मसाला पाव

Submitted by कामीनी on 30 September, 2016 - 08:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भोपळी मिरची बारीक चिरलेली - १ वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
पाव भाजी मसाला - १टि. चमचा
हळद - १/२ टि. चमचा
लाल तिखट -१/२ टि.चमचा
लसुण पेस्ट -१ टि. चमचा
पावभाजीचे पाव - ४
अमूल बटर, चीज
मीठ - चविनुसार
कोथीबीर बारीक चिरलेली

क्रमवार पाककृती: 

१. २ मोठे चमचे अमुल बटर कढई मधे गरम करुन त्यामधे चिरलेला कांदा टाकुन परतुन घ्या.
२. नंतर त्यामधे लसुण पेस्ट टाकुन परतुन घ्या.
३. बारीक चिरलेली भोपळी मिरची टाकुन परतुन घ्यावी.
४. बारीक चिरलेला टोमॅटो टाकुन परतुन घ्या. टोमॅटो साँफ्ट होईपरयन्त परतावे.
५.सर्व मसाले (लाल तिखट, हळद, पाव भाजी मसाला) टाकुन ऑइल सुटे पर्यन्त परतावे.
६. त्यामधे पावाचे तुकडे टाकुन मिक्स करावे.
७. चविनुसार मिठ टाकावे.
८. वरतुन बारीक चिरलेली कोथीबीर आणि चीज घालुन सजवावे.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे .. आणि पावभाजीचा पूर्ण कुटाणा करण्यापेक्षा लवकर होईल. Wink

आम्ही फक्त हा मसाला पावात भरून ते परत बटर वर गरम करतो.

न्यू मरीन लाइन्स येथे बॉम्बे हॉस्पिटल जवळ "बस पावभाजी" वाला आहे. तेथे मसाला पाव अप्रतिम मिळतो. हे वाचून त्याची आठवण आली.

मस्त!
मसाला पाव माझ्याही फारच आवडीचा. किंबहुना पावभाजीपेक्षा जास्तच. फक्त तो तसा हवा. कुठे कुठे मसालापावच्या नावावर जे देतात ते वैतागवाणे असते. पण हा फोटो छान दिसत आहे. बाकी रेसिपी मला कळत नाही..

न्यू मरीन लाइन्स येथे बॉम्बे हॉस्पिटल जवळ "बस पावभाजी" वाला आहे. तेथे मसाला पाव अप्रतिम मिळतो.
>>>>
नोंद करून ठेवतो! कधी त्या भागात जाणे झालेच तर ..

बस्स श्री बस्स.. हेच ऐकायचे होते ईथे एकाच्या तरी तोंडून .. Proud

भगवती कांदिवलीमध्ये कुठे? स्टेशनच्या जवळ आहे का? असल्यास तिथून जाणे झाल्यास खाण्यासाठी मुद्दाम ट्रेनमधून उतरू शकतो. एकेकाळी जाणे व्हायचे कांदिवली-बोरीवलीला अधूनमधून कामानिमित्त. कांदिवलीच्या की बोरीवलीच्या दक्षिण नावाच्या एका हॉटेलात नॉनवेज खायला जायचो तेव्हा..

कामीनी, धन्यवाद.
पंगत नाव ऐकून आहे असे वाटतेय. तरी लक्षात ठेवेन. नॉनवेजसाठी तर वेळात वेळ काढून वाट वाकडी करत आडमार्गालाही जायची तयारी Happy

यम्मि. हा प्रकार पहील्यांदाच बघतेय.

पावात पावभाजी भरुन बटरवर भाजलेला पाव, तसा मसाला पाव माहीतेय, श्रीरामपुरला अप्रतिम मिळायचा एका छोट्या हॉटेलात. नाव विसरले.

पावात पावभाजीचा मसाला भरुन >>>> यावरून एक बालपणीची आठवण जागी झाली. आम्ही आझाद मैदानला क्रिकेट खेळायला जायचो. भूक सडकून नाही तरी बरेपैकी लागायची. घरून डबा मिळायचा नाही. अख्खी पावभाजी खाणे परवडायची नाही. तेव्हा तिथे एका गाडीवर पावभाजीची भाजी पावात भरून मिळायची. भरून कसली, चमचाभर पसरवल्यासारखे करून मिळायची. पण पाव तव्यावर रगडलेला असल्याने ते मस्त लागायचे, मजा यायची..

मसाला पाव पॅटिस असा एक प्रकार आहे. तो पण अप्रतीम लागतो. पाव भाजी चा मसाला पावामधे भरुन त्यामधे बटाटा टिक्की आणि लसुण चटणी टाकुन मस्त बटर मधे गरम करायचे़. खुप टेस्टी लागतं..

Pages