दिवाळी अंक २०१६

Submitted by भरत. on 3 November, 2016 - 22:49

दिवाळी अंक बाजारात, घरांत, वाचनालयांत येऊन खूप दिवस झाले. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जपान्यांनी भारत, चीन, कोरिया या देशांत जितका नरसंहार केला, तितका अन्य कुणीही केला नसेल. <<
नुकतीच या संदर्भातली 'कम्फर्ट विमेन' बद्दलची एक डॉक्यु पाह्यलीये इफ्फीमधे. तेव्हापासून अजून अस्वस्थ आहे.

तिथे आपला ध्वज फडकवूनसुद्धा बसूंनी या अत्याचाराविरुद्ध अवाक्षरही काढलं नाही. >> Regarding this I found below from Wiki. there are chances that Bose was not aware of this. So if the truth is not clear why to blame Bose?

The Arzi Hukumat-e-Azad Hind[edit]

On December 29, 1943, political control of the islands was passed to the Azad Hind government of Subhas Chandra Bose. Bose visited Port Blair to raise the tricolour flag of the Indian National Army. During this, his only visit to the Andamans, he was kept carefully screened from the local population by the Japanese authorities. Various attempts were made to inform him of the sufferings of the people of the Andamans, and the fact that many local Indian Nationalists were at that time being tortured in the Cellular Jail. Bose does not seem to have been aware of this, and the judgment of some is that he "failed his people".[

मला साहित्यप्रेमीचा दिवाळी अंक आवडला. त्यातील लेखक/अभ्यासकांची त्यांच्या परिचितांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे/स्मृतिचित्रे वाचली. सर्वांनीच चांगला आढावा घेतला आहे. नुसतेच स्मरणरंजनात न रमता त्या त्या व्यक्तिच्या गुणांचा, कर्टुत्वाचा व कारकिर्दीचा चांगला आढावा घेतला आहे असे मला वाटले.
निनाद बेडेकरांवरील लेख वाचताना या माणसाने काय काय केले ते बघून आश्चर्यचकीत व्हायला झाले. स मा गर्गे, सुहासिनी इर्लेकर या मला अपरिचीत अभ्यासकांवरील लेखांनी माहितीत भर पडली.

बालकपालक, टाइमपास, शाळा व सैराट या चित्रपटांचा कुमार पिढीवर होणारा परिणाम हा परिसंवाद फारच फुसकट निघाला. त्यातील केवळ माधव वझ्यांचा लेख सारासार विचार करून लिहिलेला आहे, बाकी नुसतेच पाडलेले लेख वाटले.

पुलंनी बेगम अख्तर व खानोलकरांवर लिहिलेले लेख कुठल्या पुस्तकात आहेत? (खानोलकरांवरील लेख वाचला आहे असे वाटते मात्र तो लेख वाचला की पेंडश्यांच्या एक मित्र पुस्तकात त्याबद्दलचा उल्लेख वाचला आहे याबद्दल संभ्रम आहे).

हे सर्व लेख वाचताना असेही जाणवले की चिन्मय दामले या अभ्यासकाच्या कामाचा एक आढावा घेऊन लेख लिहिण्याची गरज आहे. कुणीतरी हे काम अंगावर घ्यावे.

अवचटांचे लेख मात्र सोर्‍यातून पाडलेले नेहेमीप्रमाणे. >> + १०००.
गेली १० वर्षे त्यांचे हेच चालले आहे. तेव्हा त्यांच्या लेखाची पाने उलटून पुढे जावे हे बरे.
या माणसाने 'अतिपरिचयात अवज्ञा' करून घेतलेली आहे.
२५ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या शोषितांवरील लिखाणाबाबत मात्र त्यांना सलाम !

Pages