चलो बुलावा आया है ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2016 - 11:29

परवा की तेरवाची गोष्ट. कामानिमित्त मुंबई उपनगरात फिरणे होत होते. सिग्नल सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, ईकडून तिकडून, रस्ता ओलांडून भटकंती चालू होती. डोक्यात बॅकग्राऊंडला कुठेतरी "जाने जा, ढूंढता फिर रहा" चालू होते. अश्यातच समोरून मध्यमवयीन म्हणजे साधारण पस्तीशीच्या बायकांचा एक जमाव अंगावर चालून येताना दिसला. हो चालूनच. जणू एखाद्या युद्धाला निघाल्या आहेत अश्या आवेशात चालत होत्या. दचकून त्यांच्या मार्गातून बाजूला होण्यास धडपडावे तर त्यांची चालण्याची दिशा माझ्या दिशेच्या पाचदहा अंशाच्या कोनात दिसली. उगाचच हायसे वाटले. पण तेवढ्यापुरतेच. माझ्यावर नजर जाताच, ‘भेटला बघा गिर्हाईक’ म्हणत सरावानेच त्यांच्यातील दोन बायका माझ्या दिशेने वळल्या. "दादा देवीचा महाप्रसाद आहे. तुमच्या हाताने दक्षिणा द्या. तुमच्या नावाने चार लोकांना जेवायला घाला" ... अरे देवा, शंभर रुपये राईसप्लेट पकडली तर चार जणांचे चारशे रुपये. एवढे द्यायचे. असा विचार करत मी पाकिटाला हात घातला तसे "जरा चांगले द्या" .. समोरून आवाज आला. आता चांगले म्हणजे नेमके किती? समोरचे तबक न्याहाळले. दहा वीसच्या नोटा पडल्या होत्या. शंभर तर सोडा पन्नासचे बापूही दिसले नाहीत. तेव्हा जरा हायसे वाटले. दहा रुपये चालून जावेत. तेवढेच टेकवले. पण समोरून ना आशिर्वाद आले, ना नाराजी झाली. ना त्या दहा रुपयांना कमी लेखले गेले, ना पुरेसे दिल्याचे समाधान व्यक्त झाले. पैसे टेकवताच स्वारी पसार. मी असे पटकन घाबरत पैसे देऊन चूक तर नाही ना केली असे वाटेपर्यंत त्यांना पुढचा ‘भाऊ’ भेटलाही होता. पण त्या भाऊंनी मात्र भिकार्‍यांकडे तुच्छ कटाक्ष टाकतात तसे त्या बायकांना झिडकारले. मला उगाचच वाईट वाटले. सर्व चांगल्या घरातील बायका दिसत होत्या. नव्हे अगदी साडीसह नटून थटून दागदागिने मिरवत फिरत होत्या. त्यांना न्याहाळताना सहजच त्यांच्या पायावर नजर गेली आणि लक्षात आले. एकीच्याही पायात पादत्राण नावाचा प्रकार नव्हता. अर्थात, यामागचे कारण समजायला फारसा वेळ नाही लागला ... देवीची दक्षिणा हा क्यू होताच सोबतीला.

आजचीच गोष्ट. ऑफिसातून परतत होतो. नेहमीचीच पायवाट, रमत गमत चाललो होतो. पाठीमागून दोन बायकांच्या बोलण्याचा मंजुळ आवाज. हळूहळू जवळ येत होता. साहजिकच त्यांच्या चालण्याचा वेग माझ्या वेगाच्या जास्त असावा. मागून एखादी गाडी येतेय का बघायला म्हणून वळलोय असे भासवून सहजच मागे वळत, त्या दिसायल्या काय कश्या आहेत हे एकदा न्याहाळून घेतले. तर बायका कसल्या मुलीच होत्या. नक्कीच पावले तिथेच रेंगाळावीत अश्या होत्या. बघता बघता माझ्या जोडीलाही येऊन पोहोचल्या. मग मी देखील माझा चालण्याचा वेग किंचित वाढवला आणि त्यांच्या वेगाशी जुळवून घेतला. जेणेकरून काही काळ तरी त्यांच्यासोबत चालले जाईल. हे असे दरवेळी सहजगत्या घडते. असेच सोबत चालता चालता आयुष्याचा जोडीदार मिळून जाईल अशी वेडी आशा, बाकी काही नाही. त्यांचे बोलणे कान देऊन ऐकायचा प्रयत्न करू लागलो. चालताना आणखी काय टाईमपास. पण नुसता मंजुळ किलबिलाट. फक्त मराठी आहेत ईतकेच समजले. पण पन्नास टक्यांपेक्षा जास्त संभाषण ईंग्रजीत करणार्‍या आहेत हे देखील समजले. मला त्यांच्या चालण्याच्या वेगाशी फार काळ जुळवता आले नाही. हळूहळू त्या पुढे जाऊ लागल्या. जीन्स टॉप मॉडर्न पेहराव, एकीच्या दंडावर टॅटू वगैरे, पण पुन्हा नजर खिळली ती पायांवरच. चारही पाय सॅण्डललेस!..

कालच्या त्या पस्तीशीच्या पारंपारीक पोशाखातील महिला, आणि आजच्या या वीस-बावीशीच्या आधुनिक ललना. दोघांनाही श्रद्धेने एकाच पातळीवर आणले होते. यात काही चूक नाही किंवा काही बरोबर नाही. जरा गंमत वाटली ईतकेच.

यानिमित्ताने गेले काही दिवस ऑफिसमध्ये सुरू असलेल्या चर्चेलाही धाग्यात ओढतो. एकदोघे जण असेच नंगे पाव रोज हजेरी लावत आहेत आणि पावसाळ्यातही फॉर्मल फूटवेअर घातलेच पाहिजेत अशी सक्ती करणारे आमचे एच आर डिपार्टमेंट हे कसे चालवून घेते अशी कुजबूज ऑफिसात सुरू आहे.

पण एकेकाळी माझेही असे करून झालेय. म्हणजे अगदी नऊ दिवस अनवाणी फिरणे नाही, पण दसर्‍याच्या पहाटे चार वाजता आंघोळ करत, बिना चपलेचे पायीपायी, चलो बुलावा आया है म्हणत, पहाटेच्या अंधारात तब्बल दोन अडीच तास पायपीट करत, महालक्ष्मीच्या देवळात जाऊन दर्शन घेणे, हे करून झालेय. पण त्यानंतर एकदा सिद्धिविनायकाच्या मंदिरी असेच एका अंगारकी संकष्टीला छोट्याश्या चेंगराचेंगरीत आयुष्यभरासाठी पाय गमवावे लागताहेत की काय असे झालेले तेव्हा त्याच देवासमोर कानाला हात लावत म्हटले की बाबा रे आता पुन्हा कधी अंगारकीलाच काय मंगळवारीही तुझ्या दारी येणार नाही. दिलेला शब्द पुढे जाऊन पाळलाही. पण कालांतराने मीच नास्तिक झालो आणि मग संपले सारेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसांपुर्वी फेसबुकवर असे फोटोज फिरत होते , ह्यावेळेस ते नऊ दिवसांचे नऊ कलर नाहीये का रे ?

असेच सोबत चालता चालता आयुष्याचा जोडीदार मिळून जाईल अशी वेडी आशा, बाकी काही नाही. >>> ऋन्म्या लेका कधी सुधरशील , ग्फ्रे आहे ना रे तरीपण हात मारत फिरतोच का ? Proud

असेच सोबत चालता चालता आयुष्याचा जोडीदार मिळून जाईल अशी वेडी आशा, बाकी काही नाही. >> गफ्रेचे काय झाले बे ?

श्री, मन आणि पैसे, कधीच एका जागी गुंतवू नये.

आणि नवाचे नऊ कलरही आहेत की. काल योगायोगाने ब्ल्यू डे ला माझा ब्लूच झाला. अर्थात फार मोठा योगायोग नव्हता. धुतलेल्या ४ शर्टांपैकी ३ ब्ल्यूच असतात माझे. आज मात्र मुद्दाम येल्लोला येल्लो घालून गेलो. कारण ऑफिसातील मुली फोटो काढतात सोबत हे कालच्या ब्ल्यूला समजले Happy

असामी, गफ्रे आहेच. आणि राहणारच. वेगळे होण्याचा विचारही नाही मनात.
पण ही वेडी आशा वयात आल्यापासून असायची. त्यामुळे आता फक्त पावले मंदावायची सवय झालीय ईतकेच.

हा असले प्रकार फिरत असतो पाहुन ग्फ्रेने डिच केलं असेल , काय रे ऋन्म्या बरोबरे ना ? Lol

अरे पण आशा वयात येण्याचा आणि तुझी पावलं मंदावण्याचा काय संबंध ? Proud

अरे काये हे विषय काय बोलताय काय. चांगला चेहरा दिसला की तो जास्त वेळ दिसावा म्हणून पावले मंदावतात ईतकेच. आणि हे सवयीने होते ईतकेच.
पण त्या मुली अनवाणी पायानेही माझ्यापेक्षा झपाझप चालत होत्या हे कोणी ऑब्जर्व्ह केले का ईथे?

Happy

मला वाटले 'हीच राघवा हीच पैंजणे' प्रमाणे ऋ ला सर्व स्त्रियांचे पाय आधी दिसतात की काय Happy

फ ! Happy

तु कशावरही काहीही लिहिशिल.

असेच सोबत चालता चालता आयुष्याचा जोडीदार मिळून जाईल अशी वेडी आशा, बाकी काही नाही.>>> आताचीए पण अशीच भेटली होती का रे?

एका अंगारकी संकष्टीला छोट्याश्या चेंगराचेंगरीत आयुष्यभरासाठी पाय गमवावे लागताहेत की काय असे झालेले तेव्हा त्याच देवासमोर कानाला हात लावत म्हटले की बाबा रे आता पुन्हा कधी अंगारकीलाच काय मंगळवारीही तुझ्या दारी येणार नाही. >>>>>>>>>>>>> छान केलेस. मी पण दोन वर्षांपुर्वी लाल्बागच्या राजाला गेले होते. दरवर्षीच जायचे. पण त्या वर्षी जरा जास्तच चेंगराचेंगरी, कार्यकर्यांची अरेरावी वैगेरे जरा जास्तच दिसली. माझ्यादेखत एका बाइला एका कार्यकर्त्याने 'ए चल' असं एतक्या वाइट टोन मधे म्हटलं की माझंच डोकं सटकलं. बस बाप्पाला म्हटलं की आता कुठल्याच वर्षी इथे येणार नाही.

अनवाणी चालण्यावर पगारेंनी धागा काढला होता ना? मग पुन्हा त्या विषयावर नवीन धागा कशाला? विषय इतकाही महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा ऋन्मेष तुम्ही फसवणूक करणार्‍या कॉलसेंटरच्या बातमीवर धागा काढा.

बाप्पाला म्हटलं की आता कुठल्याच वर्षी इथे येणार नाही.----असं न घाबरता त्या कार्यकर्त्याला म्हणायला पाहिजे, कदाचित काहीतरी सकारात्मक बदल झाला असता, गैरवर्तनाबद्दल काहीतरी केल्याचे समाधान मिळाले असते. बाप्पा काय तुम्हाला या किंवा नको येऊ म्हणाला नव्हता.

बाप्पा काय तुम्हाला या किंवा नको येऊ म्हणाला नव्हता.>>>>> मी कुठे म्हणलंय बाप्पा म्हणाला? मीच त्याला म्हणाले मी येणार नाही म्हणुन.

असं न घाबरता त्या कार्यकर्त्याला म्हणायला पाहिजे, कदाचित काहीतरी सकारात्मक बदल झाला असता, गैरवर्तनाबद्दल काहीतरी केल्याचे समाधान मिळाले असते. >>>>> राजसीताई, सगळेच तुमच्यासारखे धीट नसतात.

मलाही फारेंडसारखंच वाटलं... लक्ष्मणाला जशी सीतेची पावलं आधी दिसायची आणि म्हणून फक्त तिचे पैंजणच आधी ओळखू आले तशी.... Wink

सस्मित, आमचे कसे जुळले हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. आजपर्यंत तो काढला नाही कारण प्रेमाला त्याची मंजिल मिळायच्या आधीच जर त्यावर गीत रामायण आणि कौतुकाचे पोवाडे लिहिले तर ते असफल होते असे म्हणतात. पोवाडे नाही तर प्रेम.

राजसी, योग्य मुद्दा आहे. कार्यकर्त्यांना सुनावणे गरजेचे. पण सगळ्यांना तोंडावर जमत नाही हे ही खरे. अश्यावेळी सोशल साईट झिंदाबाद. किंबहुना बरेचदा जास्त परीणामकारक ठरते.

श्री, राम हर जन्म मे राम ही होते है. .(ओळखा कुठल्या पिक्चरचा डायलॉग).. तसे लक्ष्मण भी हर जन्म मे लक्ष्मण ही होते है.

सस्मित, आमचे कसे जुळले हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. >>> आता काय हा बाबा आत्मचरित्र लिहीणार का काय? thinking about.gif

आता लगेच नाही लिहिणार. त्याच्या प्रेमाला मंजिल मिळाल्यावर लिहेल.

आणि मंजिल मिळाल्यावर गाणं गाईल ' मंजिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते'