“जेन्ट्स” टॉयलेट

Submitted by बेंडी on 23 September, 2016 - 06:00

प्रास्ताविक
हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे.
अहो अस काय म्हणता मागच्या ब्लॉगच्या घवघवीत यशानंतर ( काय विश्वास नाही बसत घवघवीत यश म्हणून बघा बर मोजुन ६ प्रतिक्रिया भेटल्या त्याला ( ठीक आहे, ठीक आहे २ माझ्या आहेत पण ... लोकांनी टाकल्या म्हणून टाकल्या ना मी , हो एकाने लिहिल आहे कि त्याला काही कळलं नाही म्हणून. काय नेहमीच आपला क्वालिटी क्वालिटी करतात लोकं, क्वांटीटी पण बघायची कधी कधी असो .. ) मजाक नाही येड्या पहिल्याच लेखावर लोकांच प्रेम इतकं “उफाळून” आलं.) बर मुद्यावर येऊया, एकदम असं टॉयलेट वगैरे बर नाही वाटत ना (पण का नाही, दररोज जातोच ना तिकडे मग..)

कथानक
ठिकाण: ग्रेहाउंड बस स्थानक, डाऊन टाऊन डेनवर किंवा मग मार्केट स्ट्रीट स्टेशन
दिनांक: काय नेहमी नेहमी पाहिजेच का? आठवत नाही हो, बर मे २००९ चा कुठलातरी शनिवार किंवा रविवार
वेळ: संध्याकाळचे ४ किंवा ५ असतील . तर झाल काय कि मला जरा हलकं व्हायच होता ब्रूमफिल्ड ला निघायच्या आधी तर “जेन्ट्स” टॉयलेट आणि घुसलो आतमधे आतमधला नजारा युरीनल च्या ठिकाणी पार्टीशन नाही सगळा कस ओपन, कमोड ला पार्टीशन आहे पण दरवाजा नाही. “अन्ग्रेझा खोल के सोते है इस्माईल भाई!!” हा अन्ग्रेझ चित्रपटातला संवाद शत प्रतिशत खरा आहे याची मला जाणीव झाली.
दोन टाळकी युरीनल वर होती आणि एक टाळक कमोड वर ( आता वाचकांचा डोकं रजनीकांत पेक्षा तेज चालतंय आणि ते पूर्ण कल्पनाशक्ती जोराला लाउन काय दिसत आणि काय दिसत नाही याचा विचार करतायत) हं काही दिसत नाही बरका. मी आपला सावध पवित्र घेतला जोपर्यंत ती दोन टाळकी उरकत नाहीत तोपर्यंत थांबायचं मग उगाच ते आपला वॉश बेसिन च्या आरशात बघा असं कार्यक्रम केला. आणि नशिबाने त्या दोघांच लगेच आटोपलं आणि मग मी तिकडे धावा बोलला. कमोड वर बसलेले महाशय अगदी स्वताच्या घरी हॉल मध्ये बसलो आहोत ह्या थाटात बसला होता तो उगाच आपल्या आसपासच्या घडामोडी बघत होता. मी पटापट कार्यक्रम उरकला आणि पुन्हा वॉश बेसिन गाठलं. माझ्या बाजूला एक सेक्युरीटी वाला होता तो बहुटेक फक्त हात धुवायला आला होता. तेवढ्यात टॉयलेट चा दरवाजा उघडला गेला आणि
टिक टाक टिक टाक टिक टाक टिक टाक... अहो चक्कं एक ललना घुसली हो तिकडे हाय हिल्स च्या संन्डल घालून. माझी तर दांडीच गुल झाली हे ओपन थेटर कमी पडला कि काय हि बाई इकडे घुसली. मग मला वाटला साला हे पण इकडे नेहमीचच असेल अहो पण बाजूचा सेक्युरीटी वाला सुधा कोणीतरी तोंडात मारल्यासारखा बघत होता. आणि आतापर्यंत आपल्या घरातल्या हॉल मध्ये बसलेले महाशय अचानक कतरिना यावा आणि त्यांच्या डोक्यावरच छप्पर घेऊन जावा अशी त्यांची अवस्था झाली. त्यांनी लगेच प्रसंगाचं ध्यान राखून आपला काही दिसत नाही ना याची खात्री करून घेतली आणि पुन्हा एकदा आपल्या घरातल्या हॉल मध्ये आले. बाईचा रोख युरीनल कडे होता. माझी अवस्था तर आता कोणीतरी तिकडे पिन काढून ग्रेनेड फेकला आहे अशी झाली होती आता तिकडे बॉम्ब फुटणार आणि पळापळ होणार या अविर्भावात मी बाहेर पडलो, माझ्या मागो माग सेक्युरीटी वाला आला. मला जरा हायसं वाटला चला म्हणजे इकडे काहीतरी अब्नोर्मल घडतं तर.
थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा उघडला आणि ती बाई बाहेर आली आणि जणू काही घडलंच नाही या अविर्भावात निघाली. इथेच, नेमका इथेच खऱ्या नाटकाला सुरुवात झाली.
सेक्युरीटी वाला: (फुल डेरिंग मारत) Excuse me, that is Gent’s toilet.
मी: (आता फुल राडा होणार, बहुतेक तरी स्त्रियांनी जेन्टस टॉयलेट मध्ये मनाई आहे असा तिथे (किंवा मग भारतात) काही कायदा असल्याचा माहित नाही, आणि तिकडे लेडीज नॉट अल्लौड अशीही पाटी लावली नव्हती, मग हा बाब्या तिला काय सांगणार होता ते बघायचा होता)
बाई: Do you think I am a woman? (चेहऱ्यावर पर्मोच्च आनंद)( शाहरुख खानला देखील लाजवेल अशा आवाजात) ( शाहरुख खानची अशा प्रकारे उडवल्या मुळे जनता खुश)
सेक्युरीटी वाला: अं.. अं.. अं... (आणि तो खरच दोन पावल मागे सरकला )
मी: (तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील जयंतीलाल घडा सारख्या भुवया उडवल्या म्हणजे उडाल्या, आणि मी माझी मान दुसरीकडे फिरवली)
सेक्युरीटी वाला: (माझ्यापासून त्याची नजर चोरत त्या बाईच्या नाही नाही त्या पुरुषाच्या नाही नाही बाईच्याच हो सगळ्या व्याख्यांमध्ये बसत होती हो ती, तो. अरे काय ताप आहे आता म्हणायचं काय तिला / त्याला? हं “ती व्यक्ती” बरोबर आहे. उगाच नाही C++ शिकलो बेस क्लास पकडूया व्यक्ती आणि त्याखालचे पुरुष आणि स्त्री. खिशात हात घातले (त्याच्या स्वताच्या) आणि निघाला)
मी: (बस बस फार झाला आपली बस पकडा आणि सटका इकडून)
आम्ही टॉयलेट मधून बाहेर आल्यावर आतमधे काय घडला याची मला काहीच कल्पना नाही. त्या व्यक्तीने नक्की काय केलं? कमोड वरच्या टाळक्यआला काय दिसल किंवा काय दिसल नाही? माहित नाही आणि कल्पना करायची देखील इच्छा नाही 
नंतर केंव्हातरी
मी आणि वेणू बोल्डर ला गेलो होतो. पर्ल स्ट्रीट वरून चालत चालत आम्ही फ्लॅट आयर्न कडे चाललो होतो. बर्फ पडला होता, थंडी होती (म्हणजे लक्षात आला ना तुमच्या वातावरण निर्मिती) पूर्ण रस्ता संपल्यावर एक पार्क लागल पुन्हा आम्हाला हलकं व्हायची इच्छा (अनावर) झाली , तिकडच टॉयलेट शोधल, जेन्टस टॉयलेट कन्फर्म केलं आणि दरवाजा उघडला आणि बघतो तर काय पुन्हा एक ललना वाश बेसिन वर बसली होती म्हणजे पूर्ण प्लाटफॉर्म होता आणि मोकळ्या जागेत ती बसली होती. झाली का पंचाईत. दारातून ती एकटीच दिसत होती जरा डोकावल्यावर नळाच्या दुसऱ्या बाजूला एक बाब्या बसलेला दिसला तो तीथ बसून धूर काढत होता, जरा बर वाटलं म्हणजे जी दिसतेय ती ललनाच असायची शक्यता भरपूर झाली होती आणि महत्वाचा म्हणजे युरीनल तिच्या मागच्या बाजूला होत आणि युरीनल ला पार्टीशन पण होत. फार फार आनंद झाला मला (लोकं म्हणतील यात आनंद वाटण्यासारखा काय आहे? अहो थंडी पडली आहे, तुम्हाला हलकं व्ह्यायचच आहे आणि समोर अशे कार्यक्रम दिसतायत आणि जरा आता काही नाही केलं तर कमीत कमी तासभर तुम्हाला काही करता येनार नाही आणि वरून (थंडीत) चालत जायच ) मी तडक आत घुसलो (त्यांच्याकडे दुर्लक्ष करत) आणि गुपचूप मागे जाऊन कार्यक्रम उरकून आलो आणि पुन्हा दुर्लक्ष करत बाहेर निघालो. आता जरा आत्मविश्वास वाढला होता अस काही असेल तर काही ताण घ्यायचा नाही नॉर्मल आहे सगळं पण ...

परत कधीतरी
तारीख :बास आता तारखा विचारू नका कधी ते पण शकतो संध्याकाळची ७ च्या आसपास ची
स्थळ : ऑफिस

काम करत बसलो होतो नेहेमी प्रमाणे पूर्ण ऑफिस रिकाम होत आणि घरी जायला शेवटची बस ७:२० ची होती. ह्या वेळेस २ मुली येऊन ऑफिस ची साफसफाई करत असत आणि हाल्फ चड्ड्या घालून कानात बोण्ड घालून भटकायच्या आणि ऑफिस मधून निघायच्या आधी एकदा हलका होऊन याव म्हणून परत टॉयलेट मध्ये गेलो दरवाजा उघडला आणि समोर ती बाई आल का आता परत धर्म संकट. दरवाजातच विचार केला आता काय जायला तर लागेलच आणि मागचा अनुभव लक्षात घेता खूप काही ताण नाही असा वाटलं आणि तडक आता घुसलो. जसा मी आत गेलो आणि युरिनल पर्यंत पोहोचतच होतो तेवढ्यात ती पोरगी बाहेर पळाली. म्हटलं आता काय अजून आता हि बया कोणा कोणाला काय काय सांगते काय माहित. पण तिने कोणाला काही सांगितलं नाही आणि मी परत कधी असल धाडस केला नाही म्हणजे गरजच पडली नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users