’संगीतक हे नवे’ - रिक्शावाला आणि मी!

Submitted by कविन on 12 September, 2016 - 03:47

(ओ डिजेवाले बाबु मेरा गाना चला दो गाना चला दो गाणं वाजत होतं रिक्षात आणि मी त्याला स्टेशनवर यायला विनवत होतो तेव्हाचा आमचा संवाद... इंपॅक्ट अर्थात त्यावेळी वाजत असलेल्या गाण्याचा)

मी:

रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना
ठेशनात सोडा ना, ठेशनात सोडा ना

रिक्षावाले काका, मला ठेशनात सोडा ना

ओ रिक्षावाऽऽले, जरा लवकर तुम्ही चला नाऽ
माझी लोकल निघून जाईल नाऽ

ओ रिक्षावाऽऽले

रिक्षावाला :

ओऽय कॉलरवाले भाऊ, जरा दमान घे रे
खालीपिली डोका माझा नक्को खाऊ रे
शेअर नाय भेटला तर मी नाय नेणार रे
भेज्यात तुझ्या तू हे फ़िट करुन घे रे

ओऽय कॉलरवाले भाऊ जरा दमान घे रे
दमान घे रे, दमान घे रे

मी:

ओ रिक्षावाले काका मला ठेशनात सोडा ना
ठेशनात सोडा ना, ठेशनात सोडा ना

शेअर नाही मिळाल तर फ़ुल भाडं घ्या ना
८.०३ चुकली तर मस्टर जाईल ना
मस्टर जाईल ना, मस्टर जाईल ना

ओ रिक्षावालेऽ काका मला ठेशनात सोडा ना

रिक्षावाला :

ओऽय कॉलरवाले भाऊ जरा दमान घे रे
खालीपिली डोका माझा नक्को खाऊ रे

शेअर मधे कोंबतो मी माणसं पाच

किती? हाऽ पाच
शेअरचा रेट इथ्थ तू वाच

पर शीट दहा रुप्ये तू देणार नाऽय
तुज्यासाटी तोटा मी करु काय?

म्हनुन सांगतो भाऊ, मी येनार नाय रे
शेअर नाय आलं तर आटो बी नाय रे
खालीपिल्ली डोका माझा खाऊ नको रे

ओऽय कॉलरवाले भाऊ जरा दमान घे रे
दमान घे रे दमान घे रे

(शेवटी नाहीच आला तो मुजोर रिक्षावाला
चुकलाच मस्टर आणि लागला की हो खाडा

तिरमिरीत जाऊन विकत आणली सायकल
कोण ऐकून घेणार बडबड त्यांची वायफ़ळ)

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250

मस्तच! Lol

<<तिरमिरीत जाऊन विकत आणली सायकल
कोण ऐकून घेणार बडबड त्यांची वायफ़ळ >> हा ट्विस्ट स्पेशली भारी!

मस्त.

छान !