सूक्ष्म जग आणि Quantum Physics : 2

Submitted by समीर देसाई on 26 September, 2016 - 17:10

. . . . . जड पदार्थांना वस्तुमान असतं तर अजड गोष्टी ह्या चैतन्यस्वरूपात असतात, त्यांना वस्तुमान नसतं. जड देह आणि अजड आत्मा हे गणितीय परिभाषेत अपसंख्येने म्हणजेच complex number notation ने दाखवता येतात. अपसंख्येचे दोन भाग असतात :
१. स्थूलांक (real part) आणि
२. सूक्ष्मांक (imaginary part)
स्थूलांक म्हणजे सामान्यतः वापरात असणा-या परिमेय, अपरिमेय संख्या २, ५.८, -७, ३.१४२ इत्यादी. सामान्य संख्येला ऋण एक (-१) च्या वर्गमूळाने गुणलं की सूक्ष्मांक मिळतो. उदा. ५ x √-१ , -४ x √-१ इत्यादी. ऋण एकचं वर्गमूळ हे j ह्या इंग्रजी अक्षराने दाखवतात. त्यामुळे -५ x √-१ हा सूक्ष्मांक हा -j५ असा थोडक्यात लिहिता येतो. म्हणजेच संपूर्ण अपसंख्या ही आता (३.१ + j५.२ किंवा ४ - j७) अशा सुटसुटीत पद्धतीने दाखवता येते. आलेख कागदावर आडव्या अक्षावर ( sigma किंवा सगुण अक्षावर) अपसंख्येचा स्थूलांक भाग आणि उभ्या अक्षावर (j किंवा निर्गुण अक्षावर) सूक्ष्मांक भाग दाखवता येतो. ह्या संपूर्ण आलेख कागदाला अस्तित्व-अवकाश म्हणता येतं कारण देह आणि आत्म्याच्या तौलनिक बल-अबलानुसार वेगवेगळ्या व्यक्ती ह्या वेगवेगळ्या बिंदूंनी आलेख प्रतलावर दर्शवता येतात. स्थूलांक आणि सूक्ष्मांक ह्यांच्या प्रमाणानुसार संपूर्ण अस्तित्व-अवकाशाची विभागणी ब्रह्मलोक, पराप्रकृती, स्वर्गलोक, यक्षलोक, मनुष्यलोक, पाताळलोक अशा गटांमधे करता येते. कर्मयोग आणि कर्मसंन्यास, व्यक्त स्थिती आणि अव्यक्त स्थिती अशा गटांमधेसुद्धा विभागणी करता येते.
http://supersamir.blogspot. in

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users