तर मुलांनो फार फार वर्षांनंतरची गोष्ट आहे.
एका कम्युनिटीत एक माणूस ऑनलाईन असायचा.
त्याला सगळ्यांनी आपल्याला 'भाई' म्हणावंसं वाटायचं!
म्हणजे कसं स्ट्राँग, भारी वाटतं वगैरे!
अगदी भाई असा आय डी पण घेऊन झाला.
पण कुणी त्याला भाई म्हणतच नसे.
उलट अवलोकनात (प्रोफाईल) जाऊन त्याचे खरे नाव पाहून त्या नावाने हाक मारत, संबोधत!
माणूस अगदी फ्रस्टेट होऊन होऊन शेवटी ती कम्युनिटी सोडायच्या विचारात आला. शेवटी शेवटी तर चक्क ऑफलाईन राहू लागला.
शेवटी एका काकूंना त्याची दया आली.
त्या म्हणाल्या ' माणसा माणसा, ऑनलाईन ये'
'कसा मी येऊ'
'एक वसा देते तो घे. उतू नको, मातू नको'
'सांगा काकू'
' उद्यापासून कुणी तुला 'भाई' म्हणाले की आकांडतांडव कर, अॅडमिनकडे तक्रार कर, मला सटल सायबर बुलिंग होतंय म्हण!'
'त्याने काय होईल काकू?'
'अरे, लोक तुला आणआणखी 'भाई' म्हणतील. मग तू आणखी रागाव. शेवटी तुझं नाव 'भाई' पडून जाईल.'
'नक्की ना काकू?'
'नक्की बरं माणसा! माझं नावही असंच पडलंय बरं 'काकू' '
'धन्यवाद काकू!'
त्या रात्री एका फोरमवर काकू माणसाला मुद्दामून 'भाई' म्हणाल्या.
माणूस त्यांच्यावर खोटाखोटा चिडला.
त्यामूळे आणखी चार आय डी त्याला 'भाई' म्हणाले.
माणसाने अॅडमिनकडे तक्रार केली.
माणसाने 'सटल सायबर बुलिंग' वर धागा काढला.
अॅडमिनने भाईकडे दुर्लक्ष केलं. कारण भाई काही वाईट शब्द नाही.
मग भाईने खूप गळे काढले. मला भाई म्हणू नका असे ज्या त्या फोरमवर जाऊन सांगू लागला.
जे फोरम त्याला ओळखतही नव्हते तिथे त्याच्या 'भाई' पणाची चर्चा होऊ लागली.
मग हळुहळू काकूंच्या सल्ल्याने भाईने तक्रारीचा सूर कमी केला.
आता 'भाई' आनंदाने पूर्ण कम्युनीटीचा 'भाई' आहे.
थँक्स टू त्याची कणव आलेल्या काकू!
तर...
अशी ही 'सटल सायबर बुलिंगची' कहाणी. जशी तुम्हाला लाभली तशी इतरांना लाभू द्या.
तुम्हाला तुमच्या आवडीचे संबोधन तुमच्या तुमच्या कम्युनिटीत मिळू द्या.
उतू नका, मातू नका. सायबरबुलिंगला घाबरू नका.
साठा फोरमची कहाणी पाचा फोरमांत सुफळ संपूर्ण!
(No subject)
एस आर डी -
एस आर डी -
छान
छान
आयडिया भारी आहे.
आयडिया भारी आहे.
खूपच छान लिहिलं आहे , जर
खूपच छान लिहिलं आहे , जर तुम्हाला मराठी typing करताना काही अडचण येत असेल तर कृपया online marathi typing या website ला एकदा नक्की भेट द्या
तुम्हाला मराठी typing करताना
तुम्हाला मराठी typing करताना काही अडचण येत असेल तर कृपया online marathi typing या website ला एकदा नक्की भेट द्या >> आगाऊपणा बद्दल क्षमस्व

(No subject)
(No subject)
बॉट असेल तो.
बॉट असेल तो.
Pages