कथासाखळी (STY) - १. आठवण

Submitted by संयोजक on 3 September, 2016 - 06:55

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.

=========================================================

"अगदी गेल्या जन्मी केलेली गोष्टसुद्धा आठवेल हो तुला, एवढ्या तुझ्या आठवणी शाबूत आहेत. दादुटल्याsss सांग ना... ", इंदू विनवणी करत म्हणाली.
मी एवढी पन्नास वर्षांची झाले आणि दादा पंचावन्न, तरी त्याची स्मरणशक्ती इतकी चांगली आहे आणि मी जळलं कपाळावर अडकवलेला चष्मासुद्धा शोधत बसते.

"इंदे, अगं किती विसराळूपणा करायचा, तुला आठवत नाही तुझ्या सोळाव्या वाढदिवसाला काय मजा झाली होती ती?" इति दादा.
"कर्म! तेच तर विचारते ना तुला, तर मलाच चिडव आणखीन."
"अगं माधव परदेशातून वकील होऊन आला होता त्या दिवशी आणि लगोलग मला भेटायला आला. आतातरी आठवलं का पुढचं?"
"कोण रे हा माधव? मला नाही बाई आठवत.."

"इंदूबाई, माधव माझा शाळेतला मित्र. त्या दिवशी पेढे घेऊन आला आणि तू दार उघडलंस. त्याला बघून अय्या म्हणून किंचाळलीस नि पळूनच गेलीस आत. मी बाहेर आलो नि उलगडा झाला! हाप चड्डी नि टोपी घालणारा माधव अगदी साहेब बनून आला होता इग्लंडासनं. नमस्कार-चमत्कार झाले, आई-अप्पांशी गप्पा झाल्या, आपली अनसूयासुद्धा गप्पा मारून गेली, तरी तू काही बाहेर आली नाहीस. म्हणून खट्टू होऊन तो निघून गेला."

"दादा, एवढं सगळं मला काहीच नाही रे आठवत..."
"मी सांगतो ना... त्यानंतर माधवनं आपल्या गावातच वकिली सुरू केली. आपल्या घरी नेहमी यायचा आणि तू आग्रह केलास म्हणून तुला जिमखान्यावर नेऊन बॅडमिंटन शिकवायला लागला. शिकताशिकता शिष्य नि गुरू यांची शिजलेली डाळ आम्हांला कळलीच नाही! डोळे कसले मोठे करतेस, खरं तेच सांगतोय हो..."

"माझ्याशी नको हं तुझ्या थापा, मला नाही आठवत तर चेष्टा करतोस होय?"
"अग्गं वेडे, खरं तेच सांगतोय. मग एकदा माधवच घरी आला आणि सरळ अप्पांना जाऊन म्हणाला, इंदूनं आणि मी लग्न करायचं ठरवलंय आणि तुमची परवानगी हवी आहे. अप्पांनी एक क्षणही विचार न करता हो म्हटलं. मग काय, राजाराणीचं लग्न झालं, दोन गोजिरवाणे राजकुमार झाले, शिकून मोट्ठे होऊन परदेशी उडून गेले...आमचे माधव-इंदू इथेच राहिले आमच्याबरोबर...इंदे, तो पहा माधव येतोय केक घेऊन... तुझ्या साठाव्या वाढदिवसाचा..."

इंदू आ वासून बघतच राहिली...
"राणीसाहेब, आपण आज साठ वर्षाच्या झालात, विझवा बरं त्या मेणबत्त्या एका फुंकरीत.. .हे बघ आयपॅडवर समीर, सूनबाई आणि नातवंडं शुभेच्छा देतायत तुला..."

इंदूनं सगळ्यांकडे बघून हात हलवून थँक्यू म्हटलं, पण अजून हे सगळं खरं वाटत नव्हतं...

अतरंगी | 5 September, 2016 - 12:05

इंदूने तिच्या या मानलेल्या दादासाठी मेणबत्ती फुंकून केक कापला. माधव आणि दादा दोघांना केक भरवून ती आपल्या नेहमीच्या कामांना लागली.

तिचा हा मानलेला दादा म्हणजे अच्युत काळे. गेली कित्येक वर्षे स्क्रीझोफेनियाचा रुग्ण.

इंदू, तीस वर्षे अखंड मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारी आधार ट्रस्टची संचालिका. बावीसाव्या वर्षीच झालेल्या प्रेमविवाहानंतर काही वर्षे संसार, नोकरी करत करत ती जमेल तितका सामाजिक कार्यांमध्ये मदत करत असेच. पण हृषिकेश च्या जन्मानंतर काही वर्षांनी तिने पूर्णवेळ 'आधार ट्रस्ट' या मानसिक रुग्णांना मदत करणाऱ्या संस्थेला वाहून घेतले होते.

अच्युत काळे एक साधा सरळ मध्यमवर्गीय मनुष्य, वयाच्या चाळीशी नंतर त्यांच्यातील स्क्रीजोफेनिया आणि त्यामुळे होणाऱ्या भासांमुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जगणे अधिकाअधिक कठीण होऊ लागले होते. काही वर्षे उपचार घेऊनही जास्त फरक न पडल्यामुळे बायको आणि मुलांनी त्यांना 'आधार ट्रस्ट' मध्ये आणले होते......

नानबा | 5 September, 2016 - 17:18

इंदू आणि माधव ची कथा पुढे कशी न्यावी याचा विचार करताना मधेच लेखकरावांना वेगळाच ट्विस्ट सापडला. अच्युत काळे - आधार ट्रस्ट मधला स्किझोफ्रेनिया पेशंट.
टाईप करता करताच स्वरालीनं समोर आणून ठेवलेल्या चहाचा एक घोट त्यानं घेतला. वा म्हणाव का शिव्या घालाव्यात? शेवटी गरज असताना गरम चहा स्वत:हून पुढे आलेला. त्यामुळे वा च! मनाने निवाडा केला.
ही कथा किती दिवसापासून मनात घोटाळत होतीं .इंदू आणि माधवची कथा. हे अच्युत नामक केरेक्टर अचानक टाईप करताना मधे आलं. कुठून आलं? का आलं?

अतरंगी | 5 September, 2016 - 18:14

अच्युत काळे...
नाव नक्कीच कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतंय. अस्पष्ट अशी छबी पण आठवतेय. थ्री पीस सूट... हातात वाइनचा ग्लास...कोणती तरी पार्टी...खूप ताण देऊन पण यापेक्षा जास्त काही आठवेना. पण नाव आणि ती छबी मात्र कुठेतरी स्मृतिपटलावर अस्तित्व टिकवून होती.

रोजच्या आयुष्यात कितीतरी माणसं आपल्याला भेटतात काही ठराविक काळाने आपण त्यांना विसरून पण जातो. काही निवडक लोकं मात्र काही न काही कारणाने आपल्या लक्षात राहतात. कधी त्यांच्या दिसण्याने, कधी एखाद्या लकबीमुळे. अच्युत काळे असाच कुठेतरी पार्टीत भेटला असावा, पण पार्टीत तर कित्येक अनोळखी लोक भेटतात मग हाच का लक्षात रहावा? काहीतरी होतं खास या माणसामध्ये. काहीतरी... आपल्याला कायम हवं होतं असं.

कितीतरी वेळ हातात चहाचा कप घेऊन विचारात गढलेल्या अर्पणला स्वराली लांबूनच पहात होती. मगाशी पण विचारात आणि लिखाणात गुंतलेल्या अर्पणला चहाचा कप ठेवताना स्वरालीच्या चेहऱ्यावरील आश्चर्य जाणवलं नव्हतं. चहा ठेवताना तिला स्क्रीनवर अच्युत काळे हे नाव दिसले होते. अर्पणला हे नाव अजून लक्षात आहे? एकदाच तर भेटला होता तो त्याला पण ते ही चार वर्षांपूर्वी, मोजून काही मिनिटं.....

कविन | 5 September, 2016 - 21:33

अर्पणला हे नाव अजून लक्षात आहे? एकदाच तर भेटला होता तो त्याला पण ते ही चार वर्षांपूर्वी, मोजून काही मिनिटं.....>> तिची घालमेल वाढली. तिची अजिबात इच्छा नव्हती की परत अर्पणने अच्युत नावाच्या जहरील्या जादुगाराच्या कचाट्यात सापडावे. आत्ता आत्ता कुठे ते वादळ परतवून लावल्याचा ती आनंदं घ्यायला शिकली होती. आज का आठवण यावी पण अर्पणला त्याची? तो विसरलाच नसेल का त्याला? इतकं सगळं होऊनही...?

नाही अर्पणच्या आयुष्यातून अच्युतच्या नावाच्या फाईल्स डिलीट व्हायलाच हव्यात ... अगदी पुर्णपणे.

काय करता येईल? कसं करता येईल? मुळात कितपत करता येईल?..... अ‍ॅट द बॉटम ऑफ माईन्ड तिलाही हे असच व्हावं असं वाटतय का तीव्रपणे?

चहा ठेवून मागे वळतानाच्या एका क्षणात काय काय येऊन गेलं तिच्या मनात! सगळी वावटळ वादळ पुन्हा एकदा अंगावर घेतल्यासारख वाटलं तिला. दमली ती तेव्हढ्यानेही. अर्पणही दमला होता अच्युतचा विचार करुन करुन.

दोन जीव एका क्षणात वावटळीत सापडलेले... पण दोघांची वादळ मात्र वेगळी होती.

कविन | 7 September, 2016 - 14:38

चहाचा घोट घेतानाही डोक्यातून अच्युत जात नव्हता आणि धड आठवतही नव्हता. अर्पणने एकीकडे स्क्रीनवर कथेसाठीच्या नोंदींची फाईल ओपन केली आणि स्वतःच्या आतल्या आवाजाने ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून मोठ्याने वाचायला सुरवात केली

ड्राफ्ट १ - नोंदी

इंदू आणि माधव, क्ष

इंदू - साधी सरळ, इंदू, तीस वर्षे अखंड मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारी आधार ट्रस्टची संचालिका, २२ व्या वर्षी लग्न, प्रेमविवाह

माधव - सरळमार्गी

क्ष - मानलेला भाऊ

*इंदू - बरीचशी मावशीसारखी. हे वाचतानाच त्याला आठवलं की त्याने * का करुन ठेवलाय ते.

माधव मात्र असा कुणावर बेतलेला नाही, तो सरळ लिहीत गेलाय नुसतच त्याच्याबद्दल. पुढे सरकेल तस बघू त्याच्याकडे असं त्याच्या मनात आलं

क्ष - सरळ साधा मध्यमवर्गी असं लिहून नंतर पुढे त्यालाच स्क्रिझोफेनिक पेशन्ट म्हणून भरती केलेलं दाखवायचा निर्णय त्याने कंसा टाकलेला दिसला त्याला. * दिसतो तसा तो नाही* हे डबल स्टार केलय म्हणजे त्यावेळी या क्ष ला ट्विस्ट द्यायचय अस काहीसं डोक्यात असणार. आणि येस्स या वाक्यानंतरच क्ष च नाव अच्युत काळे म्हणून पुढे आलय. पण * दिसतो तसा तो नाही* आणि अच्युत यांची काय लिंक लागलेली त्यावेळी लिहीताना हेच आत्ता आठवत नव्हतं. आणि आठवत नव्हतं पण विचारा आड ही करता येत नव्हतं म्हणून डोकं उठलेलं विचार करुन. फेसबूक, गुगल सगळीकडे या अच्युत ला शोधून झालं होतं. मावशी सारखा काही संबंध आहे की नावा सकट साधर्म्य आहे हे कळत नव्हतं.. आणि कळेपर्यंत चैनही पडणार नव्हतं. आत्ता अगदी आलं घातलेला चहा प्यायची तलफ आली होती. आणि अगदी मनातलं ओळखल्या प्रमाणे स्वराली आल्याचा चहा घेऊन समोर आली होती. स्वराली तशी मनकवडीच पहील्यापासून, चहाचा घोट घेता घेता त्याच्या मनात हेच आलं

त्याला असं नोंदी वाचताना बघून स्वरालीच्या मनात आलंच "अशा नोंदी लिहून ठेवायच्या ही त्याची जुनी सवय.कॅरेक्टर्स उभे करताना त्यांची पार्श्वभुमी उभी करताना, त्यांचे परस्पर संबंध लावताना या नोंदींची मदत होते असा त्याचा अनुभव आजवरचा. नोंदींमधे अ‍ॅडीशन व्हायची तसेच बदलही व्हायचे. डायरीत लिहीताना खाडाखोड दिसत रहायची आणि आपण कसे वाट काढत गेलो ते समजायचं. पिसीवर फाईल सेव्ह करतानाही तो मग स्ट्राईक्थ्रू ऑप्शन वापरायला लागला किंवा जुनी वर्जन्स कंसात टाकून वेगळ्या रंगात सेव्ह करायला लागला." पण नोंदी वाचता वाचता तो अच्युत पाशी आला तशी ती परत अस्वस्थ झाली.

नानबा | 7 September, 2016 - 17:40

पण नोंदी वाचता वाचता तो अच्युत पाशी आला तशी ती परत अस्वस्थ झाली
>>
"मी नक्की कोण? लाओत्सु ला एकदा विचारमग्न बघून एका शिष्यानं विचारलं की काय झालय. लाओत्सुनं सांगितलं - मला स्वप्न पडलं की मी एक फुलपाखरु आहे. आणि स्वप्नात ते अगदी खरही वाटलं. जर मला स्वप्नात मी फुलपाखरु वाटू शकतो तर मी एका फुलपाखराला पडलेल स्वप्न कशावरून नसेन!"
अच्युत काळे वरच्या टिपणी वाचताना इंदू ताईच्या डोक्यात विचार आले. गेल्या अनेक वर्षात किती तरी पेशंटस ना त्यानी मदत केलेली. अनेकानी त्याना आपली बहिण मानलेलं. पण त्या खरोखरच आपली थोरली बहिण आहेत असे भास होणारा हा पहिलाच पेशंट.
मनाचे व्यापार तरी किती अथांग असतात!
कधी अच्युत आपल्याला त्याची बहिण समजतो तर कधी स्वत:लाच लेखक! मग त्याच्या लेखी अच्युत काळे एक केरेक्टर होऊन बसतं! अर्पण करता स्वराली जितकी खरी तितकीच अच्युत करता इंदु ताई. आणि तितकाच आपल्याकरता अच्युत काळे हा पेशंट.
शेवटी सत्य काय? आपण फुलपाखराच सत्य का फुलपाखरू आपलं?

कविन | 7 September, 2016 - 17:40

अरे किती ते twist..... एकता कपूरच्या शिरेल मध्ये पण नसतील इतके >>>> अर्पणचे ड्राफ्ट वाचताना हेच येत होतं मनात स्वरालीच्या. पण तिला सगळाच खरा आणि दुखरा भुतकाळ माहिती असल्याने तिला त्या ट्विस्टना एकता कपुरच्या सिरिअलची उपमा देववेना. मनातल्या मनातही तिने त्याबद्दल अर्पणची माफी मागितली. सध्या तिला त्या दोघांना एकमेकांपासून लांब कसं ठेवता येईल याचच टेंशन होतं. आणि त्याबाबतीत बाहेरुन कोणी काहीही करु शकत नव्हतं. ती दोघेही त्याच्या आतच होती म्हणून तर ती इतकी हतबल झाली होती.

नानबा | 7 September, 2016 - 21:13

त्याचा जन्म झाला तेव्हाची ग्रहस्थिती फारच विवक्षित होती. तसं म्हटलं तर पृथ्वीवर दर सेकंदाला किती तरी जन्म होत असतात.मग सगळ्याची नशीबं वेगवेगळी कशी? तर अक्षांश - रेखांश सगळच बघाव लागतं. सेकंदाच्या सहस्त्राशानेही काही योग बदलतात. साधं मीठ जास्त झालं तरी पदार्थाची चव बदलते तशातलीच गत!
तर त्या विशिष्ट क्षणी त्याचा जन्म झाला.. अजूनही अनेकाचा झाला.. पुनर्जन्म आठवणारे अनेक जण असतातं . त्याच्या पुढच्या जन्माला ज्यावेळी पुनर्जन्म दिसला - बर्रोबर त्याच वेळी त्याला त्याचा पुढचा जन्म दिसला. अनेकदा अनेकांना आपल्याला दिसतय ते अशा केटेगरीतलं आहे हेच कळत नाही. मग भास स्वप्न म्हणून ते झटकून टाकलं जातं. पण त्यांच्या बाबतीत त्या दोघानाही ते दिसतच राहिलं.
स्वरालीचं एका अर्थी बरोबर होतं.. ते दोघही एकत्र नांदत होते.. नव्हे एका व्यापक अर्थाने ते दोघ एकच होते.
आपल्या बाबतीत गोष्टी काळाच्या पडद्या आड झाकलेल्या असतात हे चांगलंच म्हणायच! कारण आपल्याला ज्यांचे मनोव्यापार कळत नाहित अशांना आपण मनोरुग्ण ठरवून रिकामे होतो!

कविन | 10 September, 2016 - 12:25

स्वरालीचं एका अर्थी बरोबर होतं.. ते दोघही एकत्र नांदत होते.. नव्हे एका व्यापक अर्थाने ते दोघ एकच होते.
आपल्या बाबतीत गोष्टी काळाच्या पडद्या आड झाकलेल्या असतात हे चांगलंच म्हणायच! कारण आपल्याला ज्यांचे मनोव्यापार कळत नाहित अशांना आपण मनोरुग्ण ठरवून रिकामे होतो!>>> माधवच्या म्हणजेच बाबाच्या डायरीतल्या या नोंदीपाशी येऊन ह्रुषिकेशने वाचन थांबवलं. बाबाच्या या डायरीतल्या नोंदींना अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तो कल्पनाविलास मानत आलेला होता. पण काल पडलेल्या त्या स्वप्नाने त्याला बाबांनी सांगितलेल्या फुलपाखरु आणि माणसाच्या स्वप्नाची आठवण झाली. लहानपणापासून बाबा ही गोष्ट त्याला अगदी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळी पर्म्युटेशन कॉम्बीनेश्न करुन सांगायचा. बाबाची डायरी म्हणजे पण या गोष्टींच्या नोंदी आणि त्या नोंदींच्या गोष्टी यांनी एकातएक गुंफलेली मालिकाच होती. जसं एका चित्रात दुसरं चित्रं, दुसर्‍यात तिसरं असावं आणि अशी चित्रांची असंख्य वर्तुळ एकमेकांना छेदून जावीत तसं काहीसं होतं त्या नोंदींचं आणि गोष्टींचं स्वरुप

त्याने एकदा बाबाला विचारलेलं "बाबा, या गोष्टीचा एन्ड काय?"

बाबा नुसताच हसला होता तेव्हा आणि म्हणाला होता, "एन्डच तर मी तुला आधी सांगितलाय. याला मध्य, सुरवात. शेवट असा काही पॅटर्न नाही. ही तू म्हणशील तिथे सुरु होईल आणि म्हणशील तिथे संपेल. किंवा जिथे सुरु होतेय वाटतय तिथे ती संपतही असेल एखादवेळेस किंवा अगदी उलट जिथे संपतेय वाटेल तिथे ती सुरु होत असेल."

त्यावेळी हे सगळं डोक्यावरुन काही हजार फुट निघून गेलेलं सगळं. पण काल ते आईच्या वाढदिवसाचं स्वप्न पडलं. त्यात ती केक कापत होती तिच्या ६० व्या वाढदिवसाचा... बाबांना आणि मामाला केक भरवत होती. माझ्याशी, चिन्मयीशी आणि तिच्या नातवंडांशी लॅपटॉपवरुन बोलत होती...." किती लोभस स्वप्न होतं ते. तिकडे फुलपाखरलाही माणसाचं स्वप्न पडत त्याचवेळी असं बाबा म्हणायचे त्याची आठवण झाली आणि आपसूक हात आयपॅडकडे गेला स्काईप कॉल करायला..

नानबा | 11 September, 2016 - 11:31

हृशीकेश नं कॉल केला तर आई आधीच समीरशी कॉलवर होती.
कॉल मर्ज केला आणि समीर - हृषीकेश आणि सगळीच मंडळी एकाच वेळी ओरडली "हॅपी बर्थडे आई"

--्---्-

सर - आपल्या रिइंकार्नेशन AI च्या मिलिअंथ वर्जन मधे एक ब्रेक थ्रू मिळालाय सर.
एनवायर्न्मेंट मधले काही एजंटस backword chaining आणि forward chaining वापरून काही अंदाज बांधायला लागलेत. पर्टिक्युलरली agent next to reincarnated agent (let's call him Madhav) and his child agent.
पुढच्या steps साठी आणि implications discuss करण्यासाठी मीटिंग अरेंज करतोय.

THE END

=========================================================
अधिक माहिती:
AI - Artificial intelligent agent:

Agents are systems or software programs capable of autonomous, purposeful and reasoning directed towards one or more goals. They are also called assistants, brokers, bots, droids, intelligent agents, and software agents.

Backward Chaining:

Strategy of working backward for Reason/Cause of a problem.

=========================================================
नियमावली:

१) कथेचा शेवट अतिरंजीत चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

==========================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एवढी पन्नास वर्षांची झाले आणि दादा पंचावन्न>>>>

तुझ्या साठाव्या वाढदिवसाचा..."

इंदू आ वासून बघतच राहिली...
"राणीसाहेब, आपण आज साठ वर्षाच्या झालात>>>>>

Girls will be girls.....
दादा सांगतोय कि तुझा साठावा वाढदिवस आहे आणि नायिका स्वतःला पन्नाशीची सांगून वय लपवण्याचा प्रयत्न करते आहे. Happy

इंदूने तिच्या या मानलेल्या दादासाठी मेणबत्ती फुंकून केक कापला. माधव आणि दादा दोघांना केक भरवून ती आपल्या नेहमीच्या कामांना लागली.

तिचा हा मानलेला दादा म्हणजे अच्युत काळे. गेली कित्येक वर्षे स्क्रीझोफेनियाचा रुग्ण.

इंदू, तीस वर्षे अखंड मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारी आधार ट्रस्टची संचालिका. बावीसाव्या वर्षीच झालेल्या प्रेमविवाहानंतर काही वर्षे संसार, नोकरी करत करत ती जमेल तितका सामाजिक कार्यांमध्ये मदत करत असेच. पण हृषिकेश च्या जन्मानंतर काही वर्षांनी तिने पूर्णवेळ 'आधार ट्रस्ट' या मानसिक रुग्णांना मदत करणाऱ्या संस्थेला वाहून घेतले होते.

अच्युत काळे एक साधा सरळ मध्यमवर्गीय मनुष्य, वयाच्या चाळीशी नंतर त्यांच्यातील स्क्रीजोफेनिया आणि त्यामुळे होणाऱ्या भासांमुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जगणे अधिकाअधिक कठीण होऊ लागले होते. काही वर्षे उपचार घेऊनही जास्त फरक न पडल्यामुळे बायको आणि मुलांनी त्यांना 'आधार ट्रस्ट' मध्ये आणले होते......

इंदू आणि माधव ची कथा पुढे कशी न्यावी याचा विचार करताना मधेच लेखकरावांना वेगळाच ट्विस्ट सापडला. अच्युत काळे - आधार ट्रस्ट मधला स्किझोफ्रेनिया पेशंट.
टाईप करता करताच स्वरालीनं समोर आणून ठेवलेल्या चहाचा एक घोट त्यानं घेतला. वा म्हणाव का शिव्या घालाव्यात? शेवटी गरज असताना गरम चहा स्वत:हून पुढे आलेला. त्यामुळे वा च! मनाने निवाडा केला.
ही कथा किती दिवसापासून मनात घोटाळत होतीं .इंदू आणि माधवची कथा. हे अच्युत नामक केरेक्टर अचानक टाईप करताना मधे आलं. कुठून आलं? का आलं?

अच्युत काळे...
नाव नक्कीच कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतंय. अस्पष्ट अशी छबी पण आठवतेय. थ्री पीस सूट... हातात वाइनचा ग्लास...कोणती तरी पार्टी...खूप ताण देऊन पण यापेक्षा जास्त काही आठवेना. पण नाव आणि ती छबी मात्र कुठेतरी स्मृतिपटलावर अस्तित्व टिकवून होती.

रोजच्या आयुष्यात कितीतरी माणसं आपल्याला भेटतात काही ठराविक काळाने आपण त्यांना विसरून पण जातो. काही निवडक लोकं मात्र काही न काही कारणाने आपल्या लक्षात राहतात. कधी त्यांच्या दिसण्याने, कधी एखाद्या लकबीमुळे. अच्युत काळे असाच कुठेतरी पार्टीत भेटला असावा, पण पार्टीत तर कित्येक अनोळखी लोक भेटतात मग हाच का लक्षात रहावा? काहीतरी होतं खास या माणसामध्ये. काहीतरी... आपल्याला कायम हवं होतं असं.

कितीतरी वेळ हातात चहाचा कप घेऊन विचारात गढलेल्या अर्पणला स्वराली लांबूनच पहात होती. मगाशी पण विचारात आणि लिखाणात गुंतलेल्या अर्पणला चहाचा कप ठेवताना स्वरालीच्या चेहऱ्यावरील आश्चर्य जाणवलं नव्हतं. चहा ठेवताना तिला स्क्रीनवर अच्युत काळे हे नाव दिसले होते. अर्पणला हे नाव अजून लक्षात आहे? एकदाच तर भेटला होता तो त्याला पण ते ही चार वर्षांपूर्वी, मोजून काही मिनिटं.....

अर्पणला हे नाव अजून लक्षात आहे? एकदाच तर भेटला होता तो त्याला पण ते ही चार वर्षांपूर्वी, मोजून काही मिनिटं.....>> तिची घालमेल वाढली. तिची अजिबात इच्छा नव्हती की परत अर्पणने अच्युत नावाच्या जहरील्या जादुगाराच्या कचाट्यात सापडावे. आत्ता आत्ता कुठे ते वादळ परतवून लावल्याचा ती आनंदं घ्यायला शिकली होती. आज का आठवण यावी पण अर्पणला त्याची? तो विसरलाच नसेल का त्याला? इतकं सगळं होऊनही...?

नाही अर्पणच्या आयुष्यातून अच्युतच्या नावाच्या फाईल्स डिलीट व्हायलाच हव्यात ... अगदी पुर्णपणे.

काय करता येईल? कसं करता येईल? मुळात कितपत करता येईल?..... अ‍ॅट द बॉटम ऑफ माईन्ड तिलाही हे असच व्हावं असं वाटतय का तीव्रपणे?

चहा ठेवून मागे वळतानाच्या एका क्षणात काय काय येऊन गेलं तिच्या मनात! सगळी वावटळ वादळ पुन्हा एकदा अंगावर घेतल्यासारख वाटलं तिला. दमली ती तेव्हढ्यानेही. अर्पणही दमला होता अच्युतचा विचार करुन करुन.

दोन जीव एका क्षणात वावटळीत सापडलेले... पण दोघांची वादळ मात्र वेगळी होती

चहाचा घोट घेतानाही डोक्यातून अच्युत जात नव्हता आणि धड आठवतही नव्हता. अर्पणने एकीकडे स्क्रीनवर कथेसाठीच्या नोंदींची फाईल ओपन केली आणि स्वतःच्या आतल्या आवाजाने ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून मोठ्याने वाचायला सुरवात केली

ड्राफ्ट १ - नोंदी

इंदू आणि माधव, क्ष

इंदू - साधी सरळ, इंदू, तीस वर्षे अखंड मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारी आधार ट्रस्टची संचालिका, २२ व्या वर्षी लग्न, प्रेमविवाह

माधव - सरळमार्गी

क्ष - मानलेला भाऊ

*इंदू - बरीचशी मावशीसारखी. हे वाचतानाच त्याला आठवलं की त्याने * का करुन ठेवलाय ते.

माधव मात्र असा कुणावर बेतलेला नाही, तो सरळ लिहीत गेलाय नुसतच त्याच्याबद्दल. पुढे सरकेल तस बघू त्याच्याकडे असं त्याच्या मनात आलं

क्ष - सरळ साधा मध्यमवर्गी असं लिहून नंतर पुढे त्यालाच स्क्रिझोफेनिक पेशन्ट म्हणून भरती केलेलं दाखवायचा निर्णय त्याने कंसा टाकलेला दिसला त्याला. * दिसतो तसा तो नाही* हे डबल स्टार केलय म्हणजे त्यावेळी या क्ष ला ट्विस्ट द्यायचय अस काहीसं डोक्यात असणार. आणि येस्स या वाक्यानंतरच क्ष च नाव अच्युत काळे म्हणून पुढे आलय. पण * दिसतो तसा तो नाही* आणि अच्युत यांची काय लिंक लागलेली त्यावेळी लिहीताना हेच आत्ता आठवत नव्हतं. आणि आठवत नव्हतं पण विचारा आड ही करता येत नव्हतं म्हणून डोकं उठलेलं विचार करुन. फेसबूक, गुगल सगळीकडे या अच्युत ला शोधून झालं होतं. मावशी सारखा काही संबंध आहे की नावा सकट साधर्म्य आहे हे कळत नव्हतं.. आणि कळेपर्यंत चैनही पडणार नव्हतं. आत्ता अगदी आलं घातलेला चहा प्यायची तलफ आली होती. आणि अगदी मनातलं ओळखल्या प्रमाणे स्वराली आल्याचा चहा घेऊन समोर आली होती. स्वराली तशी मनकवडीच पहील्यापासून, चहाचा घोट घेता घेता त्याच्या मनात हेच आलं

त्याला असं नोंदी वाचताना बघून स्वरालीच्या मनात आलंच "अशा नोंदी लिहून ठेवायच्या ही त्याची जुनी सवय.कॅरेक्टर्स उभे करताना त्यांची पार्श्वभुमी उभी करताना, त्यांचे परस्पर संबंध लावताना या नोंदींची मदत होते असा त्याचा अनुभव आजवरचा. नोंदींमधे अ‍ॅडीशन व्हायची तसेच बदलही व्हायचे. डायरीत लिहीताना खाडाखोड दिसत रहायची आणि आपण कसे वाट काढत गेलो ते समजायचं. पिसीवर फाईल सेव्ह करतानाही तो मग स्ट्राईक्थ्रू ऑप्शन वापरायला लागला किंवा जुनी वर्जन्स कंसात टाकून वेगळ्या रंगात सेव्ह करायला लागला." पण नोंदी वाचता वाचता तो अच्युत पाशी आला तशी ती परत अस्वस्थ झाली

पण नोंदी वाचता वाचता तो अच्युत पाशी आला तशी ती परत अस्वस्थ झाली
>>
"मी नक्की कोण? लाओत्सु ला एकदा विचारमग्न बघून एका शिष्यानं विचारलं की काय झालय. लाओत्सुनं सांगितलं - मला स्वप्न पडलं की मी एक फुलपाखरु आहे. आणि स्वप्नात ते अगदी खरही वाटलं. जर मला स्वप्नात मी फुलपाखरु वाटू शकतो तर मी एका फुलपाखराला पडलेल स्वप्न कशावरून नसेन!"
अच्युत काळे वरच्या टिपणी वाचताना इंदू ताईच्या डोक्यात विचार आले. गेल्या अनेक वर्षात किती तरी पेशंटस ना त्यानी मदत केलेली. अनेकानी त्याना आपली बहिण मानलेलं. पण त्या खरोखरच आपली थोरली बहिण आहेत असे भास होणारा हा पहिलाच पेशंट.
मनाचे व्यापार तरी किती अथांग असतात!
कधी अच्युत आपल्याला त्याची बहिण समजतो तर कधी स्वत:लाच लेखक! मग त्याच्या लेखी अच्युत काळे एक केरेक्टर होऊन बसतं! अर्पण करता स्वराली जितकी खरी तितकीच अच्युत करता इंदु ताई. आणि तितकाच आपल्याकरता अच्युत काळे हा पेशंट.
शेवटी सत्य काय? आपण फुलपाखराच सत्य का फुलपाखरू आपलं?

कधी अच्युत आपल्याला त्याची बहिण समजतो तर कधी स्वत:लाच लेखक! मग त्याच्या लेखी अच्युत काळे एक केरेक्टर होऊन बसतं>>>>>

अरे किती ते twist..... एकता कपूरच्या शिरेल मध्ये पण नसतील इतके Proud

अरे किती ते twist..... एकता कपूरच्या शिरेल मध्ये पण नसतील इतके >>>> अर्पणचे ड्राफ्ट वाचताना हेच येत होतं मनात स्वरालीच्या. पण तिला सगळाच खरा आणि दुखरा भुतकाळ माहिती असल्याने तिला त्या ट्विस्टना एकता कपुरच्या सिरिअलची उपमा देववेना. मनातल्या मनातही तिने त्याबद्दल अर्पणची माफी मागितली. सध्या तिला त्या दोघांना एकमेकांपासून लांब कसं ठेवता येईल याचच टेंशन होतं. आणि त्याबाबतीत बाहेरुन कोणी काहीही करु शकत नव्हतं. ती दोघेही त्याच्या आतच होती म्हणून तर ती इतकी हतबल झाली होती

.

त्याचा जन्म झाला तेव्हाची ग्रहस्थिती फारच विवक्षित होती. तसं म्हटलं तर पृथ्वीवर दर सेकंदाला किती तरी जन्म होत असतात.मग सगळ्याची नशीबं वेगवेगळी कशी? तर अक्षांश - रेखांश सगळच बघाव लागतं. सेकंदाच्या सहस्त्राशानेही काही योग बदलतात. साधं मीठ जास्त झालं तरी पदार्थाची चव बदलते तशातलीच गत!
तर त्या विशिष्ट क्षणी त्याचा जन्म झाला.. अजूनही अनेकाचा झाला.. पुनर्जन्म आठवणारे अनेक जण असतातं . त्याच्या पुढच्या जन्माला ज्यावेळी पुनर्जन्म दिसला - बर्रोबर त्याच वेळी त्याला त्याचा पुढचा जन्म दिसला. अनेकदा अनेकांना आपल्याला दिसतय ते अशा केटेगरीतलं आहे हेच कळत नाही. मग भास स्वप्न म्हणून ते झटकून टाकलं जातं. पण त्यांच्या बाबतीत त्या दोघानाही ते दिसतच राहिलं.
स्वरालीचं एका अर्थी बरोबर होतं.. ते दोघही एकत्र नांदत होते.. नव्हे एका व्यापक अर्थाने ते दोघ एकच होते.
आपल्या बाबतीत गोष्टी काळाच्या पडद्या आड झाकलेल्या असतात हे चांगलंच म्हणायच! कारण आपल्याला ज्यांचे मनोव्यापार कळत नाहित अशांना आपण मनोरुग्ण ठरवून रिकामे होतो!

स्वरालीचं एका अर्थी बरोबर होतं.. ते दोघही एकत्र नांदत होते.. नव्हे एका व्यापक अर्थाने ते दोघ एकच होते.
आपल्या बाबतीत गोष्टी काळाच्या पडद्या आड झाकलेल्या असतात हे चांगलंच म्हणायच! कारण आपल्याला ज्यांचे मनोव्यापार कळत नाहित अशांना आपण मनोरुग्ण ठरवून रिकामे होतो!>>> माधवच्या म्हणजेच बाबाच्या डायरीतल्या या नोंदीपाशी येऊन ह्रुषिकेशने वाचन थांबवलं. बाबाच्या या डायरीतल्या नोंदींना अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तो कल्पनाविलास मानत आलेला होता. पण काल पडलेल्या त्या स्वप्नाने त्याला बाबांनी सांगितलेल्या फुलपाखरु आणि माणसाच्या स्वप्नाची आठवण झाली. लहानपणापासून बाबा ही गोष्ट त्याला अगदी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळी पर्म्युटेशन कॉम्बीनेश्न करुन सांगायचा. बाबाची डायरी म्हणजे पण या गोष्टींच्या नोंदी आणि त्या नोंदींच्या गोष्टी यांनी एकातएक गुंफलेली मालिकाच होती. जसं एका चित्रात दुसरं चित्रं, दुसर्‍यात तिसरं असावं आणि अशी चित्रांची असंख्य वर्तुळ एकमेकांना छेदून जावीत तसं काहीसं होतं त्या नोंदींचं आणि गोष्टींचं स्वरुप

त्याने एकदा बाबाला विचारलेलं "बाबा, या गोष्टीचा एन्ड काय?"

बाबा नुसताच हसला होता तेव्हा आणि म्हणाला होता, "एन्डच तर मी तुला आधी सांगितलाय. याला मध्य, सुरवात. शेवट असा काही पॅटर्न नाही. ही तू म्हणशील तिथे सुरु होईल आणि म्हणशील तिथे संपेल. किंवा जिथे सुरु होतेय वाटतय तिथे ती संपतही असेल एखादवेळेस किंवा अगदी उलट जिथे संपतेय वाटेल तिथे ती सुरु होत असेल."

त्यावेळी हे सगळं डोक्यावरुन काही हजार फुट निघून गेलेलं सगळं. पण काल ते आईच्या वाढदिवसाचं स्वप्न पडलं. त्यात ती केक कापत होती तिच्या ६० व्या वाढदिवसाचा... बाबांना आणि मामाला केक भरवत होती. माझ्याशी, चिन्मयीशी आणि तिच्या नातवंडांशी आयपॅड्वरुन बोलत होती...." किती लोभस स्वप्न होतं ते. तिकडे फुलपाखरलाही माणसाचं स्वप्न पडत त्याचवेळी असं बाबा म्हणायचे त्याची आठवण झाली आणि आपसूक हात आयपॅड्वरुन स्काईप कॉल करायला

हृशीकेश नं कोल केला तर आई आधीच समीरशी कोल वर होती.
कोल मर्ज केला आणि समीर - हृषीकेश आणि सगळीच मंडळी एकाच वेळी ओरडली "हेपी बर्थडे आई"

--्---्-

सर - आपल्या रिइंकार्नेशन AI च्या मिलिअंथ वर्जन मधे एक ब्रेक्थ्रू मिळालाय सर.
एनवायर्न्मेंट मधले काही एजंटस backword chaining आणि forward chaining वापरून काही अंदाज बांधायला लागलेत. पर्टिक्युलरली agent next to reincarnated agent (let's call him Madhav) and his child agent.
पुढच्या steps साठी आणि implications discuss करण्यासाठी मीटिंग अरेंज करतोयं.

AI - Artificial intelligent
agent:
Agents are systems or software programs capable of autonomous, purposeful and reasoning directed towards one or more goals. They are also called assistants, brokers, bots, droids, intelligent agents, and software agents.

Backward Chaining

Pages