खाणे

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

काय खावे काही कळत नाही
वजन माझे वाढत नाही;
सुपं पिणार्‍यांचे कळेना
वजन कसे उतरत नाही!!!!

पाच किलोचा पिल्सबरी
पंधरा दिवस पुरत नाही
पातेलंभर डाळभाजी
चमचाभर उरत नाही!

बालपणीचे छायाचित्र
जुने मुळीच वाटत नाही;
शाळेतील मित्र मात्र
ओळखायला येत नाही!!!!

मुस्तफातील काचणार्‍या बॅगा
पेलता पेलत नाही, तरी
Wet-Market मधील भाज्यांचा
मोह काही आवरत नाही!

गाठोड्यातील जुने कपडे
अंगात कधी दाटले नाही
शिंप्याच्या वहीतले माप
वीस वर्षात बदलले नाही!

ताई म्हणते चर्तुभूज हो
एका हातानी 'ती' भरवेल
दुसर्‍या हातानी तू खाशील
वेईंग मशीनचे काटे
एकदम टोकाला पोचतील!

-बी

चतुर्भूज होच तू... 'बी' चं कधी झाड होईल कळणार पण नाय तुला
>> दाद अशक्य आहेस!! बी, ताईचा सल्ला ऐक आता तू.
एका हातानी 'ती' भरवेल
दुसर्‍या हातानी तू खाशील
>> आणी दुसर्‍या हाताने तू पण तिला भरव.. Happy
--------------
नंदिनी
--------------

Pages