मायबोली मास्टरशेफ -- मनीमोहोर -- पॅनकेक सँडविच

Submitted by मनीमोहोर on 8 September, 2016 - 03:19

मंडळी, ह्या वर्षीची पा़कृ स्पर्धा डोक्याला खूपच चालना देणारी आहे. म य ब ल ह्या मायबोलीच्याच आद्याक्षरांपासुन सुरु होणारे कमीत कमी तीन घटक पदार्थ वापरुन पदार्थ करायचा आहे. संयोजकांच्या ह्या कल्पनेचे खूप खूप कौतुक . मी खूप विचार करुन पॅनकेक सँडविच हा पदार्थ तयार केला आहे. बघा वाचुन आवडतो का ते

मुख्य घटक: बीट, लाल भोपळा आणि मैदा

साहित्य : पॅनकेक साठी

एक वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, लोणी, चिमुट भर मीठ , एक चमचा साखर आणि एक वाटी होल दुध

स्टफिंग साठी :

एक एक वाटी बीट आणि लाल भोपळ्याचा कीस, लोणी, मावा अर्धी वाटी, क्रंच साठी दाम नुके , वेलची पावडर, साखर.

प्रथम लोण्यावर बीटचा किस परतुन घ्या तो थोडा मऊ झाला की त्यात लाल भोपळयाचा कीस घालुन दोन्ही मऊ शिजवून घ्या . नंतर त्यात साखर घालुन पुन्हा परतुन घ्या. शेवटी मावा घालुन दोनच मिनीटं परतुन घ्या. त्यात मनुका आणि बदामाचे काप घाला आणि गॅस बंद करुन वेलची पावडर घाला. स्टफिंग साठी बीट, लाल भोपळा हलवा तयार आहे.

पॅन केक साठी

मैदा आणि बेकिंग पावडर दोन तीन वेळा चाळुन घ्या म्हणजे चांगल मिक्स होईल . नंतर त्यात थोडसं मीठ, एक चमचा साखर, थोडसं लोणी घाला . साधारण एक वाटी दूध अंदाजाने घालुन मिश्र्ण हलक्या हाताने एक जीव करा . मिश्रण साधारण भ़ज्यांच्या पीठा इतके घट्ट ठेवा. तुम्ही जो तवा वापराता नेहमी डोसे- घावन करायला, तो गॅस वर तापत ठेवा. तव्याला थोडे लोण्याचे ग्रीसिंग करुन घ्या. तवा तापला की त्यावर हे मिश्रण ओता . गॅस बारीक करा. मिश्रणाला भोकं पडु लागली की झाकण ठेवा. दोन मिनीटांनी उलटा आणि दुसर्‍या बाजुने भाजून घ्या घ्या. असे दोन पॅन केक करुन त्यामधे वर लिहीलेला हलवा पसरवा आणि चार भागांमध्ये कट करा. वरुन ध किंवा मेपल सिरप घालुन खायला द्या आणि तुम्ही पण खा.

हा फोटो

IMG_20160908_113726961.jpg

१) पॅन केक हा पाश्चात्य देशात ब्रेकफास्ट साठीचा लोकप्रिय पदार्थ आहे. त्याच हे फ्यूजन चवीला खूपच छान लागत होते, पॅन केक वरुन थोडे क्रिस्पी, आतुन मऊ लुसलुशीत, आत बीट- लाल भोपळा हलवा, मध्येच लागणारा बदामाचा क्रंच, वरुन मधाचा गोडवा आणि स्वाद.... अहाहा .... मला तर पॅनकेक म्हणजे आपले घावनच वाटत होते पण चवीत खूपच फरक आहे. करुन बघा. नक्की आवडतील तुम्हाला.

२) ह्यात तुम्ही अंड ही घालु शकता आवडत असेल तर . मी खात नाही आणि इथे चालणार ही नव्हतं . तसेच यात मैद्या ऐवजी कणीक वापरली तर जास्त हेल्दी होईल

३) बीट - लालभोपळा हलवा नुसता ही चवीला अप्रतिम लागत होता. हे दोन्ही पदार्थ मुलचं काय मोठी ही खात नाहीत आवडीने . एकदा त्यांना कशाचा आहे ते न सांगता वाढाच. कळणार ही नाही कशाचा बनवलाय ते.

४) हलव्यात साखर बेतानी घाला कारण बीट आणि लाल भोपळा ह्यांना नैसर्गिक गोडी आहे.

४) ह्यात हलव्या ऐवजी सफरचंद, पेअर, केळ, अननस ह्याचे बारिक तुकडे मधात कॅरमलाईज करुन घालु शकता. ते ही छान लागतील.

५) हा एक ब्रेकफास्ट्चा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे

६) बीट आणि लाल भोपळ्याच्या फुलांची सजावट केली आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनातल्या मनातच मी, ममोचा एक गालगुच्चा घेतलाय.:फिदी: ममो मस्त पाकृ. फोटु तर येकदम प्रोफेशनल! स्पर्धेसाठी शुभेच्छा.:स्मित:

खुप खुप धन्यवाद सगळ्याना इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी.

खरं तर मला ह्या वर्षी स्पर्धेत भाग घ्यायला जमणारच नाही असं वाटत होत. पाकृ मनात तयार होत होती पण करायला वेळ मिळणं कठीण असं वाटत होतं पण त्यातल्या त्यात वेळ काढुन आज केली आणि फोटो ही काढले . तुमचे एवढे प्रतिसाद बघुन चीज झाल्या सारखं वाटतय केल्याचं.

मनातल्या मनातच मी, ममोचा एक गालगुच्चा घेतलाय.>>> रश्मी, Bw

मनीमोहोर, तुम्हाला काहीच कठीण नाही, such an expert you are! >>> सुलक्षणा, काही ही काय !!

ब ल म वापरलेत डोळा मारा >>> सोनू, सही आहे ही कमेंट.

सजावटीत मला खरोखर खूप इंटरेस्ट आहे. आधी मी सजावट मधापासून करायची योजलं होत पण ते काही एवढ खास दिसत नव्हतं. तसेच बीट आणि लालभोपळा मुख्य घटक ही आहेत रेसिपीचे म्हणून मग ही बीट आणि लालभोपळ्याच्या फुलांची सजावट केली . तुम्हाला आवडली , आवर्जून सांगितलत , खूप छान वाटतय.

या स्पर्धेमुळे विचार करण्यात मागचा आठवडा छानच गेला .मायबोलीचे आणि संयोजकांचे त्या साठी मनापासून आभार.

प्रतिसादाबद्दल आभार सर्वांचे .

ऋ , तुला लाल भोपळा आवडत नसेलच ना . हा लाल भोपळा बीट हलवा तुझ्यासारख्यां साठीच आहे .

पॅन केक करायला खूप सोपे आहेत . ह्या रविवारी करून बघा आपल्या भारतीय चवीला ते चटणी, सॉस,एखादी रस्सा भाजी किंवा छोले या बरोबर हि आवडतील . करताना एक काळजी घ्या . मिश्रण भिजवताना हलक्या हाताने मिक्स करा . बेकिंग पावडर मुळे तयार होणारी बबल्स जोरात मिक्स करून नाहीशी होऊ देऊ नका म्हणजे जाळीदार, स्पॉंजी पॅन केक तयार होतील.

मस्त दिसत आहेत पॅनकेक सँडविचेस.

हा बीटाचा हलवा एरवीही करता येईल. मी करून सांगेन नक्की.

ऋ , तुला लाल भोपळा आवडत नसेलच ना .
>>>
अर्थात, जराही नाही Happy
संयोजकांनी लाल भोपळ्याला हिरवा कंदिल दाखवला तेव्हाच मी हाताची मूठ पोटावर मारत डॅम ईट म्हटले Wink

खूपच छान! उचलून खावासा वाटतोय पॅनकेक! आयहॉपमध्ये या सुमारास pumpkin फ्लेवरचे पॅनकेक्स मिळायला लागतात त्याची आठवण झाली. घरी करायला सोपी पण हेल्दी कृती आहे.

फारच चविष्ट पदार्थ झाला असेल . प्रेझेन्टेशन पंण
खुपच मस्त मनिमोहर . करून बघेल .
यावेळी माझं नाही जमल भाग घेणं .

रुपाली , पॅन केक सॅन्डविचेस करून बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. मस्तच दिसतायत.

प्रभाताई, धन्यवाद . हो ह्या वर्षी तुमची नावीन्य पूर्ण रेसिपी मी सुद्धा मिस केली .

आरती , प्रतिसादासाठी आभार .

Pages