टार मधे दडपण न यायला तुम्ही एकतर प्रत्यक्ष रतन टाटा तरी पाहिजे 'नाहीतर रंगीला मधले 'अमिरखान’ तरी! आमच्या सारखे अर्धवट इंगीनीरींग शिकून ऑटोमोबाइल कंपनी मधे असेंब्ली लाईन वर सूपरविजन करणारे ‘मिस्त्रि’ 'ताsज' बीsज च्या लायकिचेच नाहीत.

तरी पण आम्ही “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” म्हणत बायकोचा शब्द खाली न पाडता त्या उच्चभ्रू खाणावळीत गेलोच. जायच्या आधीपासूनच…'अहो फक्त इंग्रजीत बोला हा वेटर शी तिथल्या ! ' अशा सूचना देत देत मला सौ. एटिकेट्स चे डोस ( किंवा सूप ) पाजत होती. माझ अश्या वेळी कुणी ब्लड प्रेशर चेक केल तर तर किती भरेल...दीडशे बाय नव्वद तरी नक्की अशी शंका येते.
कारण सूपच्या लिस्ट मधले एकही नाव ओळखीच नसत. ईंग्लिश भाषेत त्या फ्रेंच 'डिश' ऑर्डर करता करता नाकी नौ येतात.

' मिँट्रोन सिझर सूप ' हे सगळ्यात स्वतातल असत. पण ते ही साडेतीनशे रुपये. मग 'ते वन बाय टू' मागावायच की सूप न मागवता सरळ 'गुजराती थाली' है क्या तुम्हारे पास अस त्याच्या अंगावर खेक्सायच?'
मग त्यातल्या त्यात मध्यम मार्ग...दोन फुल्ल सूप मागवयाचे. आणि 'शेयर' करायचे. नवरा बायको मधे. काय करणार गरीबी वाईट.

मी इंग्रजी मधे ' सsव ( 'आर' साइलेंट ) टू 'मिँट्रोन सिझर सूप प्लीsज.. वूई लाइक फ्रेंच सूप्स'

“डेफनेट्ली स्स...! ब(t) ले(t) मी छे(t)ल यु...मिँट्रोन इस इटालिय्न न वि सs(r)व विथ श्रिंप”

फुकणीच्या फ्रेंच असुदे, इटॅलियन असुदे नाहीतर 'चायनीज' तू आन् म्हणल की आनायच...आपली एकदा का सटक्ली की मंग काय खर नाय हा आदिच सांगतोय...!! ( हे माझ्या वरील झालेल्या एटीकेट रूपी संस्कारांचे आणि मी जिवापाड जपलेला रांगडे पणा ह्या दोन्हीच माझ्या मनातल द्वन्द ह्यांच एक छोटस अव्यक्त अस गोंडस रूप... )

“ओह श्रिंप...! डॅट्स कूल.."… माझ्या खोटारडे पणा चा कळस झालेला (एटिकेट्स खोटारडे पणा म्हणून हीनवणे ह्या इतके बॅड मॅनर्स दुसरे नसतील.). तू श्रिंप घाल नाहीतर विंचू घाल आमच्या सुपात. आम्ही चिमटी मधे पकडून बशित ठेऊ त्याला, आणि उरलेल सूप घटा घटा पीऊ. (परत एकदा तेच मघासचच ते अव्यक्त अस गोंडस रूप...)

इकडे माझे हे 'एटिकेट्स' चे जादूचे प्रयोग सुरू असतात आणि तिकडे खाली 'ही' तिच्या पेन्सिल हिल्स सॅण्डल्स ने माझ्या 'कोल्हापुरी' छप्पल ने पायावर वारंवार 'वार' करून मला काहीतरी खुणावत असते. शेवटी मी चिडून दोन्ही पाय एकमेकांमधे अडकवून खुर्ची च्या मागे तिच्या 'सॅण्डल्स' च्या रेंज पलीकडे जातील असे नेऊन पार्क करतो. माझा पाय हिच्या सॅण्डल्सच्या 'कवरेज क्षेत्रा च्या बाहेर गेलाय हे लक्षात आल्यावर ती तीच कोपर माझ्या बरगड्या आणि लहानआतडी असतात त्या जागी पोटावर बाहेर च्या बाजून शर्ट आणि बाही ह्यांचा मधोमध घुसवयचा नवा कार्यक्रम सुरू करते. माझी अवस्था 'श्रिंप नको पण ढोपर आवर' अशी बापुडवाणी. म्हणून मला हे फाईव स्टार मधले 'श्रींप' आणि 'श्रीपंती' चाळे आवडत नाहीत ते ह्या साठी.

एटीकेट्स हा विषय केवळ एका मोठया ग्रंथाचा नव्हे तर ग्रंथ मालिके चाच आहे खरतर. म्हणजे सावरकरांचे समग्र वान्ग्मय खंड एक ते खंड तेरा… किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया पार्ट ३ ऑफ ७ ! त्या धर्तीवर 'एटीकेट्स- अ होलिसटिक परस्पेक्टिव इन द हींटरलॅंड ऑफ मॉडर्न इंडिया' असं जर पुस्तक कुणीतरी ( कूणीतरी म्हणजे मी च ! ) लिहायच ठरवल तर कदाचित् एखादा ‘जन्म’ सुद्धा अपूरा पडेल. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी मात्र काय काय एटिकेट्स पळावे लागतात त्यावर सध्या फावल्या वेळात अभ्यास करतोय.

चारूदत्त रामतीर्थकर
४ नोव्हे. १६ (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ कुमार१, धन्यवाद!!!

@ Nidhii, वैतागून सांगितलं शेवटी "बस की आता नैतर हाताने खाईन बघ.">>> हे बाकी लई भारी!!! मला फार आवडलं हं!!!

लोकांना साधा डोसा काटा चमच्याने खायला कसं काय जमतं बुवा?....

चिकन, मटण चॉप सुरीने कापून, टोच्याने तोंडात टाकायचे म्हणजे कठीणच काम ए!

आणि ते चायनिस! च्यांव म्यांव! त्या काटक्यांनी भात कसा काय खातात कोण जाणे. भाताचे एक एक शीत तोंडात टाकून पोट कसं काय भरत असेल?

काटक्यांनी व्यवस्थित खाता येत असेल तर एकेक शीत नाही खावे लागत हो Happy
अर्थात मलाही नाही जमत, गरजही नाही पडली. पण फ्राईड राईस मात्र नूडल्ससारखा काट्यांनीच खायला मजा येते. चमचे बोअर करतात. आणि हाताने खाण्याची कल्पनाही करू शकत नाही. याऊलट चिकन बिर्याणी हातानेच खायला आवडते. तेच वेज बिर्याणी मात्र चमच्याने बरी वाटते.

पिझ्झा घरी मागवला तर हातात धरून एकेक बाईट घेत. पण पिझ्झा हट मध्ये गेल्यास सुरीनेच कापायला मजा येते.

चिकन तंदूरी हाताने न खाता काटे सुरी वापरणारया माणसाकडे पाहून मात्र मला गरगरायला लागते मग ते कितीही पॉश हॉटेल का असेना. असले लोकं गपचूप बोनलेस का खात नाहीत हेच समजत नाही.

आमच्या ऑफिसमध्ये काही महाभाग ब्रेफाला आलेले समोसे, आलू/गोबि तस्तम पराठे एक हातात फोर्क न एक हातात चमचा धरून घास तोडायाचा प्रयत्न करत खात असतात ..
चक्क एकदातर प्लेन पराठा - वाटाणा सब्जी असा मेनू होता अन तो देखील एक महाभाग वरिल पद्धतीने खात होता.. Happy

निधी, नवर्‍याला सांगायचे - उगाच भर पब्लिकमधे माझ्या "चुका" काढू नको - तसेहि दुसरा काय खातो आहे, कसे खातो आहे त्यावर टीका करणे हे अत्यंत वाईट्ट मॅनर्स. तुम्ही पण त्याला हे तिथल्या तिथे बजावून सांगा.

"आणि ते चायनिस! त्या काटक्यांनी भात कसा काय खातात कोण जाणे. भाताचे एक एक शीत तोंडात टाकून पोट कसं काय भरत असेल?" - अफाट लोकसंख्या आणी अन्न-धान्याची कमतरता ह्यावर उपाय म्हणूनच तर चॉप-स्टीक्स चा जन्म झालाय (पूर्वी). बराच वेळ खात बसलं की पोट भरल्याची जाणीव मेंदुला होते.

अफाट लोकसंख्या आणी अन्न-धान्याची कमतरता ह्यावर उपाय म्हणूनच तर चॉप-स्टीक्स चा जन्म झालाय (पूर्वी). बराच वेळ खात बसलं की पोट भरल्याची जाणीव मेंदुला होते.----

खरंच? आय मीन, बराच वेळ खात बसलं की पोट भरल्याची जाणीव मेंदुला होते, हे पटले पण चॉप-स्टीक्स चा जन्म त्यामुळे झालाय?

Pages