पार्टीसाठी कोणता मेन्यू परफेक्ट??

Submitted by कविता९८ on 3 November, 2016 - 13:25

6 नोव्हेंबर ला मला 18 वर्षे पूर्ण होणार..
त्यासाठी एक पार्टी आयोजित केली आहे..
पण पार्टी मध्ये कॉलनीमधल्या बच्चेकंपनी पासून कॉलेज मधील तरुण मित्रमैत्रिणी या सर्वांना निमंत्रण द्यायचे असल्याने नक्की असा कोणता मेन्यु ठरवावा जेणेकरून तो सर्वांना आवडेल??
त्यात काही मैत्रिणी शाकाहारी आहेत..
पप्पांच्या मते बाहेरून मागवण्यापेक्षा घरीच सर्व बनवून नंतर टेरेस वर celebration करावे..
परंतु मेन्युच्या बाबतीत गाडी अडतेय ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Manchurian/ French fries, Chinese fried rice / pizza, noddles / pasta, cold drink / ice cream , cake

मी माझ्या मुलाच्या बर्थ्डे पार्टीला हा मेनु ठेवला होता. सर्व घरी बनवले होते.

१. पाणी-पुरी: पुरी विकत. गोड-तिखट् पाणी आधी बनवुन ठेवले फ्रिज्मधे. पार्टिच्या दिवशी बटाटा उकडून तिखट, चाट मसाला घातला फक्त. शेव, कान्दा, बुन्दी ठेवू शकता. लोक स्वतः बनवून घेतात.
२. इडली शेप ढोकळा (चितळे ढोकळा मिक्स पर्फेक्ट)
३. पाव-भाजी: भाज्या बारीक कापाव्या लागत नाहीत. पाव कापून, बटर लावून ओव्हनमधे गरम केले. एक्दम होतात आणि मस्त ब्राऊन होतात.
४. छोले-भातः मोक्ळा भात (गरम मसाले घालून उक्डला). छोलेसाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवून ठेवली होती. दुसर्या दिवशी फक्त ग्रेव्ही पाणी आणि हवे असेल तर कोथिम्बीर घालून उकळून त्यात छोले घातले.
५. गुलाब्जाम- २ दिवस आधी बनवले. ते खराब होत नाहीत. अगेन चितळे जिन्दाबाद.
६. लहान मुलान्साठी पास्ता केला होता. पण सर्वानाच आवडला. पेस्तो सॉस घरी बनवू शकता, दोन दिवस आधी तो पेस्ट सारखा असतो. पार्टिदिवशी पास्ता उकडून सॉस, चीज, ऑलिव्ह इ घालून पास्ता पतकन झाला.

इथे फोटो देतेय. फोटोमधल्या पास्ता, छोले, भात, भाजी यान्चे एकेक ट्रे अजून ओव्हन्मधे होते. साधारण ३५ मोठे आणि १४ मुले होती पार्टिला.
14633635_1288863304520975_4691926346459099973_o.jpg

Vidya. Happy

विद्या मस्त फोटो आणि मेनु पण मस्त खास करुन जर घरी बनवणार असेल तर.

गुलाब जाम च्या एवजी जिलेबी, रस मलाई टाईप बंगाली मिठाई पण चालेल.

धन्यवाद साहिल,अन्जू,अमा,राया,राजसी..
विद्या ताई फोटो मस्त आहेत ग..
रविवार आहे मग नॉनवेजचा एखाद दुसरा पदार्थ ठेवला तर??
कारण मी गोवा ला belong करते

चिकन तंदुरी/ डिप फ्राईड चिकन, चिकन लॉलिपॉप, अंड्यात घोळ्वुन तळलेली कोलंबी, सुरमई, पापलेट, उकडुन मसाला लावलेली अंडी. सर्व आधी बनवुन, हिटेड ट्रेझ बनवता येतील.

घरीच सर्व बनवायचे असेल तर तुम्हाला घरी काय चांगले बनवता येते वा येईल हे तुम्हालाच ठरवायचे आहे. मुळात सारेच पदार्थ घरी बनवायचे हा हट्ट सोडा. तुम्ही गोव्याचे आहात तर नॉनवेज आणि फिशमध्ये जे तुम्हाला बेस्ट जमते ते घरी बनवा. फिशकरी, फिशफ्राय किंवा आपले झिंगाफ्राय बेस्ट. सोलकढी जमत असेल तर ती सुद्धा ठेवा. पाहुण्यांना तुम्ही तुमच्या घरची गोव्याची स्पेशालिटी द्या. आणि उगाच सारे पदार्थ घरी करायचा त्रास न उचलता तुमच्या एरीयामध्ये जे स्पेशल मिळते त्यानुसार काही बाहेरून ऑर्डर करा. उदाहरणार्थ, पावभाजी ही बरेच लोकांना आवडते म्हणून ठेवण्यापेक्षा तुमच्या ईथे कुठे सरस मिळते का किंवा घरी कोण भारी करते का यानुसारच ठरवा किंवा काट मारा.

लाख बात की एक बात सांगतो. प्रकार चार ठेवा किंवा चौदा. सर्व्ह चांदीच्या ताटात करा किंवा सोन्याच्या. पदार्थ चवदार असतो तेव्हाच त्या पार्टीतल्या जेवणाची आठवण ठेवली आणि काढली जाते. मला चिकन तंदूरी आवडते. कोणी पार्टीला ठेवली आणि मला बोलावले तर आवडेनच. पण मला आवडते म्हणजे मी आणखी सतरा ठिकाणी हजारदा ती खाल्ली असणार. मी आजवर खाल्लेल्या बेस्ट चिकन तंदूरींपैकी एक जर त्या पार्टीत असेल तरच ती यादगार बनणार. पार्टी यादगार बनवायला बघा Happy

आणि हो, अठराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मतदारयादीत नाव टाकायला विसरू नका Happy

कारण मी गोवा ला belong करते >> बाप्रे...मराठीच्या बाई आल्या इथे तर तुमचं काही खरं नाही...मराठी शिका सांगणार आधी.

अठराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मतदारयादीत नाव टाकायला विसरू नका>>धन्यवाद ऋन्मेष दादा...

मराठीच्या बाई आल्या इथे तर तुमचं काही खरं नाही...मराठी शिका सांगणार आधी.>>मला मराठी, हिंदी, इंग्रजी, मालवणी उत्तम रित्या बोलता येतात Happy

लाख बात की एक बात सांगतो. प्रकार चार ठेवा किंवा चौदा. सर्व्ह चांदीच्या ताटात करा किंवा सोन्याच्या. पदार्थ चवदार असतो तेव्हाच त्या पार्टीतल्या जेवणाची आठवण ठेवली आणि काढली जाते. >>>>>>> लय भारी Happy