पाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त!

Submitted by संयोजक on 11 September, 2016 - 11:55

टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
आपण विविध द्रव पदार्थांचे सेवन करतो आणि ते करण्यासाठी अनेकविध पदार्थांपासून (मटेरिअल) बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू वापरतो. या झब्बूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या खास वस्तूंचा संग्रह करणार आहोत. प्रकाशाचित्रांबरोबर काही खास गोष्ट, टिपा असतील तर त्यासुद्धा वाचायला आम्हाला आवडतील. ज्या भांड्याचं प्रकाशचित्र तुम्ही टाकाल, त्यात मुख्यत्वे काय प्यायलं जातं, हे लिहायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांची (ज्यांतून द्रव पदार्थांचे सेवन केले जाते) प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदा.

kapaat.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुरुडच्या पाटील खाणावळीतल्या सोलकढी, आमटी आणि माश्याच्या रश्श्याच्या वाट्या, चातुर्मास पाळणाऱ्यांनी पाहू नका Wink

PhotoPictureResizer_160912_145657796-800x600-1_1473672770714.jpg

मसाला-चाय साठी कुल्ल्हड !!

Kullahd Masala Tea Pot__1.jpg

हा कुल्हड डिस्पोझेबल आहे पण चांगला असल्याने कलेक्शन मध्ये ठेवलेला आहे, टाकवला नाही !!

20160912_161528-600x800.jpg

Cheers!

chachakop.gif

यावेळच्या गणेशोत्सवात आम्ची एकेमेव यंटृई Happy याला कुणितरी तुमच्या त्या ह्यांच्या नाजूक हाताचा चहा पण म्हटलं होतं असं कायसं वाटतं Wink

गणपती बाप्पा मोरया!!!!!!

(संयोजक झेपणॅबल खेळ शोधल्याबद्द्ल हा कोप तुमच्यासाठी पेसल) Happy

Pages