टेनेसी व स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क

Submitted by वेगळी on 1 November, 2016 - 02:19

तर नुकतेच आम्ही सरत्या उन्हाळ्यात नॅशव्हिल, टेनेसी येथे मूव्ह झालो आहोत. टेनेसी मध्ये कोणी माबोकर आहेत का? आमच्या आधीच्या गावात महाराष्ट्र मंडळ वगैरे भानगड नव्हतीच. इथे बघून भरून आलंय.

मला विचारायचं होतं स्मोकी माऊंटन नॅशनल पार्कबद्दल. आता यंदा फॉल कलर्स बघायला जाण्यास तर ऊशीर झाला. पुढील वर्षी नक्की करणार. पण कोणी स्मोकीला गेलेले असतील त्यांनी कधी- कुठल्या ऋतुत गेलेलात ते लिहीलं तर बरं होईल. चांगले ट्रेक्स केले असतील तर कृपया सांगा. कोणी हिवाळ्यात गेलंय का तिथे? कॅबिन बूक करून हिवाळ्यात जाण्याची कल्पना कशी आहे?

अजून आजू- बाजूला आवर्जुन जावं असं काय आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा इथं प्रतिसाद नोंदवा हो. एक धागा सापडला स्मोकी माऊंटनवर इथे. पण अजून जरा अनुभव वाचायला आवडेल. आम्हाला पण पुढील वर्षात करायचं आहे स्मोकी माऊंटन.

नॉक्सव्हिल आणी पर्यायाने, गॅटलिनबर्ग - ओबेर गॅटलिनबर्ग, स्मोकीज ला खूप नियमितपणे जाणं होतं. तो सगळा परिसर सुंदर आहे. उन्हाळा / हिवाळा, दोन्ही ऋतुंमधे मला तिथे जायला आवडतं. अजुन तरी तिथे जायचा कंटाळा नाही आला. ट्रेक अद्याप नाही केला.

आम्ही गेलो होतो हिवाळ्यात, २५ डिसेंबरला. केबिन बुक केली होती चार दिवसांसाठी. सर्व गरजेच्या वस्तु होत्या केबीनमध्ये. बाहेर दोनेक फुट बर्फ होता. अतिशय हळु ड्राइव्ह करावे लागत होते. काही काही रस्त्यांसाटी टायर्सना चेन लावणे मस्ट आहे. पांढरेशुभ्र बर्फ झाडांवर, घरांवर बघायला अतिशय सुंदर वाटते. जरुर जा हिवाळ्यात. इन्डोअर अ‍ॅक्टिविटीज बर्याच आहेत टाउनमध्ये.

धन्यवाद!

http://www.maayboli.com/node/17145 इथे पण थोडी माहिती सापडली. पुढील वर्षी फॉल कलर्स बघायला जाउ असे वाटतेय.

स्प्रिंगमधे आमच्या इथले बरेच जण वाईल्ड फ्लॉवर्स बघायला जातात. ट्रेक वगैरे करायची आमची कुवत नाही त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी फॉल कलर्स बघायला गेलो होतो. गाडीतुन फिरत फॉल कलर्स बघितले. फॉल कलर्सचा कॅम असतो त्यामुळे साधारण अंदाज येतो आणि त्यानुसार ट्रिप आखता येते. मासे खायला आवडत असेल तर गावात एक ट्राउट हाऊस म्हणून मस्त रेस्टॉरंट आहे.

ऑफ सिझनबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.
मागे एकदा आम्ही ऐन फॉलमध्ये गेलो होतो. इ त के देसी होते की चुकून अमेरिकन साऊथमध्ये जायच्या ऐवजी भारताच्या साऊथमध्ये पोचलो की काय असं वाटावं Wink एकूणात देसींचा कलकलाट, गर्दी, बेशिस्तपणा अगदी उठून दिसत होता. पुन्हा कधी गेलो तर ऑफ सिझनलाच जाऊ असं ठरवलं तेव्हाच.
इनडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये आम्ही रात्री पिजन फोर्ज गावात टायटॅनिक म्युझियम बघायला गेलो होतो ते मला खूप आवडलं होतं.

सनव - हो, गर्दी टाळायची असेल तर हिवाळ्यात जाणे उत्त्म. गॅटलिनबर्ग टाउनमध्ये इनडोअर अ‍ॅक्टिविटीज आहेत. इन्डोअर अ‍ॅम्युझमेंट पार्क, गो-कार्टिंग, मेझ इ. एक रोप वे आहे. वर टेकडीवर इन्डोअर स्केटिंग, पार्क, असे बरेच काही आहे. नावे आता लक्षात नाहीत.