संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by भारती बिर्जे.. on 15 September, 2016 - 10:28

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

साहेब

सह्या करा रे मस्टरवरती
मोठ्या साहेबाची फिरती
येते आहे तासभराने
उचला पेने ! भरा रकाने !

गुलाबबाई तुम्ही पुढे या
काय राहिले पेंडिंग सांगा
ट्रायल बॅलन्स आहे बाकी ?
कुठे लपू मी ? टेबलखाली ?

एटीएमच्या कॅशचे पुढे
गेले का ते अडेल गाडे
टार्गेट्सचे मासिक तक्ते
मीच बनवतो , पुरे करा ते !

चहा समोसे घेऊन खाती
चला आवरा , वेळ न हाती
आरामाचे चित्र अहाहा
बदल्या होऊन बदलेल पहा !

गुलाबबाई

ट्रायल बॅलन्स बाकी राहे
याचे कारण चंपा आहे
एक नंबरी आहे चमचा
धाक जराही नाही तुमचा

एटीएमची कॅश सोडूनी
रजेवरी ती जाते निघुनी
गाते नेहमीच रडगाणे
मुले आजारी ! आले पाहुणे !

टार्गेट्स चे मासिक तक्ते
मला शिकवले कामापुरते
लबाड आहे दिल्लीवाला
कराच फायर आहूजाला

नीट कुणाला सांगत नाही
कामामधली मेख कधीही
राखीव कुरणातच तो बसतो
कामे बाहेरील चुकवतो !

साहेब
देतो मेमो आहूजाला
आणि तंबी त्या चंपाला
आवराच हे काम तुम्ही पण
करेन तुमची रजा मी सँक्शन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्या ! एकच प्रतिसाद आणि मतं नगण्य? आमची लास्ट वेंन्ट्री होती ना !
प्रसारयंत्रणा अगदीच कमी पडलीय Happy
चला थोडी मतांची भीक मागू आणि प्रॉपर आश्वासनं देऊ या , बघू या मायबाप मतदार फिरकतात का शेवटच्या दिवसात तरी!

मागू मतांचा जोगवा
लाज थोडीशी राखवा
देऊ आश्वासने चार
येतील का मतदार

एक - लावू नित्याने हजेरी
दोन-देऊ प्रतिसाद भारी
तीन- हाणामारीही जमवू
चार- मत वसूल करवू