स्मोकी माऊंटन्स.. टेनेन्सी (अमेरिका) भाग - १/२

Submitted by आवळा on 19 June, 2010 - 18:39

ऊत्तर अमेरिकेच्या ऊत्तर भागात राहत असल्यामुळे .. हिवाळ्याच्या आधी . शक्य तितके फिरून घ्यायचे ठरले..
बरेच डेस्टिनेशन्स विचाराधिन होते.. डेन्वर/ येसुमिती/ मोंटाना - Glacier - राष्ट्रीय ऊद्यान .. grand Canyon etc...
स्मोकी माऊंटन्स बद्दल पण बरेच ऐकुन होतो.. (पण तिकडे नवीन नवीन लग्न झालेल्यांनीच किंवा ******* पब्लिक ने जावे असा कानमंत्र काही हितचिंतक लोकांनी ऐकू घातला)
आम्ही(मी आणी बाकीचे चांडाळ चौकडी) आयुष्यातल्या ब्रम्हचर्यत्व या फेज मधुनच जात आहोत..

ह्यवर बरेच वादविवाद झाले.. शेवटि सगळ्यांच्याच (सर्व निसर्ग प्रेमी असल्यामुळे Happy ) मनात जायचे असल्यामुळे..
हा स्मोकीचा ठराव संमत झाला..

सोबत एक पालुपद.. (आता जाऊन नुसते बघुन येउयात.. पुढ्च्या खेपेला काही प्रॉब्लेम नाही येनार मग आपल्याला)
ऊगाच जास्त $$$$ ऊडवले असा फील येऊ नये म्हणुन हे वाक्य Wink

४५० माईल्स चा प्रवास .. ड्राईव्ह जर ३ तासांपेक्षा जास्त असेल तर शक्यतो.. विमान / बस / ट्रेन ह्या वाहन सुविधावापराव्यात.. हे बौध्दीक ईतर कार्यकर्ते कडुन घेतलेले..

आम्च्या कंपुला संतवाणी खुप आवडते विशेषतः हे वाक्य "ऐकावे जनाचे करावे मनाचे"
सर्व ऑप्शन्स बघुन झाल्यावर ड्राईव्ह करुन जाणे हेच सगळ्यात स्वस्त ऑप्शन होते Happy

Hertz ची rental car ऊचलली AAA discount मारुन

प्लॅन अगदी अघोरी... शुक्र. दुपारी ईलीनॉय ईथुन निघुन ४५० माईल्स ड्राईव्ह करायचा.
आणी स्मोकीला २ AM ला हॉटेल गाठायचे.. मग सकाळी ७ पर्यंत झोपुन ८ पर्यंत आवरुन परत स्मोकी बघायला जायचे.. पुर्ण शनीवार.. आणी पुर्ण रवीवार..
रवीवारी पण पुर्ण दिवस स्मोकी बघायचे आणी संध्याकाळी परत ईलीनॉयला..

सोबतीला ३ ड्रायवर.. त्यात एकाची ड्राईव्हींग हिस्टरी खुपच छान होती (ईथे छान ह्याचा मतित अर्थ समजुन घेणे Happy )

पण सगळे अगदी ठरल्या प्रमाणे घडुन आले .. तर ट्रीप ला बिलकुल मजाच येत नाही Happy

हेच ते वाहन ....
Car1.jpg

आंधळा मागतो एक डोळा आणी देव देतो २ अशीच गत झाली..
आम्ही मेडियम साईझ कार बुक केलेली.. पण Hertz कडे ती त्यावेळेला ऊपलब्धच नव्हती..
त्यांनी SUV दिली ७ सिटर Happy

ट्रीपची सुरुवात अगदी झकास .. वॉलमार्ट मधुन स्नॅक्स/ जुस ई.. ट्रीप ऊपयोगी पदार्थ खरेदी केले.. अगदी कधी नव्हे ते प्लॅन प्रमाणे गाडी वेळेवर मिळाली आणी अगदी वेळेवर निघालो सुध्दा...

(पण मनात काहीतरी चुकचुकत होते.. हे असे एकदम नीट आणी चांगले कसकाय होत आहे बुवा आँ ? )

गाडी I-74 नी IndianaPolis कडे ताशी ७० माईल्स (११२ कि.मी) ह्या वेगाने धावत होती.
३ ड्रायव्हर असल्यामुळे .. ज्याची हिस्टरी खुपच छान होती त्याला सर्वात आधीचा म्हणजे दिवसाचा ३ तासाचा ड्राईव्ह दिला ( आणी साधारण १५० माईल्स प्रत्येकानी चालवायचे असा साधा हिशोब )

हा IndianaPolis कडे जाताना घेतलेला फोटो..
DSCN0384.jpg

मी सगळ्यात शेवटी ड्राईव्ह करणार म्हनुन मागच्या सीट वर बसुन निष्फ्ळ झोपायचा प्रयत्न करत होतो ते पण संध्याकाळी ६ वाजता Lol .. कारण शेवटच्या पल्ल्यात म्हनजे रात्री १२ - २ पर्यंत ड्राईव्ह करताना झोप येऊ नये म्हनुन...
**********************************************************************************************
गाडी ने अचानक झटके द्यायला सुरु केले.. .
अचानक गाडी सारखी डाव्या कडेला फेकली जात होती.. आम्ही साधारण १०० माईल्स ड्राईव्ह केले असेल..
नंतर त्या ड्रायव्हर वाल्या ला झापले "नीट चालव रे माकडा" .. "झोपेत आहेस का" वैगैरे वैगैरे

तशीच गाडी पुढे ६० माईल्स दमटवली.. IndianaPolis मधे एक मस्त हॉटेल आहे .. ऊडपी रेस्टॉरंट.. तिकडे पोट फुटेपर्यंत जेवन केले.. (कारण अमेरिकेत प्रथमच एवढे छान भारतीय जेवण मिळाले.. ) मनात आजुन एक आंनदाची ऊफाळी आली ट्रीप किती छान होत आहे Happy

आता ईकडे ड्रायवर चेंज केला.. पट्टीतला ड्रायवर चालवायला बसवला आणी गाडी आता केनटकी च्या दिशेने धावत होती..

I-74 सोडुन I-65 वर गाडी हायवेला लागली..
गाडी परत सारखी डावीकडे खेचली जाऊ लागली... Sad

आता confirm झाले गाडीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे... I-65 वर EXIT घेतला..
एका पेट्रोल पंप वर गाडीची हवा चेक केली... एक फार मोठा साक्षात्कार झाला..
गाडिच्या मागच्या दोन्ही चाकातली हवा होती १८ पी.एस.आय. जी की normally ३२ पी.एस.आय. पाहिजे..
Uhoh

सगळ्यांनाच साक्षात्कार झाला आपण एका फार मोठ्या होणार्या अपघातातुन वाचलो आहोत Happy

गाडीत हवा भरुन बिचकत बिचकत गाडी हायवे नी निघाली. ६०-६५ MPH च्या वरती घ्यायची हिम्मत नाही व्हायची
जरा ६०-६५ MPH च्या वरती नेली की आभास व्हायचे गाडी डावीकडे कलत आहे ह्याचे Angry

२५० माईल्स ड्राईव्ह आम्ही मध्यरात्रीच्या १२:१५ पर्यंत पुर्ण केले.. (गाडीचा हवा कार्यक्रम आणी जेवन ह्यातच वेळ गेला).. नंतर एका EXIT ला कॉफी घेतली आणी शेवटचा टप्पा Lexington ते Piegon Forge असा २०८ माईल्स चा प्रवास बाकी होता Uhoh
लक्षात आले की आता पोहचायला ३:३० वाजणार सकाळचे..
म्हणजे १२:३० ते ३:३० हा ड्राईव्ह माझ्या वाटेला आलेला
स्पीड लिमीट तिकडे ७५ MPH आहे .. मी मस्त गाडी ८०-८५-९० ह्य स्पीड नी चालवली.. पोलीसमामा ह्य प्राण्यांचा अंदाजा घेत घेत Happy ..
आणी आम्ही piegon forge ला सकाळी ३ ला (तब्बल ३० मी. आधी) पोहचलो.. म्हणटले.. चला बरेच झाले एकच तास ऊशीर झाला आहे.. हॉटेल मधे चेक ईन केले .. तिकडे घड्याळ बघतोय तर ४:०५ AM Sad

मला वाटले बिघडले असनार.. म्हनून मोबाईल काढला त्यात पण ४:०५ सकाळचे..
फार मोठा गैरसमज झालेला होता वाजले ३:०० होते पण ते Illinois मधे as per central time
आणी Tennessee Easter time zone नुसार आहे म्हनजे १ तास पुढे Uhoh

तसेच झोपले सगळे जण .. सकाळी हॉटेलचा फुल नाश्ता मारला आणी हॉटेल बाहेर आलो गाडी काढण्यासाठी की
हे एक मस्त निसर्ग चित्रच समोर दिसले
DSCN0449.JPG

मग as per plan सगळ्यात आधी होते

River Rafting ..

Piegon Forge to White water Rafting कडे जाताना टिपलेले काही छायाचित्रे..

DSCN0397.JPGDSCN0424.JPGDSCN0442.JPGDSCN0499.JPGDSCN0512.JPG

आता आली खरी मजा राफ्टींगला.. कंपुतल्या एकाने ताप काढला अंगावर :(.. म्हणून तो येऊ शकला नाही..

आम्ही ३ जनांनी राफ्टींग ला सुरुवात केली.. सोबत एक मेंटर होता नाव्हाडी Happy

IMG_0182.JPG

आता राफ्टींग एकदम मस्त सुरू झाले.. त्या नाव्हाड्यानी मस्त प्रॅक्टीस करुन घेतली आधी

IMG_0184.JPG

हा एकदम धमाल सीन होता .. सगळ्यात डावीकडच्या गड्याचे अस्त्र पडले Rofl
आणी सोबत तो पण पडला ..फक्त नशीब येवढेच की ते महाशय नदीत नाही पडले Happy

IMG_0187.JPG

आणी आता हा दुसरा पोझ .. महाशयांना स्वता: ऊठताच येत नव्हते Happy

IMG_0190.JPG

आणी हा तिसरा भयानक पोझ.. महाशय वेदनांनी कळवळत होते Proud

IMG_0196.JPG

राईड झाल्यावर नाव्हाडी सरांबरोबर काढलेला हा फोटो..

DSCN0469.JPG

*****************************************************************************************************************
क्रमशः

ऊर्वरीत भागात
गॅटलीनबर्ग ते चेरो़की हा सीनीक हायवे..
Cades Cove
गॅटलीनबर्ग येथील निसर्ग सौंदर्य.. आणी काही राईड्स .
Piegon Forge येथील helicopter Ride

गुलमोहर: 

प्रतिसाद दिल्या बद्द्ल सर्वांचे आभार..
सर्वच फोटो चांगले आले आहेत. पण ईथे माबोवर फोटो साईझ १५३ के.बी एवढीच अपलोड करता येते त्यामुळे
फोटो रिसोल्युशन ४००० * ३००० चे कमी करुन ६००*४५० असले काहीतरी करावे लागले म्हनुन काही फोटोस अस्पष्ट
दिसत आहेत..
ओरिजिनल फोटो कसे टाकायचे ह्याची कुणाला आयडिया असेल तर नक्की सांगा Happy

मस्तं फोटो..
स्मोकी माउन्टन्स वर हाउस रेन्ट करून फॉल सिझन मधे रहायला मजा येते .. गॅटलिन्बर्ग डाउन्टाउन पण सही आहे.

छान माहिती. राफ्टींगचे फोटो छानच आहेत.

ओरिजिनल फोटो कसे टाकायचे ह्याची कुणाला आयडिया असेल तर नक्की सांगा>>> तुमच्या विपुमध्ये लिहिले आहे Happy