मायबोली मास्टरशेफ-रुपाली अकोले-बिस्कीट चे मोदक>

Submitted by Rupali Akole on 14 September, 2016 - 08:30

गणपति बाप्पा मोरया
गणरायाला नेवैद्या ची ही एक नवीन रेसिपी.ही रेसिपी घरच्या बालगोपलांना पण भरपुर आवडेल अशी आहे.
नॉउ हिरो ऑफ दी कॉन्टेस्ट
-बिस्कीट,बादाम.
-मनुका,मकाने.
-लोणी

लागणारा वेळ:३०मिनट
साहित्य:
IMG-20160914-WA00001.jpg
पारी साठी चे साहित्य:
१.पतांजली चे इलायची डिलाइट २ पेकेट व चॉकलेट डिलाइट चे २ पेकेट
साधारण प्रत्येकी १५ - १५
२. बादाम व काजु १वाटी
३.कंडेंस्ड मिल्क २चमचे
४.लोणी किंवा बटर किंवा तुप २ टेबल स्पुन
५.दुध गरजेनुसार

फिलिंग चे साहित्य:

१. खोबरा किस १/२वाटी
२. काळे मनुके ५०ग्रम
३.जिरे पावडर अर्धा टी स्पुन
४. मकाने साधारण २५ ग्रम
५.मीठ चवी नुसार
६.लोणी १टेबल स्पुन

कृती:

प्रथम इलायची डिलाइटचे बिस्कीट घेऊन त्याची मिक्सर वर फिरवुन पावडर बनवुन घ्या.नंतर चॉकलेट डिलाइट बिस्कीट ची पण पावडर तयार करणे बिस्कीट चे क्रीम काढणे किंवा नाही ते ऐच्छिक आहे.मी क्रीम काढले नाही.
वेलची डिलाइट एक बॉउल मधे घेऊन त्यात बादाम व काजु ची पावडर ,कंडेंस्ड मिल्क ,१ च. लोणी टाका गरजेनुसार दुध घेऊन गोळा तयार करा गोळा चपाती च्या गोळ्या रेसिपी थोडा घट्ट असायला पाहिजे.शेवटी लोणी लावा.ही झाली लाइट यलो कलर ची पारी तयार.

आता चॉकलेट डिलाइट पावडर दुसरे बॉउल मधे घेऊन त्यात पण बादाम व काजु पावडर टाका ,लोणी १ चमचा व १चमचा कंडेस्ड मिल्क टाका.गरजेनुसार दुध घेऊन गोळा बनवा.ही चॉकलेटी पारी तयार.

IMG-20160914-WA0001_1.jpg

फिलिंग साठी:
प्रथम थोडे से लोणी कडईत घेऊन गरम झाल्यावर मकाने कुरकुरीत होतील तो प्रयंत परतुन घ्या.ठंड झाल्यावरझाल्यावर मिक्सर वर पावडर करुन घ्या.मनुके डी सिड करुन बारिक चिरुन घ्या. कडईत लोणी टाका गरम करा तयात मनुके परतवा व फ्लेम बंद करुन त्यात भाजलेले खोबर किस,मकाने पावडर ,जिरे पुड व मीठ टाकुन मिक्स करा. एकजीव कराय साठी परत सगळे मिश्रण मिक्सर वर फिरवा.एका बॉऊल मधे काढुन घ्या.

Screenshot_2016-09-14-09-53-22_1.jpg

मोदक बनवाय ची रेसिपी.
मोदक चा साचा घेऊन त्यात कोणती ही पारी चा गोटी एवढा गोळा घेऊन साच्यात घाला ते सगळी कडे मध्य भागी होल करत पसरवा कमी पडले तर अजुन पारी घ्या.पण होल फिलिंग ची चव येईल एवढा करा पारी पण सगळी कडे मस्त पसरवा..

होल मधे फिलिंग भरा व होल पारी ने बंद करा. मोदक बनवायच्या
आधी साच्या ला लोणी किंवा बटर लाव्यचे विसरु नका .
अशा प्रकारे यलो व चॉकलेटी मोदक तयार करा.
आता आपण विदाऑउट फिलिंग चे दोन रंगा चे मोदक बनवु या त्या साठी हाफ साच्यात यलो व हाफ मधे चॉकलेटी पारी भरा. मोदक तयार.

सगळे मोदक १० मिनट फ्रिज मधे सेट होवायला ठेवा.व डेकोरेट करुन गणरायाला नेवैद्य दाखवा. असे हे बच्चे कंपनी व सगळ्यांना
आवडणारे मोदक तयार.
Screenshot_2016-09-14-09-51-48_1.jpg
अधिक टीपा
१.बिस्कीट मॉरी किंवा दुसरे फ्लेवर चे पण चालेल.फक्त कंडेंस्ड मिल्क चे प्रमाण कमीजास्त करा.
२.फिलींग मधे वाटल्यास गुड किंवा साखर टाकु शकता.

चला,चला घाला नेवैद्य गणराया ला आणि खुश करा बाल गोपाला ला .
वर दिलेल्या साहित्य प्रमाणे मोदक २० ते २२ होतील .जर माझा साचा जसा साचा असेल तर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages