“मेरे प्रिय आत्मन् . . ."

Submitted by मार्गी on 17 October, 2016 - 04:54

ओशो. . . .

जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . . आयुष्याची दोन भागांमध्ये विभागणी करावी- जुलै २०१२ पूर्वी आणि जुलै २०१२ नंतर असं. . .

तेव्हा भेट होण्यापूर्वी अनेक वेळेस त्यांच्याबद्दल तुटक तुटक ऐकलं होतं. वाचलं होतं. पण म्हणतात ना योग्य वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे पूर्वी अनेक निमित्ताने त्यांचं नाव कानी पडूनही परिचय झाला नव्हता. पण त्यानंतर मात्र परिचय झाला; ओळख झाली; एक नवी मिती जीवनात आली. . .

उस ज़िन्दगी से कैसे गिला करे जिस ज़िन्दगी ने मिलवा दिया आपसे. .

ओशो कसे होते, त्यांनी नक्की काय केलं, ते खरोखर महान होते का, ह्यामध्ये मी तर्क करू इच्छित नाही. मी जवळच्या लोकांना इतकंच सांगतो की, ओशो ऐका, वाचा, अनुभवा! थोडी चव घेऊन बघा! आणि मग ठरवा काय ते!

गेल्या चार वर्षांमध्ये इतकं काही भरभरून मिळालं की सांगायची सोय नाही. आणि ते जे सांगतात ते किती जीवनाशी निगडीत आहे, हे पदोपदी कळत गेलं. ते जे म्हणतात; ते जे सांगतात; त्याची प्रचिती बाहेर कोणत्या शास्त्रात नाही, तर आपल्याच जीवनाच्या अनुभवामध्ये मिळते, हे अनुभवलं. . .

नंतर हळु हळु असंख्य प्रेम गीतांचा अर्थच बदलला. प्रियकर- प्रेयसीसाठी असलेली अशी काही गाणी बरोबर गुरू- शिष्य नात्यासाठी लागू पडली. जणू गुरू शिष्याला अनेक जन्मांपासून साद घालत आहेत-

जाईए आप कहाँ जाएंगे
ये नज़र लौट के आएगी
दूर तक आपके पीछे पीछे
मेरी आवाज चली जाएगी

किंवा हेसुद्धा

तेरा मुझसे है पहले का नाता कोई
युंही नही दिल लुभाता कोई
जाने तू या जाने ना माने तू या माने ना

ओशोंचे विचार सांगणं अतिशय अवघड आहे. कारण ते फक्त विचार नाहीत; त्यामध्ये 'निर्विचारता' सुद्धा आहे. त्यांची एक आठवण सांगावीशी वाटते. ते सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रवचनाची सुरुवात "मेरे प्रिय आत्मन्" ने करत आणि प्रवचन संपताना म्हणत "आपके भीतर बैठे परमात्मा को प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम स्वीकार करें.” लोकांनी स्वत:मधली भगवत्ता ओळखावी असं त्यांना अपेक्षित होतं. आणि १९७३ नंतर त्यांनी स्वत:ला भगवान असं म्हणण्यास सुरुवात केली होती. त्याचाही हेतु हाच होता की, सगळे जणच भगवानस्वरूप आहेत, फक्त ते मान्य करण्यासाठी हिंमत हवी. मी स्वत:ला भगवान म्हणतो आणि तुम्हांलाही स्वत:मधला ईश्वर बघण्यासाठी प्रेरित करतो, असं ते म्हणतात. त्यावेळी त्यांना शेकडो पत्र आली की तुम्ही कसले स्वयंघोषित भगवान, स्वत:ला भगवान कसे काय म्हणता इ. इ. त्यावर ओशोंनी म्हंटलं, 'जेव्हा मी तुम्हांला प्रणाम करायचो, तुमच्यातल्या ईश्वराचा उल्लेख करायचो, तेव्हा मला एकानेही 'का' असं विचारलं नाही. कारण ते तुमच्या अहंकाराला अनुकूल होतं. पण जेव्हा मी स्वत:चा उल्लेख भगवान असा केला, तेव्हाच मग मला तुम्ही का विचारलं? तेव्हा एकानेही प्रश्न केला नाही आणि आता इतके जण विचारत आहेत.' त्यांनी नंतर म्हंटलं आहे की, भगवान नसण्याचा पर्यायच नाहीय. जे काही आहे, ते सर्व भगवानस्वरूपच आहे. फक्त ते उघड्या डोळ्यांनी बघणं किंवा न बघणं, इतकाच फरक आहे.

ओशोंना ऐकताना इतकं काही मिळत गेलं की अक्षरश: जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. जीवनामध्ये आपल्याला न आवडणारे; नकोसे असे असंख्य पैलू असतात. ते स्वीकारण्याची दृष्टी हळु हळु आली. जीवनातले ताण- तणाव झपाट्याने हद्दपार होत आहेत. . .

ओशोंच्या प्रवचनामध्ये काही शिष्यांनी प्रश्न विचारताना अशी गाणीच विचारली आहेत-

कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं
कुछ दिल ने सुना, कुछ भी नहीं
ऐसी भी बातें होती हैं

त्यावर ओशो म्हणतात की खरा संवाद असाच मौनातून होत असतो. शब्द तर फक्त माध्यम असतात.

एकाने प्रश्न म्हणून हे गाणंच विचारलं-

कोरा कागज़ था मन मेरा
लिख दिया नाम इसपे तेरा. . .
सुना आँगन था जीवन मेरा. . .
बस गया प्यार जिसपे तेरा. . .

आणि

तुम अबसे पहले सितारों में बस रहे थे कहीं
तुम्हे बुलाया गया है जमीं पर मेरे लिए. . .

त्यावर ओशो म्हणतात की, मी तुमच्यासारखाच आहे. पण माझ्यामध्ये असं काही आहे जे ता-यांमधलं आहे आणि ते तुमच्यामध्येसुद्धा येऊ शकतं.

ओशोंनी जी मांडणी केलेली आहे, ती अतिशय जोरदार आहे; युनिक आहे. फक्त वेगवेगळे धर्मपंथ आणि साधना मार्गच नाही; तर त्यांनी प्रचलित समाज; प्रोजेक्टेड ट्रूथ; देश-काळ ह्याविषयी जे काही भाष्य केलं आहे; ते अ ति श य अ फा ट आहे. . . ते इथे सांगण्यापेक्षा इच्छुकांनी मुळातूनच वाचावं (त्यावर थोडी अजून माहिती देणारा माझा ब्लॉग).

ओशोंनी एका ठिकाणी म्हंटलं आहे की, मला तुम्ही गुरूही मानू नका आणि मित्रही मानू नका. तुम्ही रस्त्यावर जाताना तुम्हांला भेटणारा एक अनोळखी वाटाड्या समजा. मित्र जरी मानलं तरी माझ्याप्रती आसक्त व्हाल. मला एक अनोळखी वाटाड्या मानून माझ्यामध्ये अडकून न पडता तुम्ही मी दाखवतोय त्या मार्गाने फक्त जा. . .

सांगण्यासारखं खूप काही आहे. तो भाव व्यक्त करणारी ही काही गाणी. गुरू- शिष्य; अध्यात्माचा सार ह्याचा अर्थ व्यक्त करणारी ही काही गाणी. अशा काही गाण्यांमध्ये आणि विशेषत: ६०- ७० च्या दशकातील काही गाण्यांमध्ये त्या काळात प्रवचन देणा-या ओशोंची उपस्थिती स्पष्ट स्पष्ट जाणवते . . .

यहीं वो जगह है. . . यही वो फिज़ाएँ हैं. . .
यहीं पर कभी आप हमसे मिले थे. . .
इन्हे हम भला किस तरह भूल जाएं . .
यहीं पर कभी आप हमसे मिले थे. . .

खामोश है ज़माना, चुपचाप हैं सितारें
आराम से है दुनिया, बेक़ल हैं दिल के मारे
ऐसे में कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे की चल रहा हो, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, एक आस के सहारे. . .
आएगा, आएगा, आएगा. . आएगा आनेवाला

तुम पुकार लो. . .
तुम्हांरा इन्तज़ार है. . .

अगदी ह्या गाण्यांमधूनही असाच अर्थ जाणवतो; अनुभवाला येतो.

अजनबी मुझको इतना बता दे
दिल मेरा क्यों परेशान है
देख के तुझको ऐसा लगे
जैसे बरसों की पहचान है . . .

मन अपने को कुछ ऐसे हल्का पाए
जैसे कन्धों पे रखा बोझ हट जाए
जैसे भोला सा बचपन फिरसे आये
जैसे बरसों में कोई गंगा नहाए. . .

धुल सा गया है ये मन
खुलसा गया हर बंधन
जीवन अब लगता है पावन मुझको. . .

जीवन में प्रीत है, होठों पे गीत है
बस ये ही जीत है सुन ले राही

तू जिस दिशा भी जा, तू प्यार ही लूटा
तू दीप ही जला, सुन ले राही. . .

यूं ही चला चल राही यूं ही चला चल
कौन ये मुझको पुकारे
नदियां पहाड़ झील और झरने, जंगल और वादी
इनमें है किसके इशारे . . .

. . .ज्यांना अधिक खोलात जायचं असेल, त्यांना ओशोंना समजून घेण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांच्या प्रवचनांमधून सांगितल्या गेलेल्या आठवणींचं संकलन करून बनवलेलं त्यांचं चरित्र. हे १३०५ पानांच पीडीएफ पुस्तक इथे उपलब्ध आहे. ज्यांना रस असेल त्यांनी ते डाउनलोड करून सुरुवातीचे किमान १०० पानं वाचावेत ही विनंती. ओशोंविषयी खूप लोकांनी काही म्हंटलेलं आहे. पण माझा अनुभव आहे की, ओशोंविषयी इतर काय म्हणत आहेत हे बाजूला ठेवून ओशो स्वत: काय म्हणत आहेत, हे ऐकायला सुरुवात केली की हळु हळु शंका उरतच नाहीत. . . तेव्हा ज्यांना काही आक्षेप असतील किंवा ज्यांना प्रश्न असतील; त्यांनी किमान ह्या पुस्तकाचे पहिले १०० पानं वाचून मग आपलं मत द्यावं ही विनंती. फक्त २ तासांचं काम आहे. त्यातही पहिले १५ पानं अनुक्रमणिका आहे; म्हणजे फक्त ८५ पानं. पीडीएफ डाउनलोड करून मोबाईलमध्ये वाचता येईल आरामात. धन्यवाद! Happy

शेवट एका गाण्यानेच करू इच्छितो-

उसके सिवा कोई याद नही. . . उसके सिवा कोई बात नही. . .
उन ज़ुल्फों की छाँव में. . . . उन कातिल अदाओं में,
इन गहरी निगाहों में. .
हुआ हुआ मै मस्त. . .

वो दौड़े है रग रग में, वो दौड़े है नस नस में
अब कुछ न रहा मेरे बस में हुआ हुआ मै मस्त. . .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख!..अशा प्रवाहात शिरलं की होणारं स्थित्यंतर अगदी अचूक शब्दात मांडलय.बॉलीवूड चं कुठल्ही गाणं या नात्याला सुट होतंच . पूर्वीचे संत महात्मे स्वरचित अभंग गाय चे आणि आपल्या क डे तेवढी प्र ति भा न स -
ल्याने आपण हिंदी गाणी म्हणतो .भाव तोच .