Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 15:51
मोदक, निवगर्या आणि वर तुपाची धार, गूळखोबरं, खिरापत, पंचामृत, लाडू - पेढे, वडया, केळीच्या पानावर वाढलेली गरमागरम वरणभाताची मूद, रंगीबेरंगी चटण्या-कोशिंबिरी, ऋषींची भाजी, गौरींचा नैवेद्य, बाप्पाची शिदोरी आणि निरोप देऊन आल्यावर चटकदार वाटली-डाळ! गणपतीबाप्पा जसा कलांचा आणि विद्यांचा अधिपती, तसा चांगलाच खवैय्यासुद्धा आहे बरं! मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांना वाटायची खिरापत काय तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

नैवेद्याची प्रकाशचित्रं, माहिती आणि आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचं सभासद होणं गरजेचं आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दाली, तुम्ही गाठोडं म्हणता
शब्दाली, तुम्ही गाठोडं म्हणता त्याला आम्ही सिद्धलाडू म्हणतो. पण आमच्याकडे गव्हाची खीर नसते त्यामुळे तो नुसताच खायला काहीतरीच लागतो
म्हणून मी आता निवगर्या करायला सुरूवात केली आहे.
मंजूडी, सिद्धलाडु शब्द मी
मंजूडी, सिद्धलाडु शब्द मी पहिल्यांदाच ऐकला
गव्हाची खीर आणि हि गाठोडी बेस्ट काँबो आहे :स्लर्प:
उकड काढताना एक वाटी पीठी गाठोड्यांसाठी वेगळी मोजावी लागते आमच्याकडे
काजू विथ डार्क चॉकलेट मोदक.
काजू विथ डार्क चॉकलेट मोदक.
Pages